स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती - अभिवादन

Submitted by mansmi18 on 28 May, 2014 - 00:50

आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती

आज स्वातंत्र्यवीरांची जयंती. विनम्र अभिवादन.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावरकरांबद्दल लिहिल तेवढ थोडंच असेल. मला ते साहित्यिक म्हणून जास्त भावले.

कुणी कुठल्या पाट्या काढो किंवा नाही ,सावरकर मनामनात घर करुन बसलेत तेवढ खूप आहे..
वंदन..

मगाशी टिव्हीवर वाचलं, अंदमानात ती पाटी परत लावली जाणार Happy

स्वा. सावरकरांना विनम्र अभिवादन.

विचारवंत,

तुमची इमेल - मी सुद्धा त्याच स्वरूपाची मेल पी एम ओ वेबसाईट वर टाकली आणि लगेच त्यांनी शिलालेख परत बसवणार असल्याचं जाहीर केलं! कित्ती फास्ट काम ! Happy

अंदमानात ती पाटी परत लावली जाणार >>> हे वाचून बरं वाटलं. पण हे काम करण्यासाठी दूसर्‍या पक्षाच सरकार याव लागल.

स्वा. सावरकरांना अभिवादन.

>>मगाशी टिव्हीवर वाचलं, अंदमानात ती पाटी परत लावली जाणार>>

काय म्हणता! तुम्ही इथे असतात तर ताबडतोब हातावर साखर दिली असती Happy

>>तुमची इमेल - मी सुद्धा त्याच स्वरूपाची मेल पी एम ओ वेबसाईट वर टाकली आणि लगेच त्यांनी शिलालेख परत बसवणार असल्याचं जाहीर केलं! कित्ती फास्ट काम ! >>

धन्यवाद शरद, तुम्ही सुद्धा पी.एम.ओ. ला इ-संदेश पाठवल्याबद्दल. तुमच्या पण हातावर साखर. खरंच फास्ट काम आहे मोदी सरकारचे. मला वाटतं असे काही निर्णय अगोदरच घेतले गेले असणार. आता फक्त अंमलबजावणी होते आहे. कशाने का होईना, काम होणार हे महत्वाचे Happy

अवांतर :

विचारवंत आणि शरद, मी भारताच्या राज्यघटनेची अद्ययावत पीडीएफ मिळावी म्हणून तिथे अर्ज केलाय. ही कल्पना सुचवल्याबद्दल धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारणारे, बंदी म्हणून हिंदुस्थानात मोरिया बोटीने आणताना सागरात उडी मारून त्रिखंडात गाजणारे, परिणामी अर्धशतकी काळ्या पाण्याची शिक्षा अंदमानात भोगताना मरणप्राय देहदंड सोसत ‘कमला’ महाकाव्यास जन्म देणार्‍या विनायक दामोदर सावरकरांसारखे स्वातंत्र्यवीर यांची आज जयंती.

विनम्र अभिवादन!!

Pages