केलं की नाही?

Submitted by साती on 15 April, 2014 - 01:28

सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!

आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

आत्तापर्यंतचे जबाबदारी पार पाडलेले माबोकर-

अल्पना मुक्तेश्वर कुलकर्णी mandard
बेफिकीर साती अशोक.
अग्निपंख यक्ष वर्षा म
पराग मासोळी रमा.
लिंबूटिंबू इन्ना राहुलतेज
नीधप लंपन अश्विनी डोंगरे
Resham- dor अरुंधती कुलकर्णी Saee
शलाका पाटील राजसी हिम्सकुल
जम्बो, रिया. , झकासराव
गिरीकंद , मी नताशा, इश्श
dmugdha , विक्रमसिंह, निवांत पाटील
जाई. ललिता - प्रीति , दिपु
भरत मयेकर, आशिता १३०५, इंद्रधनुष्य
संदीप आहेर, राजू ७६, सारिका.चितळे
देवकी, केदार जाधव , ओवी ,
साधना, सुजा, भान
मी- केदार, नुतनजे, गजानन
के अंजली,तुमचा अभिषेक ,अक्षरी
ऑर्किड, पियु ,शर्मिला फडके
इब्लिस, सावली, सस्मित
आशिका, वैशाली, नताशा
अनघा वरदा हर्पेन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>पुण्याला कलमाडी स्कूल मध्ये मतदान थांबवल्याची बातमी आहे. कारण कुठलेही बटन दाबले तरी कॉंग्रेसलाच मत जातंय म्हणे!... बिच्चारे!!...काहीच दुसरा उपाय उरु नये का यांच्या जवळ?<<<>>
भाजपा वाले प्रचारवर उगाचच एवढा खर्च करातायेत आमच्याकडुन शिका काहीतरी..आम्ही कसं योग्य जागी पैसा गुंतवतो Proud

पराग, हो. गेले काही दिवस वणवण चालू आहे. आज बरेच दिवसांनी ऑफिसचं तोंड बघितलंय आता एखादा दिवस मध्ये येईन ऑफिसात. नंतर एकदम २५ तारखेलाच. ऑफिसचं शक्य होईल तितकं काम आधी करुन ठेवलंय. आजही उरका मारणार आहे. २५ नंतरही ढीग उपसायचेत. हे सगळ्यांनाच लागू होतं.

साती, आम्हाला पोस्टल बॅलेटचा फॉर्म दिला आहे. मी केव्हाचा भरुन ठेवला आहे ऑफिस आयडीकार्ड वगैरे लावून. पण अजून जमा करुन घेतलाच नाहिये त्यांनी. आता कधी देणार आणि पोस्टाने बॅलेट पेपर येणार आणि मी पाठवणार? वेळच उरला नाहिये. ज्यांना त्यांच्याच मतदार संघात ड्युटी आहे त्यांना मात्र त्या दिवशी करता येते.

काल ठाणे बाफवर कालचा अनुभव टाकला होता ......
"आज इ.ड्यु. वरुन येताना मी आणि गुटगुटीतने गोरेगाव स्टेशनवर येण्यासाठी रिक्षा केली. रिक्षावाला ३०च्या आसपासचा असावा. त्याने अचानक विचारले, "आपने खाना खाया क्या? सुबहसे आये हो ना?". आम्ही म्हटलं "हा सुबह ब्रेड खाया था, अब स्टेशनपे पहुचके कुछ मिलेगा तो खाएंगे". एव्हाना दुपारचे ३ वाजले होते. तो परत म्हणाला, "ऐसा मत करो. खाना वक्तपर खाओ. आपको कोईभी खाना खानेकी याद दिलाएगा नही, पुछेगा भी नही. इलेक्शनके दिन भी भूखे पेट काम नही करना." आम्ही दोघी त्याच्या मनापासूनच्या काळजीच्या जाणीवेने गप्पच झालो. पुर्णपणे अनोळखी भागातील अनोळखी माणसाकडून हे अपेक्षितच नव्हतं. ह्या सगळ्यावर कळस म्हणजे त्या हातावरचं पोट असलेल्या माणसाने आम्ही स्टेशनला उतरल्यावर दहाच्या दोन नोटा पुढे केल्यावर त्यातली एकच घेतली वर म्हणाला, "दस बस हो गये". त्याच्या वृत्तीची चुणूक पाहिली असल्याने माझ्या ताबडतोब लक्षात आलं की हा आमच्याच सारखा सर्वसामान्य नागरीक जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात सद्ध्या चालू असलेली मोठी अ‍ॅक्टिव्हिटी आणि त्यामागे लागू असलेले अगणित लोकांचे कष्ट (आमचे तर त्यामानाने काहीच नाहीत... पण झोनल, रिजनल लेव्हलचे निवडणूक अधिकारी तर गेले काही दिवस, महिने राबत आहेत) जाणून आहे आणि त्याच्यापरिने त्याची कृतज्ञता व्यक्त करु पहात आहे. आम्ही त्याला आग्रहाने पुर्ण पैसे घ्यायला लावले. पण आम्ही त्याला कधी विसरणार नाही. पुन्हा तो कधीही आम्हाला भेटणार नाहिये, त्याला आमच्याकडून कधीच काही फायदा होणार नाहिये....म्हणजे ही निरपेक्षता किती किंमती आहे!".

बेफिकीर, त्यांना हे कसं कळलं? कुणी कुणाला मत दिलंय आणि ते कुणाला गेलंय ते कळ्त नाही एकदा इव्हिएम सील झाल्यावर. सकाळी ६ वाजता मॉक पोल सुरु होतो. ५० मतं मॉक पोल म्हणून दिली जातात. त्यातच कळतं की सगळ्यांना बरोबर मतं दिली जात आहेत की नाही ते.

मॉक पोलमध्येच कळलं असेल की काँग्रेसला मतं जात आहेत तर ठिक आहे. मशिन बदलून मिळेल ताबडतोब. पण २ तासापेक्षा जास्त वेळ मतदान स्थगित झालं तर रि-एलेक्शन घेतलं जाईल Sad

बेफिकीर, त्यांना हे कसं कळलं? कुणी कुणाला मत दिलंय आणि ते कुणाला गेलंय ते कळ्त नाही एकदा इव्हिएम सील झाल्यावर. सकाळी ६ वाजता मॉक पोल सुरु होतो. ५० मतं मॉक पोल म्हणून दिली जातात. त्यातच कळतं की सगळ्यांना बरोबर मतं दिली जात आहेत की नाही ते.>>
धन्यवाद अश्विनी, ही महिती दिल्याबद्दल.

बेफिकीर, त्यांना हे कसं कळलं? <<<

सांगतो कसं कळलं ते!

आधी ते मला कसं कळलं ते सांगतो. इब्लिसांसारखे पिसाळलेले जे फेसबूकवर आहेत त्यांनी लिहिले की हत्तीचे बटन दाबले की कमळाचा दिवा लागतोय.

तसेच कलमाडी मतदान केंद्रात काहीही दाबले की पंजाचा दिवा लागतोय.

इब्लिस - धन्यवाद!

इब्लिस , अश्विनी कंड्या नाहीत.
हे खरेच बातम्यांत फिरतेय.
पण मे बी मूळात बातमीच खोटी असेल.

सकाळी सव्वासातला मतदान केले! Happy
खर तर मतास "दान" हा शब्द विचित्र चुकीचा वाटतो, दान करायला ती काय देणगी/फायद्याचि वस्तू/बाब आहे का? मी मत दिले, , माझ्या हितासाठी दिले, अमक्याच्या बाजुने टाकले इतके ठीके, पण "दान"? अमक्याच्या पारड्यात मताचे दान वगैरे बाबी चुकीच्या वाटतात. दान या शब्दामुले याचक-यजमान असे नाते प्रस्थापित होते ते नामन्जुर आहे. असो.

(जाता जाता, भाषाशुद्धि दरम्यान "मतदान" हा शब्द स्वा. सावरकरान्नी जरी आणला असेल, तरी माझे वरील मत बदलणे शक्य नाही, अन सावरकर असते तर त्यान्नी नक्कीच सुधारणा सुचवली असती याचि खात्री Happy )

साती, बातमी बद्दल काहीच म्हणायचं नाही कारण मी बघितली नाहिये. पण प्रत्यक्षात काय काळजी घेतली जाते ते सांगितलं Happy

काल आमच्याकडे IPL खेळायला गेलेल्या एका प्लेअरला ड्युटी आलीय Biggrin काही दिवसांपुर्वी तीच ऑर्डर ऑफिसने परत पाठवली होती. परत आली Uhoh

>>> परत आली <<<< लालपिवळे सेटिन्ग लावले नसेल म्हणून आली परत! Proud
तुम्ही आयपिएल खेळून बक्कळ पैका कमविणार मग आमाला आमचा हिस्सा नक्को क्काय? Wink

सकाळी ७:३० ची एशियाड पकडून ११ ला पुण्यात. दांडेकर पुलाशी वडील घ्यायला आले होते. परस्पर तसेच टिळक कॉलेजवर जाऊन मतदान करून साडेअकराला घरी.
दुपारी मुंबईस परत निघणार.
आमच्या स्लिपांवरचा पत्ता दांडेकर पूल झोपडपट्टी आलेला आहे आणि तरी स्लिपा आमच्याच घरी आल्या ही काय जादू आहे कळले नाही.

सकाळी ८ वाजता मतदान केले. धनकवडी परिसर. गर्दी नव्हती, थांबावे लागले नाही, पण वर्दळ चालू होती.

नशिबवान आहात. >> Happy सरकारी निर्णय आहे तसा महाराष्ट्र शासनाचा २८ मार्चचा कंपलसरी सुट्टीचा.. ही लिंक :

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Engl...

बर्‍याच कंपन्या माहित असून ह्याकडे दुर्लक्ष करतात. ह्यावेळच्या निर्णयामध्ये आय टी कंचा स्पष्ट उल्लेख आहे..

अशीच परिपत्रके/ निर्णय दिल्ली, कर्नाटक, तामिळ्नाडू सरकारने पण काढली आहेत.

सकाळी ७:४७ वा. सहपरिवार मतदान करून आलो. सकाळी अजिबात गर्दी नव्हती. सदाशिव पेठ. कसबा पेठ मतदार संघ.

नीरजे, ग्रेट...... Happy
अग स्लिप वर त्रोटक छापलेले असले तरी विभागवार याद्या असल्याने पत्त्यानुसार येऊ शकतात असे वाटते. Happy

>>>> बर्‍याच कंपन्या माहित असून ह्याकडे दुर्लक्ष करतात <<<<<<
कायदेशीररित्या "सुट्टी" या शब्दाबाबत पुरेसे स्पष्टीकरण नसल्याने (म्हणजे पूर्ण दिवस सुट्टी वा अर्धी सुट्टी इत्यादी) ही पळवाट वापरुन बर्‍याच /बहुतेक कम्पन्या मतदान करण्यापुरती अर्धा दिवसाची सुट्टी दिली असे दाखवतात. अन अर्थातच यावर कोणताही नोकर तक्रार करणे शक्य नसते, नाहीतर नोकरी जाईल. अन तक्रार येत नाही तोवर कारवाई नाही हा सरकारी खाक्या, सबब वर्षानुवर्षे ही बाब चालूच आहे. इतकेच नव्हे तर "सुट्टी" ही पूर्ण दिवसाची की कशी याचे स्पःष्टीकरण करण्याची गरज सरकारी बाबुन्ना वर्षानुवर्षे पडत नाही, ते का हे देखिल कोडेच आहे! असो. Happy
तसेच काही कम्पन्या "कन्टिन्युअस प्रोसेसच्या" नावाखाली पूर्ण सुट्टी देणे टाळू शकतात, मला नेमके क्लॉजेस माहित नाहीत, पण कन्ट्युनियस प्रोसेस्ची पळवाटही उपलब्ध असते!
त्यात पुन्हा कोणत्या प्रोसेस ला कन्ट्युनिअस म्हणावे कशाला नाही याबाबतही तितकिशी स्पष्टता नाहीच्च व कधीकाळी केलेल्या सर्टीफिकेशननुसार एकदा का कन्ट्युनियस प्रोसेसची कम्पनी असे जाहिर झाले की त्यात बदल होत नाही.

अर्थातच, मी कामावर हजर! Lol

लंपन> लिंक बद्दल धन्यवाद. बहुतेक कंपन्यांनी सुटी जाहिर केलिये, पण आम्हाला फक्त थोडा वेळ रजा घेण्याची मुभा देण्यात आलिये, पुर्ण सुटी नाही. असो सकाळीच कमी गर्दित मत देउन आलो, सुटी नसली तरी हरकत नाही.
बहुतेक मतदान हे एकच काम शासकिय कर्मचारी वेळेत सुरु करत असावेत, धन्यवाद त्याबद्द्ल त्यांचे. ७ वाजता सांगुन १० ला सुरु केलं असतं तर मला नसत जमलं

मतदान करून ऑफिसला आले. सुट्टी नाही, पण वेळेत सवलत होती, तेवढी पुरेशी होती. खडकवासला मतदारसंघ, सनसिटी केंद्र, सिंहगड रस्ता.
१५ दिवसांपूर्वी क्रमांक शोधून ठेवले होते, केंद्रावर गेल्यावर दुस-या मिनिटाला यादीत नाव मिळालं, चौथ्या मिनिटाला मतदान झालं, पाचव्या मिनिटाला बाहेर Happy यापुर्वीही नेहमीच इतक्या कमी वेळात मतदान झालेलं आहे. इतकी कार्यक्षम यंत्रणा बघून चकित व्हायला होतं नेहमीच.

साती, आम्हाला पोस्टल बॅलेटचा फॉर्म दिला आहे. मी केव्हाचा भरुन ठेवला आहे ऑफिस आयडीकार्ड वगैरे लावून. पण अजून जमा करुन घेतलाच नाहिये त्यांनी. आता कधी देणार आणि पोस्टाने बॅलेट पेपर येणार आणि मी पाठवणार? वेळच उरला नाहिये. ज्यांना त्यांच्याच मतदार संघात ड्युटी आहे त्यांना मात्र त्या दिवशी करता येते.>>>
आम्हीपण दरवेळी पोस्टल बॅलेटचा फॉर्म भरतो. त्याला काहीही उत्तर येत नाही. Uhoh

प्राची ---- पोस्टल बॅलेट ???? हे मी पहिल्यान्दाच ऐकत आहे ....जरा सविस्तर कळेल का ????

माझ नाव मतदार यादित आहे पण जाउ शकले नाही भारतात ....अतीव दु:ख , मनातच चड्फड....

आपण सगळ्यानी केले ह्याबद्दल मनापासुन आनन्द.....

मतदान केंद्रावर असणाऱ्या यादीत नाव नसेल तर खालीलपैकी एका शक्यतेच्या दृष्टीने तपास करा.

१. केंद्रावर असणाऱ्या मूळ मतदान यादीत नाव नाही, पण पुरवणी यादीमध्ये आहे. (केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे पुरवणी यादी मागणे)
२. पुरवणी यादीच केंद्रावर नसणे. (झोनल अधिकारी किंवा त्यावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुरवणी याद्या केंद्रावर तात्काळ पोचवल्या जातील, याची खात्री करून घेणे.)
३. अन्य मतदान केंद्रावर नाव स्थलांतरीत झालेले असणे. (ते केंद्र शोधून काढणे)

महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर बऱ्याच अंशी पुरवणी याद्यांसकट मतदार याद्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये सर्च करणे थोडेसे क्लिष्ट आहे, पण साधारण तासभर मेहनत घेतली तर वरील तीनही शक्यतांबाबत खातरजमा करून घेता येईल.

"तरीही मतदान करता येईल" अशा आशयाच्या पोस्ट गेले काही दिवस फिरत आहेत, पण त्यात काहीही तथ्य नाही. त्यांनी नमूद केलेला फॉर्म ७ हा मतदान यादीवरील नावांबद्दल आक्षेप नोंदवण्यासाठी आहे. खरेतर फॉर्म ६ हा नाव नोंदवण्यासाठी आहे, आणि फॉर्म ८ हा नोंदवल्या गेलेल्या नावातील काही तपशील चुकीचा असेल तर त्यात दुरुस्ती करण्यासाठी आहे.

नाव नसल्याचे आढळल्यास आजच्या आज फॉर्म ६ भरून, पुरवणी यादीत नाव समाविष्ट होणे आणि मतदान करायला मिळणे थोडे अशक्य वाटते. पण गेल्या निवडणुकीतील मतदान यादीत नाव आहे, आणि आता नाही अशा अनेक घटना असतील तर त्या सगळ्यांनी एकत्रितपणे जोरदार मागणी केली तर मतदान थांबवण्याचा निर्णय निरीक्षक किंवा सक्षम अधिकारी घेवू शकतात. अशा परिस्थितीत त्या केंद्रांवर काही दिवसांनी फेरमतदान घेता येवू शकते. पण यासाठी issue should should be blown up to that proportion and to the highest possible authority. यासाठी तातडीने थेट दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे हजारोंच्या संख्येने इमेल ताबडतोब रवाना करता येवू शकतील.

Pages