जाळले नव्हते कुणी अन गाडले नव्हते.

Submitted by अगाध on 15 May, 2014 - 03:10

वागले ते चांगले..... जे वाटले नव्हते .
चांगले जे वाटले......ते चांगले नव्हते .

एक फोटो मायबापाचा पुरे होता ,
मी कधी बटव्यात पैसे ठेवले नव्हते

सोड जाऊ दे....तिला का दोष देऊ मी,?
आसवांचे थेंब सुद्धा थांबले नव्हते .

शेवटी कळला न माझा धर्म ही मजला
जाळले नव्हते कुणी अन गाडले नव्हते.

जेवढे उध्वस्त केले तेवढे झालो ...
वादळाचे मन कधीही तोडले नव्हते ...

ते तुझ्या गरजेप्रमाणे येत गेले बस
मी उगाचच शब्द गझले टाकले नव्हते..

नि:शब्द(देव)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते तुझ्या गरजेप्रमाणे येत गेले बस
मी उगाचच शब्द गझले टाकले नव्हते<<<

छान! असे खरेच झाले तर मजा येईल. Happy

एक फोटो मायबापाचा पुरे होता ,
मी कधी बटव्यात पैसे ठेवले नव्हते

सोड जाऊ दे....तिला का दोष देऊ मी,?
आसवांचे थेंब सुद्धा थांबले नव्हते .<<< वा वा!

मतलाही छान!

हृदय तोडणे हे हिंदी / उर्दूमधील 'दिल तोडदेना' सारखे वाटत आहे,. ती ओळ पक्क्या मराठीसाठी म्हणून वाटल्यास अशीही करता येईल, कृपया गैरसमज नसावा.

वादळाचे मन कधीही मोडले नव्हते

एकुण गझल आवडली.

बेफिकीर अगदी अचूक पकडलेत मला ....दिल तोडदेना' याच अर्थाने लिहायचा प्रयत्न होता ...तुम्ही सुचवलेला पर्याय आवडला बदल केलेला आहे ..धन्यवाद ....

बेफिकीर अगदी अचूक पकडलेत मला <<<

त्यात काही नाही हो! इतपत अचूक इथे कोणीही कोणालाही पकडतं! गझलेबाहेर जे इतर धागे असतात त्यावरच्या चर्चा वाचून बघा! Proud

वागले ते चांगले..... जे वाटले नव्हते .
चांगले जे वाटले......ते चांगले नव्हते

छान. असेही वाटले की निष्कर्षाला यायला कधी-कधी आपण घाई करतो.
आयुष्यभर चांगलं काय आणि वाईट काय हे कळण्यात वेळ जातो.
माझ्या मुलाला चांगलं काय वाईट काय हे सांगताना बहुतेकदा पंचाईत होते.

शुभेच्छा.