मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वत:चा विचार करता येत नाही वाटतं? >>> दाखले तुम्ही ब्लॉग चे देतात विचार तुम्हाला नाही आहेत गामा.. लक्षात असु द्या .. आम्हाला असल्या ब्लॉग च्या लिखाणची गरजच नसते दाखले द्यायला Biggrin
तुम्हाला वृत्तपत्रांचे दाखले मिळाले नाही तर तुम्ही असले ब्लॉग आणि जागरण कि काय सांकेतिक स्थळाचे दाखले देतात Wink

उदयन..,

भाऊ तोरसेकरांचा स्वत:च्या अनुदिन्या आहेत. तिथेही लिहितात.

बरं ते जाउद्या. दुकानं कोणाची बंद होणार ते कळलं का? नसेल कळलं तर कोणाची दुकानं चालू होती त्याचा तरी मागोवा घ्या. तेही माहीत नसेल तर शांत राहा.

आ.न.,
-गा.पै.

त्याना दाखल्याचीही गरज नsate. लोक असे म्हणतात , असे शेपुअत जोअदले की झाले.

लिहिलिहिलेले खोटे ठरलेच तर एडिटची सोयही अहे.

मग दाखला पुरावा यान्चीचिन्ता का करावी?

विचारवंत :-

ब्लॉग वर विचार मांडलेले असतात बातमी नव्हे .. विचारांना प्रमाण मानु नये बातम्यांना मानावे ..
विचारांबद्दल मतभेद असतात बातम्यांमधे नसतात.
आज मोदी हे प्रधानमंत्री झाले ही बातमी आहे त्याला प्रमाण मानावे पण कोणी असा विचार करत असेल तर त्याला प्रमाण मानु नये .
इतकेच म्हणने आहे.
असे विरोधी बरेच ब्लॉग आहे पण इथे मी त्या ब्लॉग वर लिहिले म्हणुन इथे तुम्हाला त्याचा दाखला देउन म्हणने मांडत नसतो..

उदय, मी इतकेच म्हणालो की विचार आहेत ब्लॉगवर पण ते वाचा तर नीट. मनन करा. मग चुक की बरोबर सांगा. निव्वळ ते विचार ब्लॉगवर आहेत म्हणून न वाचताच नाकारू नका. भाऊ तोरसेकर म्हणजे सुमार फेककर नव्हेत Happy

उदय मी वर काय म्हटले आहे ते वाचा की. माणूस कुठे लिहीतो यावरुन त्याच्या हुशारी आणि लायकी जज करु नका.

असो. आता तुमचे दोघांचे चालुद्या Wink

वाचा तर नीट. मनन करा. मग चुक की बरोबर सांगा. निव्वळ ते विचार ब्लॉगवर आहेत म्हणून न वाचताच नाकारू नका. >>>>
तुम्हाला काय वाटते .. काहीही न वाचता मी लिहीतोय का.. सगळे लेख वाचलेले आहे. हर्षोउल्हासात लिहिलेले आहेत तटस्थपणे नाही .. स्तुती आहे ठिक आहे पण त्यात कितपत वाहुन जाणे हे महत्वाचे..
स्तुती तर आपले "पगारे साहेब" देखील करतात .. Happy

मी दोन्हि बाजुचा नाही. कोन्ग्रेसवरचा राग म्हनुन विरोध करतो. इतके दिवस ओप्शन नव्हता. आमच्या गावाला लोक म्हनतात ओपोझ मधे जायच असल तर उमेदवार पडला पाहिजे. ओपोझ मधे जाउन उमेदवार पडला नाहि तर त्यान्ना कळत कुठुन मत दिली नाहि ते. मग पानि सोडत नाहित. लाइट कट करतात. उस घेत नाहित. सोसायटिच लेटर येत महिन्यात कर्ज फेडल नाहि तर जप्ति. दुध पन घेत नाहित. या वेळि महागाइन लोक लैच चिडले होत. त्यान्ना काय पगारपानि आहे ? या कोन्ग्रेसवाल्याना कसलि आलिय महागाइ ?

कोन्ग्रेसचि विचारधारा काय ते कोन दोन ओळित सान्गनार का ?

आता या बाबाला आम्हि मत दिलय ता उतुन जाउ नका. नवाज शरिफला बोलवल म्हनजे अदानिचा कछ्छमधला पोवरप्रोजेक्ट मधुन पाकला विज द्यायच कोन्ट्रेक्ट तर नाहि ना यात याचि खात्रि झालि पाहिजे.

http://www.truthofgujarat.com/modi-sent-invitation-nawaz-sharif/

http://www.financialexpress.com/news/adani-power-wants-narendra-modi-gov...

http://indianexpress.com/article/business/business-others/adani-mulls-ex...

आम्हि मत दिलय तर येड बनवु नका. मागच्याचि काय गत केलि हे ध्यानात ठेवा.

गेले सहा महिने आनि त्याआधि प्रचाराचि जि दिशा होती त्यावरुन वेगलच मत बनल होत. गुजरातचि डेवलमेण्ट झालि तशि आमची पण होईल अस वाटल. तसच मोदीनी शहजादेना आपल्या जवानान्चे सर काट्के नेल्याचि आठवन करुन दिली होति ते पन आवडल होत. मग नौवाजभाउना काशाला बोलवल ? सरबरजितसिन्गच्या बाजुने बिजेपी ने आन्दोलन केलम होत त्याच्या फ्यामिलीने पन विरोध केला आहे. गुजरातमधुन पाकिस्तानला विज कशाला देता ? ते काहि वेगळ नेशन नाही. आधि भारतात जिथ गरज आहे तिथ द्या. अदानि ला म्हणा कि पाकिस्तानमधे जाउन काय करायच ते कर की. इथ आम्हाला फसवल्यासारख होतय.

प्रचारात लश्कराचे मुद्दे, कडक धोअन, कनखर नेता, चिनचा धोका असे सगळे मुद्दे आले होते. साधारन असा समज झाला होता कि शपथ घेतलि कि लगेच लष्कराला आदेश देउन पाककाश्मिर एका दिवसात ताब्यात येइल. मग चीनने घेतलेला भाग दुस-या दिवशि. तिस-या दिवशि अरुनाचालवरौन चिनला आपला स्टेंड बदलालय्ला लावनार. चौथ्या दिवशि चिनमधुन पाकला जानार रस्ता ताब्यात. सहाव्या दिवशी पाकशी युध्ध. सातव्या दिवशि पाक शरन. आठव्या दिवशि तिबेटवर स्वारी. तिबेट भारताचा भाग. नवव्या दिवशि पाकिस्तानावर हवाई दलाचे तेज हमले आणि पाक शरन. पाकचा भारतात विलीनीकरण. दहाव्या दिवशि फगानिस्तान भारतात ! हे बघुन बर्मदेश आपोआप भारतात शरन येईल आनि बान्गलादेश पन रात्रिअपर्यन्त मेसेज पाठवेल.

पन हे वेगलंच घडलम.

अहो विचारवंत, व्यक्तिगत लिखाण फक्त इथक्या आयडींनी करू नये एकमेकांबद्दल.
इतरांबद्दल तर लिहावेच लागणार.
आणि पत्रकाराची तो कोणत्या वृत्तपत्रात लिहितो ही माहिती देणे ही काही चिखलफेक नाही.

नविन मंत्रीमंडळाचे स्वागत.
आमच्या कर्नाटकाला बरेच कन्सिडरेशन मिळाल्याने इकडे अगदी आनंदी आनंद आहे.
मोदींना पुढिल राजकीय प्रवासासाठी आणि देशाच्या भल्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.

महाराष्ट्राचे ६ आणि आमचे गोव्याचे श्रीपादभाऊ नाईक तर अपेक्षित होतेच! मात्र रिपाई रुसून बसले असावेत. शिवसेनेला पण जास्त जागा हव्या होत्या बहुतेक.

मोदीकडुन मायनोरिटीच्या अपेक्षा आणी त्याला ६ मुसलमान व्यक्तीनी मोदिची केलीली वकिली.

https://www.youtube.com/watch?v=Zs8bNyYgIgc

१ तासाचा कार्यक्रम आहे. वेळ असेल तर जरुर पहा. वेळ नसेल तर १८.३० पासुन ते २०.३० पर्यन्त जरुर पहा. त्यात आधुनिक राम राज्याची अपेक्षा आहे आणी त्याला सगळ्या लोकाकडुन दाद मिळते. कार्यक्रमात रजत शर्मा सोडल्यास १००% मायनोरिटी आहेत.

इलेक्शन मॅनिफिस्टो मध्ये लिहिलेले ब्लॅक मनी कॉज - पहिल्या निर्णयात मोदींनी SIT स्थापन केली सुद्धा. मोदी सरकारचे ह्या निर्णयाबद्दल अभिनंदन !

शाम भागवत जी.
इस्त्रायल तंत्रज्ञान वापरुन शेती करायचा प्रयोग शरद पवारांनी सुरु केला ही नविन माहिती कळाली.
याच तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कापसाची लागवड (अत्यल्प पाणी वापरुन) करण्याचे प्रयोग अकोल्याच्या पंजाबराव देशमूख क्रूषी महाविद्यालयात १९९५-२००२ पर्यंत सुरु होते. पण या प्रयोगांना म्हणावे तसे यश आले नाही. इस्त्रायल तंत्रज्ञान वापरुन झालेल्या कापसाची प्रत आणि विदर्भातील सामन्यतः होणारा कापूस यात बराच फरक होता. पुढे हे प्रयोग थंबविण्यात आले.
(साती: अवांतर बद्दल क्षमस्व.)

साहिल शहा,

दुव्याबद्दल धन्यवाद! Happy पूर्ण कार्यक्रम पहिला नाही. पण तुम्ही सांगितलेला १८३० ते २०३० हा भाग पहिला. त्यात जाफरभाई सरेशवाला याचं वक्तव्य ऐकलं. त्यावरून एक आठवलं.

जाफरभाई सरेशवाला यांनी अनेक हिंदुमुस्लिम दंगे बघितले आहेत. ते मोदींचे कट्टर विरोधक होते. मात्र एक तासाभराच्या भेटीनंतर त्यांचं मत पार बदलून गेलं. आज ते मोदींचे कट्टर समर्थक आहेत. का आणि कसं ते इथे वाचता येईल :

भाग १ : http://bhautorsekar.blogspot.co.uk/2013/05/blog-post.html
भाग २ : http://bhautorsekar.blogspot.co.uk/2013/05/blog-post_3.html

आ.न.,
-गा.पै.

स्वतःचे आयडी (खरी आयडेन्टिटी नाही) अबाधित ठेवून दुसर्‍या आयडींचे मागोवे काढण्यात काही(?) लोकांना एवढी मजा का वाटते काय की ? Uhoh
माबो नसुन लपाछपीचा खेळच जणू Wink
काही आयड्यांनी काही आयड्यांची एवढी धास्ती घेतलेली आहे की त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेच दिसतात (संताजी धनाजी प्रमाणे) Happy

मी येथे कोणत्याही आयडीचे खरे अथवा खोटे नाव, खरा अथवा खोटा आयडी याचा उल्लेख केलेला नाही याची नोंद घ्यावी आणि कोणत्याही प्रकारे माझ्यावर आगपाखड करायला येऊ नये. <अतिशय गंभीर चेहरा>

विषयांतराबद्दल क्षमस्व, चालू द्या सामना पुर्ववत ! Happy

लक्श्मीताई
अकरा दिवस. अठरा खुप होतात. तोपर्यन्त तर मन्गळावर पण स्वारी होईल.
( टायपिन्ग पण जमयाला लागले. स्मायलि कुठुन टाकता ? )

शिवसेना नाराज ,आरपीआय नाराज. येणार्या विधानसभेत पुन्हा एकदा आघाडीचं सरकार येणार .मोदींच्या डोक्यात फरक पडला आहे.सत्तेसाठी दहापंधरावर्षे वाट पाहणार्या पक्षांना मंत्रिमंडळ छोटे करुन मोदींनी त्यांची नाराजी औढवुन घेतली आहे.

Pages