आधी युद्धा बद्दल थोड़े जाणून घेऊ.
या युद्धा बद्दल लोकांच्या मनात थोड़ी सांशकता होती की नक्की हे युद्ध झाले होते की फत्क्त काल्पनिक कथा होती. पण आता त्या युद्धाची सत्यता लोकांसमोर येत आहे. या युद्धाचा काळ आहे साधारण १२०० -१३०० ख्रिस्तपूर्व. हे युद्ध तब्बल १० वर्षे चालले. या युद्धाची तुलना आपण आपल्या महाभारताशी करू शकतो. हे युद्ध त्या काळातील खुप मोठे व तितकेच संहारिक म्हणून प्रसिद्ध आहे.
त्यात असंख्य योद्धे मारले गेले व संपूर्ण ट्रॉय राज्य नष्ट झाले. या युद्धात ग्रीकांचा विजय झाला तर ट्रॉयचा पराभव झाला होता.
ट्रॉयचे युद्ध का झाले त्याची कारणे पुढील प्रमाणे.
महाभारतकालीन भारताप्रमाणेच एका संस्कृतीची परंतु एका राजाच्या अमलाखाली नसलेली ही अनेक राज्ये पाहता त्यांमध्ये सत्तासंघर्ष होणार हे तर अपरिहार्य होतेच. त्यात मायसिनीचे राज्य सगळ्यात शक्तिशाली होते त्याच्या राजाचे नाव अॅगॅमेम्नॉन. त्याचा सख्खा भाऊ मेनेलॉस हा स्पार्टाचा राजा होता. बाकीची सर्व राज्ये मायसिनीचे स्वामित्व मान्य करीत. जो दर्जा पश्चिमेकडे ग्रीस मध्ये मायसिनीला होता, तोच दर्जा पूर्वेकडे ट्रॉयला होता-त्याच्या राजाचे नाव प्रिआम. आता स्पार्टा व ट्रॉय यांच्या शांततेच्या वाटाघाटी सुरु असताना ट्रॉयचा धाकटा राजपुत्र पॅरिस आणि स्पार्टाची राणी हेलेन ह्या दोघांचे एकमेकांवर प्रेम बसले व हे दोघे ट्रॉयला पळाले. आपल्या बायकोला परत आणावे आणि पॅरिसला ठार मारावे म्हणून मेनेलॉस अडून बसला होता, तर वहिनीच्या निमित्ताने ट्रॉयवर कब्जा करत येईल म्हणून अॅगॅमेम्नॉनने युद्ध केले.
युद्धात भाग घेतलेले महत्वाचे योद्धे व त्यांचे सैन्य याबद्दल थोड़ी माहीती.
आता ग्रीक सेनेचा आकार बघू. इलियडच्या दुसऱ्या बुकात दिल्याप्रमाणे टोटल ११८६ जहाजे होती. आणि १४२,३२० लोक होते. यांमधील मुख्य लोक कोण कोण होते ते जरा संक्षेपाने बघू:
१. मायसिनीचा अॅगॅमेम्नॉन- १०० जहाजे. हा पूर्ण मोहिमेचा नेता होता, भालाफेकीत कुशल. हेकेखोर आणि निश्चयी.
२. स्पार्टाचा मेनेलॉस- ६० जहाजे. अॅगॅमेम्नॉनचा सख्खा भाऊ.
३. पायलॉसचा नेस्टॉर- ९० जहाजे. हा सर्वांत ज्येष्ठ योद्धा होता, “सेव्हन व्हर्सेस थिब्स” या लढाईमध्ये त्याने मोठे नाव गाजवले होते होते समतोल आणि उपयुक्त सल्ले देण्यासाठी फेमस.
४.अर्गोलीस चा डायोमीड- ८० जहाजे. हा एक तरणाबांड, पराक्रमी गडी होता.
५. सलामीस चा अजॅक्स(ग्रेटर/थोरला अजॅक्स)- १२ जहाजे,अकीलीसचा सख्खा चुलत भाऊ, एकदम सांड, एकंदर वर्णन महाभारतातील भीमाप्रमाणे. अजून एक अजॅक्स होता, कन्फ्युजन नको म्हणून अजॅक्स द ग्रेटर आणि अजॅक्स द लेसर असा शब्दप्रयोग केला जातो. हा लेसर/धाकटा अजॅक्स पण अतिशय चपळ होता.
६. क्रीटचा इडोमेनिअस- ८० जहाजे, लाकडी घोड्यात जे लोक बसले आणि ट्रॉयवर स्वारी केली, त्यांतील मुख्य लोकांपैकी एक.
७. इथाकाचा ओडीसिअस- १२ जहाजे. कुशल योद्धा आणि अतिशय बेरकी. कुठल्याही स्थितीतून मार्ग काढावा तर यानेच. लाकडी घोड्याची आयडिया याचीच. कृष्णाच्या जवळपास जाणारे वर्णन. आधीपासून त्याची जायची इच्छाच नव्हती. त्याचा खोटा वेडेपणा ज्याने उघडकीस आणला, त्या पालामिदेसला नंतर त्याने कपटाने ठार मारले. ओडिसी हे होमरचे दुसरे महाकाव्य त्याच्यावरच आधारित आहे.
८.अकिलीस-५० जहाजे. ग्रीसमधील सर्वश्रेष्ठ योद्धा, अतिशय चपळ. तो आणि त्याचे “मोर्मिडन” नावाचे खुंखार सैनिक अख्ख्या ग्रीस मध्ये फेमस होते. ते मुंग्यांपासून जन्मले अशी आख्यायिका आहे. अकीलीसचा आजोबा एईकसच्या वेळी एकदा खुप मोठा दुष्काळ पडला होता, इतका की प्रजाच नष्ट झाली होती जवळपास, मग त्याने झ्यूसची प्रार्थना केली, आणि झ्युसने मग वारुळातील मुंग्यांपासून या लोकांची उत्पत्ती केली अशी ती कथा आहे.
या तुलनेत ट्रोजन लोकांकडे हेक्टर (ट्रॉयचा राजकुमार) व सार्पेडन हे भारिताले दोनच योद्धे होते. अर्थात ट्रॉयच्या भुईकोटावर सर्व ट्रोजनांची खूप भिस्त होती असो (जसे जसे युद्ध सुरु झाले तसे ट्रॉयला सुद्धा अनेक राज्ये येऊन मिळाली पण त्याचा उल्लेख येथे नहीं म्हणून त्यांची संख्या नक्की माहित नाही.)
एवढे योद्धे असून सुद्धा ट्रॉय समोर युद्ध जिंकणे ग्रीकांना शक्य नव्हते त्यासाठी त्यांना अकिलिस आणि त्यांचे सैन्य आवश्यक होते. पण अकिलिसला अॅगॅमेम्नॉनचे वर्चस्व मान्य नव्हते किम्बहुन अकिलिसचे आणि अॅगॅमेम्नॉनचे फारसे पटत नव्हते त्यामुळे तो युद्धा साठी तयार नव्हता. पण ओडीसिअस याने त्याला तयार केले. अकिलिसला सुद्धा माहित होते की या युद्धात जो कोणी फार मोठा पराक्रम करेल त्याचे नाव इतिहासात अजरामर होईल आणि अकिलिसला फक्त आपल नाव अजरामर करण्याची इच्छा होती. अकिलिस युद्ध साठी तयार झाला पण स्वताच्या अटींवर. आणि एकदाचा ग्रीकांनी सुटकेचा श्वास घेतला कारन सगळ्यांना माहित होते की अकिलिस शिवाय विजय अशक्य आहे. कारन गाठ ट्रॉय बरोबर होती.
थोड़े अकिलिस जन्माची कथा जाणून घेऊ.
अकिलिसाची आई थेटिस ही एक अप्सरा होती. याची आई थेटिसने लहानपणी एका हाताने अकिलिसाची टाच पकडून त्याला स्टिक्स नामक नदीत बुडवले होते-फक्त टाचा-घोटे वगळता त्यामुळे त्याचे अख्खे शरीर अभेद्य झाले होते. फक्त टाच हा एकच कमकुवत भाग राहिला होता. तस्मात एखाद्या गोष्टीचा/माणसाचा एकच पण घातक ठरणारा वीक पॉइंट असेल तर त्याला ‘अकिलीस हील’ असे म्हणावयाचा प्रघात आहे. हा वाक्प्रचार इंग्लिशमध्ये प्रसिद्ध आहे.
युद्धाची सुरवात आपण पुढील भागात पाहु
मस्तं.
मस्तं.
पुढच्या भाग लवकर टाका.
पुढच्या भाग लवकर टाका.
अकिलीस.... फार मोठा आवाका
अकिलीस....
फार मोठा आवाका असलेला विषय तुम्ही इथे लिखाणासाठी निवडला आहे. कथानकात प्रचंड असे सामर्थ्य आहे ज्यामुळे वाचकवर्ग खिळून राहतो. मांडताना अमुक एका स्त्री वा पुरुष पात्राविषयी कोणताही पूर्वग्रह मनी न धरता कथानक सांगत गेलात तर ते अत्यंत वाचनीय होईल (हे माझे वैयक्तिक मत आहे.)
मानवी इतिहासातील एका मोठ्या घटनेचे कथानक सांगताना त्याला "..ग्रीक मधील महाभारत (ट्रॉय चे युद्ध) नविन.." असे शीर्षक देण्याऐवजी केवळ "ट्रोजन युद्ध" असे म्हटले तर ते जास्त सूचक वाटेल. महाभारताचा संबंध अनावश्यक वाटतो.
असो...लेखमालेसाठी शुभेच्छा.....तुमचे टंकलेखनही अतिशय शुद्ध आहे. अशा मालिकांसाठी त्याची आवश्यकताही आहेच.
>>>आमच्याकडे फार जुन्या
>>>आमच्याकडे फार जुन्या पणजोबांच्या काळातले,चांदोबाचे काही भाग होते...त्यात ट्रॉयच्या युध्दाचे कथानक क्रमश: होते...त्याची आठवण झाली... त्यातली चित्रं बघण्यासारखी असत.आता परत वाचायला मिळेल ते..
>>>अकिलीसची गोष्ट ऐकून आपल्या कृष्णाची गोष्ट आठवली...अॅनॉलॉजी किती जुळते.. बाकी आपण 'कृष्णाज सोल' किंवा 'कृष्णाज बिग टो' असंही म्हणायला काय हरकत आहे??
ले.शुभेच्छा!!
हे कथानक वाचले आहे. चित्रपटही
हे कथानक वाचले आहे. चित्रपटही बघितला आहे तरी पण वाचायची उत्सुकता लागून राहिलीय,
A face that launched a
A face that launched a thousand ships..हेलेनचं हे वर्णन आणि हे कथानक अर्धवट आठवतं आहे.तुम्ही छान लिहीत आहात,वाचायची उत्सुकता आहे.ले.शु.
"...A face that launched a
"...A face that launched a thousand ships....."
भारती.... पण ग्रीक महायुद्धाचे महत्व फ़क्त हेलेनसाठीच नसून "इलियाड" मधील अकिलीज, हेक्टर यांच्यासारख्या महानायकांच्या पराक्रमासाठीही तितकेच महत्वाचे आहे. पॅरिससमवेत हेलेन ट्रॉयला आली यावरून संतापलेल्या ग्रीकांनी नगरीवर स्वारी केले हे एक निमित्त होतेच. पण योद्ध्यांचा इतिहासही तितकाच रंगविला गेला आहे.
विज्ञानदास, +१ बाकी पुढील
विज्ञानदास, +१
बाकी पुढील लेखाच्या प्रतिक्षेत
मस्त . प्रतिक्शेत ...
मस्त . प्रतिक्शेत ...
आमच्याकडे फार जुन्या
आमच्याकडे फार जुन्या पणजोबांच्या काळातले,चांदोबाचे काही भाग होते...त्यात ट्रॉयच्या युध्दाचे कथानक क्रमश: होते...त्याची आठवण झाली... त्यातली चित्रं बघण्यासारखी असत.आता परत वाचायला मिळेल ते..
>>>
चांदोबातली चित्रे अतिशयच सुन्दर असत. विशेषतः महिलांची चित्रे मुलगा आणि बाप दोघेही आवडीने व अनिमिष नेत्रांनी पाहात असत.:त्यामुळे चांदोबा आबालवृद्धात लोकप्रिय होता....
विशेषतः महिलांची चित्रे मुलगा
विशेषतः महिलांची चित्रे मुलगा आणि बाप दोघेही आवडीने व अनिमिष नेत्रांनी पाहात असत.:त्यामुळे चांदोबा आबालवृद्धात लोकप्रिय होता....<<<<
भारतीय सत्य आहे,चांदोबाच्या इतिहासातलं...

रॉबिनहूड..फार हूड ब्बॉ तुमी.. हह्पुवा...
अकिलिस ची कथा दुर्योधनाशी
अकिलिस ची कथा दुर्योधनाशी जुळते.
टाचेजवळच्या स्नायुला अॅनॉटोमीत टेण्डो अॅकिलिस असे नाव आहे. तॅ त्याचमुळे
मस्त धागा छान माहिती मजा
मस्त धागा
छान माहिती
मजा येणार
वरील लेख माझ्या ट्रॉयवरील
वरील लेख माझ्या ट्रॉयवरील लेखमालेतील पहिल्याच लेखाची सरळ सरळ कॉपी आहे. थोडी वाक्ये बदललीत इतकंच. अन्यथा लेखातील माहिती सरळ पेस्ट केलेली आहे.
पुराव्यादाखल पहा.
हाच लेख माझ्या ब्लॉगवर.
http://manogate.wordpress.com/2012/05/21/%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%...
हाच लेख मिसळपाव.कॉमवर
http://www.misalpav.com/node/21717
हाच लेख ऐसीअक्षरे.कॉमवर
http://www.aisiakshare.com/node/1587
पूर्ण लेखमाला ब्लॉगवर तसेच वर उल्लेख केलेल्या अन्य संकेतस्थळांवरही पाहता येईल. हा लेख मी लिहिल्याला २ वर्षे तरी उलटून गेली आहेत हे त्या लेखांच्या प्रकाशनतारखेवरून सहजच कळून येईल.
माबोच्या व्यवस्थापक मंडळास विनंती आहे की सदस्य अकिलीस यांना समज द्यावी. वाङ्मयचौर्यापासून वेळीच मला सावध केल्याबद्दल माझ्या मित्रांचे इथे आभार मानतो.