जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेटीचे गायबणे फुसका बार निघाला.... रिटर्न ऑफ भोचक शेजारणीज टू हादड देसायांकडचा ब्रेकफास्ट....जाम बोअर होता आजचा भाग....

कथेचा गाभा शाबूत ठेऊन पटकथेला आकार देणारे 'संवाद' यापैकी कोणत्या मालिकेचे संवाद तुमच्या मनाला भिडतात??
१. होणार सून मी ह्या घरची २. एका लग्नाची तिसरी गोष्ट ३. जुळून येती रेशीमगाठी ४. जावई विकत घेणे आहे

Biggrin Biggrin Biggrin

झी ने फे.बु वर पोस्ट केलेले जसेच्या तसे Happy

उदय टिकेकर यांनी कवळी बसवल्याने कालच्या एपिसोडातले त्यांचे संवाद+ तोंडातली हवा असे मिळून ऐकू येत होते. बाकी संवाद आणि अभिनय कथा या बद्दल न बोललेलंच बरं.

डीविनिता, उपास सुटल्यावर 'हम दिल दे चुके सनम' सिनेमा संपला आणि मालिका चालु झाली. आता हि मालिका आणखी किती काळ (महिने/वर्ष) चालेल ते माहित नाही. Happy

नाय, झलक मध्ये दिसले की फाटक्या चड्डी बरोबरचे मेदेचे रन्गीन फोटो पाहुन भोचक अर्चु आणी मोरन्ब्याची बरणी दोघी धाय धाय रडत होत्या. मोरम्ब्याची बरणी म्हणत होती की तिला घरी पाठव म्हणून, चान्गलीच फसवणूक केलीय वगैरे वगैरे.....

धूम मचाले धूम मचाले

कसली धूम
या लोकांना असलीच स्वप्न वारंवार पडत असतात
तो ढोल्या इतक्या जोरजोरात लिक करत होता तरी शेजारी ती सून ठोम्ब्यासारखी उभी होती .
स्वप्नच असेल

>>>>> स्वप्न नाही आहे , महाएपिसोड आहे ना २७ जुलैला
.
महा एपिसोड …. अत्यंत छान … सुरेख , माशा हल्ला
पहिलेच स्टोरीचा अभाव , त्यात दर दोन महिन्याला एक महा एपिसोड, याच महा एपिसोड ला कथा थोडीशी पुढे सरकणार
लग्नासाठी वगैरे महा एपिसोड ठीक होता, काहीतरी नाच गाणी जादा दाखवतात
आता इथे ढोल्या पिंप लिक करण्यासाठी पण महा एपिसोड
देवा ~~~~~~~ तुझ्याकडे असेल तर थोडी बुद्धी पृथ्वीतलावर वाट रे

बाबाजी ने अत्यंत डोकं उठवलंय आता. होसूमीयाघ सोडून मी आता एक हसिना थी बघू लागलेय.
आता जुयेरेगा साठी पण ऑप्शन शोधावा लागणार भौतेक.

बादवे जुयेरेगा असं लिहिताना किंवा मनात उच्चारताना उगिच मला तिकडून कुठूनतरी एक ऊ रांगत येतेय असा भास होतोय Proud

बादवे जुयेरेगा असं लिहिताना किंवा मनात उच्चारताना उगिच मला तिकडून कुठूनतरी एक ऊ रांगत येतेय असा भास होतोय>>>>>:हाहा: दक्षिणा मलाही सुरुवातीला तसेच वाटले होते.:फिदी:

टायटल साँग संपले की मी चॅनेल चेंज करुन स्टारप्लसवर महाभारत बघते Lol तिकडेही खूप काही विशेष नाही पण दगडापेक्षा वीट बरी.

आज तो ढोल्या आरशासमोर नाचून , आरशात कसा माऊ नि कसा नको करत होता
नंतर आरशात मावण्यासाठी एक किलो वजन कमी करणार सांगितले
इतके प्रताप करण्यापेक्षा जरा स्टोरी कडे लक्ष द्या म्हणजे असल्या फालतू गोष्टीकडे कोणाचे लक्ष जाणार नाही

सुकन्या जोशी सारखी अभिनेत्री असा रोल करायला कशी तयार झाली ?
तिचे वजन वाढलेय यावर अजून किती एपिसोड ती काढून देणार
वजन वाढणे हा वैयक्तिक प्रश्न आहे त्याचा असा टीव्हीवर उदोउदो का करायचा ?
वजन वाढलेय म्हणून मोर्निग वॉक
बारीक दिसण्यासाठी सलवार
आरशात मावण्यासाठी एक किलो वजन कमी करणार
गिरीश ओक ला कुठले आजार आहेत त्यावर पण एक दोन एपिसोड काढा कि , अजून किती खाली पाडणार …
हे लोक गंभीर विषय कधीच हाताळू शकणार नाहीत म्हणून चिंगम चावत बसलेत

काल प्रोमोजमध्ये पाहिलं की अर्चूला ती पेटी सापडली.
ही मेदे आणि आदे वेडसर आहेत का? दोघांचं मनोमिलन झाल्यावर ती पेटी आपल्याच संसारात आग लावायला घरातच ठेवली? मुर्खांचे राजाराणी आहेत दोघंही.

ती पेटी ते दोघं 'विसर्जित' ?? करणार असतात समुद्रात (अरे काय हा शब्द पेटी म्हणजे काय गणपतीएका?)
पण नेहेमीप्रमाणे काहीतरी फालतू अडचणी !

आणि ते विसर्जन कधी करणार होते म्हणे? Uhoh
सगळं उघडं झाल्यावर झाकण्यात काय पॉईंट आहे? Uhoh
पण सिनेमा सिरियलीत असे मूर्खपणे फार सहज केल्यासारखे दाकह्वतात. प्रेमपत्रं वगैरे कुणी असंच वर ठेवतं होय? ते पण आपण दुसर्‍या घरात लग्न करून गेलोय हे माहित असून? Uhoh त्यात बरं नवरा बायको सडे नाहीत, घर गच्च भरलेलं त्यातही रूम वेगळी असली तरी भोचक भाचरं आहेत याचं ही भान नसावं? Uhoh

हो ना मी पण हा शब्द ऐकला आदेच्या तोंडून आणि धन्य झाले. Proud

दक्षिणा त्यांना काहीतरी नवीन विषय हवा ना चघळायला.. ज्ञानामृत सगळ्यांना पाजायला.
महाएपिसोड त्यासाठीच राखून ठेवलाय बहुतेक. Happy ते सावर्डे प्रकरण अमितच्या डोक्यात जाण्याऐवजी सगळ्या प्रेक्षकांच्याच डोक्यात घुसवतायत. अतीच चाल्लंय.

मुळात हम दिल दे चुके सनम हा तीन तासांचा सिनेमा. त्याची ३ वर्षं चालेल अशी सिरीयल करायची म्हणजे पाणी घालणारच की!

३ वर्षं चालेल अशी सिरीयल करायची म्हणजे पाणी घालणारच की! >>>>> खरं तर तलाव भर पाणी घालून त्यात 'ह दि दे चु स' बुचकळून काढावा लागतोय.. म्हणून ते तसं करताहेत... Proud

वेदिका, मी मागे लिहिल्याप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी दोघांचे एकदाचे (मनो)मिलन झाले त्यादिवशी 'ह दि दे चु स' सिनेमा संपला आणि आत्ता कुठे रेशिमगाठी (!) मालिका चालु झाली आहे. मुळ कथानक संपल्याने आणि नविन कथानकाचा अभाव असल्याने आता फक्त पाणी घालत राहून मालिका चालू ठेवणे हेच होणार आहे.

Pages