सुंदर दिसण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग

Submitted by अजय on 6 June, 2014 - 01:27

1024px-Lemon.jpg
फोटो: André Karwath Wikimedia

बहुगुणी लिंंबाचा रस तुमच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खुप उपयुक्त आहे

१. चेहर्‍यावरचे काळपट डाग घालण्यासाठी एका कापसाच्या बोळ्यावर थोडा लिंबाचा रस घेऊन त्या भागावर लावा. साधारण ३० मिनिटे तसेच ठेवा आणि उन्हात बाहेर पडू नका. फक्त चेहर्‍यावरच नाही तर शरिराच्या इतर काळपट पडलेल्या भागावर ही युक्ती वापरता येईल. रस डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.

२. मुरुम (पिंपल्स) वाढू नयेत म्हणून लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण त्यावर चोळा. मुरुम गेल्यावर राहिलेले व्रण कमी करण्यासाठी नुसता लिंबाचा रस त्यावर लावा. हळूहळू व्रण निघून जातील.

३. उन्हामुळे चेहरा खूप रापला असेल तर बेसन, दही आणि लिंबाचा रस यांचं मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि वाळू द्या. नंतर गार पाण्याने पण हळूवार धुऊन काढा. साध्या कापडाने हळूवार पाणी टिपा(जोरात नको) आठवड्यात एकदा हा उपाय काही आठवडे केल्यावर चेहरा परत पूर्वीसारखा होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाईम आणि लेमन ह्यापैकी लिंबू कोणतं?

लाईम. यात रस अधिक असतो. सध्या आपण वापरतो ते कागदी (पातळ सालीचे) लिंबू.
लेमन थोडे मोठे असते आणि गोल नसते. एका बाजूस टेंगूळ असते.

लिंबाचे लोणचे घालण्यासाठी साल जाड असावी लागते. त्याचीच फोड तयार होते. त्या जातीचं वाण हल्ली फार कमी होत चाललं आहे. यात रस कमी असतो. तो कागदी लिंबे पिळून वाढवता येतो.
---------
पूर्वी ठोक बाजारात (कल्याण,जुन्नर वगैरे) 'शेकडा' लिंबांचा भाव असे. एक शेकडा म्हणजे १०० अधिक १२ लिंबे. एका गठ्ठ्यात खराब निघालेली लिंबे काढूनही ग्राहकास शंभर मिळावी हा हेतू. नंतर 'शेकडा' म्हणजे १००,८५,५६ असा आकडा उतरत ३६ वर आला. शेकडा म्हणजे ३६!

Lol ..... लेख आणि टायटल दोन्हीही.

पिंपल्स, पिगमेन्टेशन आणि टॅन गेल्यावर सुंदर दिसणं म्हणजे ............. राहु दे झालं.

पण टाइम स्टॅंप बदलला नाही.‌
वेमांना टाइम ट्रॅव्हल‌ येतं.
प्रतिसाद बदलल्याचे कळलं कारण काही वेळापूर्वी नवीन प्रतिसादावर क्लिक केल्यावर वेमांचा प्रतिसाद समोर आला.

'वेमांनी' स्वतःचा प्रतिसाद तब्बल सव्वा सात वर्षांनी संपादित केला आहे! >> मी ही तोच विचार करत होतो. ही चिटिंग आहे, वेमा Happy

लाईम = ईडलिंबु करेक्ट हर्पा. >> ओह! धन्यवाद. लहानपणी फक्त वर्णमालेत पाहिलेलं हे ईडलिंबू असतं तरी काय, हा प्रश्न इतक्या वर्षांनी सुटला. आता माझ्या पिंडाला कावळा शिवायला काही हरकत नाही. नाही शिवला तर ईडलिंबू ईडलिंबू म्हणा, शिवेल.

Pages