BEHIND EVERY FORTUNE THERE IS A CRIME

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 8 April, 2014 - 03:46

अनेकदा आपल्याला एखाद्या गोष्टीची उजळ बाजूच ठाऊक असते पण या उजळतेची काळी पार्श्वभूमी आपल्याला कळली तर किती धक्का बसतो याची उदाहरणे इथे देत आहे.

http://beftiac.blogspot.com/

एका चित्रपटाच्या निर्मितीखर्चात दोन चित्रपट
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_21.html

अशोक कुमार यांनी चित्रपटनिर्मिती करायला घेतली तेव्हा त्यांनी आपल्याच राज्यातील एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाला संधी दिली. त्या दिग्दर्शकानेही या संधीचे सोने केले आणि सुंदर चित्रपट बनविला परिणीता पण त्याबरोबरच अशोककुमार यांनी चित्रपटनिर्मितीकरिता दिलेल्या आर्थिक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत स्वत:च्या आवडीचा अजून एक चित्रपट अशोककुमार यांच्या पैशातूनच बनविला जो प्रचंड गाजला. त्यांनी खोटे हिशेब दाखवून परिणीताच्या निर्मितीखर्चात गाळा मारून अशोक कुमार यांची फसवणूक करून हे कृत्य केले होते. दिग्दर्शक बिमल रॊय यांच्या दो बिघा जमीन या चित्रपटाची ही चक्रावून टाकणारी निर्मिती कथा अशोक कुमार यांनी त्यांच्या जीवननैया या आत्मचरित्रात्मक पुस्तकात नमूद केली आहे.

डोळ्यात येते पाणी
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_633.html

१९६२ साली आपण चीन सोबत चे युद्ध हारलो तरी आपले जे जवान सीमेवर लढले त्यांचे मनोधैर्य उंचावण्याकरिता आणि जे रणांगणात शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता सरकारी पातळीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या समारंभाला साजेसे एक गीत बसविण्याची जबाबदारी संगीतकार सी. रामचंद्र यांच्यावर देण्यात आली. हे गीत लता मंगेशकर गाणार हे निश्चित झाले तरी ते लिहीणार कोण हा प्रश्न होताच. तेव्हा सर्व नामवंत गीतकार चित्रपटासाठी गीत लिहीण्यात व्यग्र होते अचानक सी. रामचंद्र यांच्यासमोर कवी प्रदीप यांचे नाव आले. कवी प्रदीप यांच्या तत्वज्ञानानी भारलेल्या गीतांना व्यावसायिक चित्रपटात फारशी मागणी नव्हती त्यामुळे सी. रामचंद्रांनी त्यांचेकडून बरेच दिवसात कुठलेही गीत लिहून घेतले नव्हते. जेव्हा या सरकारी कार्यक्रमाकरिता गीताची मागणी रामचंद्रांनी प्रदीप यांचेकडे केली तेव्हा कवी प्रदीप उसळून म्हणाले, "मानधन मिळायचे असेल तेव्हा तुम्हाला माझी आठवण येत नाही आणि अशा फुकटछाप सरकारी कार्यक्रमाकरिता मी गीत लिहून द्यावे असा तुमचा आग्रह का? मी हे काम मुळीच स्वीकारणार नाही."

मोठ्या कष्टाने सी. रामचंद्र यांनी कवी प्रदीप यांची समजूत काढण्यात यश मिळविले आणि सरतेशेवटी त्यांच्याकडून एक लांबलचक गीत लिहून घेतलेच. ऐ मेरे वतन के लोगो, जरा आंखमे भरलो पानी या गीताची ही सून्न करणारी बाजू काही वर्षांपूर्वी लोकसत्तात वाचली आणि एका वेगळ्याच अर्थाने डोळे भरून आले.

आता एक उलट उदाहरण (म्हणजे काळ्या प्रकरणाची रूपेरी बाजू)
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_1435.html

२००४ सालच्या विधानसभा निवडणूकीनंतर लोकसत्ता ने त्यांच्या वाचकांसाठी एक स्पर्धा घोषित केली सरकारकडून माझ्या अपेक्षा या विषयावर लेख लिहायचा. निवडक लेखकांना थेट मुख्यमंत्र्यांशी एक तास चर्चा करायची संधी असले भन्नाट बक्षीस होते. माझा लेख (http://www.loksatta.com/daily/20041224/lviv02.htm) ही निवडला गेला आणि जानेवारी २००५ मध्ये वर्षा बंगल्यावर श्री. विलासराव देशमुखांच्या माझ्या सह इतर आठ पत्र लेखकांनी भेट घेतली (http://www.loksatta.com/daily/20050121/mp03.htm). चर्चेच्या दरम्यान देशमुख साहेब अगदी रंगात येऊन एक किस्सा सांगू लागले.

ते म्हणाले, "तुम्हाला वाटतं, पण बरेचदा आम्हा राजकारणी लोकांना देखील नोकरशाहीचा भोंगळ कारभार दिसतो पण त्याविरुद्ध काही करता येत नाही. मागे एकदा मी शिक्षणमंत्री असताना माझ्या हस्ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम झाला. पुस्तक मिळाल्याची पोच म्हणून त्या कार्यक्रमात चक्क विद्यार्थ्यांचा अंगठा उमटवला जात होता. चौथीच्या विद्यार्थ्याचा अंगठा का घ्यावा का लागतो? त्याला सही करता येत नाही का? आणि तसे असेल तर मग तो विद्यार्थी वाचणार तरी काय? तर हे सगळे असे असून ही मी संबंधित अधिकार्‍याला जाब विचारू शकलो नाही कारण मलाही मर्यादा होत्या आणि आहेत."

एवढे बोलून देशमुखसाहेब थांबले. सर्व पत्र लेखक थक्क झाले होते. स्वत: मुख्यमंत्री च प्रशासनाविरुद्ध बोलत होते ही अतिशय catchy बाब होती.

त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन त्यांना याच प्रकरणाची दुसरी बाजू ऐकविली ती अशी:-

मी म्हणालो, "सर, आपण जसे पुस्तक वाटप केले होते अशाच एका कपडे / अन्न वाटप कार्यक्रमात बिहार येथे मी एक निरीक्षक या नात्याने एका सेवाभावी सामाजिक संस्थेतर्फे काम पाहिले होते. या कार्यक्रमात देखील ज्यांना वस्तूचे वाटप करण्यात आले अशांपैकी अनेक लहान मुले व स्त्रिया यांना लिहीता वाचता येत असूनही आम्ही त्यांना स्वाक्षरी करू दिली नाही व त्यांच्या अंगठ्याचे ठसे च नोंदीकरता घेण्यात आले कारण या नव्याने अक्षर ओळख झालेल्यांना स्वाक्षरी करायला दोन ते तीन मिनीटे लागतात आणि वाटप ज्यांच्या हस्ते व्हायचेय अशा व्यक्ती आपल्या सारख्याच मोठ्या पदावरील असल्याने त्यांना फारसा वेळ नसतो. अंगठा लावण्याचे काम काही सेकंदात होते म्हणून ते जास्त व्यवहार्य ठरते. तेव्हा याचा अर्थ असा नव्हे की ज्या विद्यार्थ्यांना आपण पुस्तके वाटली ती निरक्षर होती. तरी कृपया आपण संबंधित अधिकार्‍यांविषयी कुठलाही आकस मनात बाळगू नये व त्यांची अडचण समजून घ्यावी ही विनंती."

माझ्या या उत्तराने सारेच चकित झाले व मुख्यमंत्र्यांनीही आपल्याला ही माहिती नवीन व मोलाची वाटली असल्याचे कबूल केले त्याचप्रमाणे ते वस्तुस्थितीशी सहमत झाले..

खरं कारण काय?
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_8212.html

नोकरीनिमित्ताने केलेल्या माझ्या बेळगावच्या वास्तव्यादरम्यान माझा सिमेन्स, मुंबईच्या एका अधिकार्‍याशी परिचय झाला. हे गृहस्थ (ह्यांच्या नावाची इनिशिअल्स एसबी. पुढे ह्यांचा असाच उल्लेख केला जाईल) मोठे रसिक आणि कलासक्त (आणि मुख्य म्हणजे देव आनंद चे ग्रेट फॆन) त्यामुळे आमच्या गप्पा मस्त रंगायच्या. कलाक्षेत्रातल्या अनेक मंडळींना ते जवळून ओळखतात हे मला त्यांच्याशी बोलताना समजले. त्याचे कारण विचारताच त्यांनी सांगितले ती अमूक एक गायिका - ती ह्यांची आत्या (इथे नाव लिहीत नाही पण पुढे जे वर्णन येईल त्यावरून चाणाक्ष वाचक ओळखतीलच म्हणा..).

आता एसबी साहेबांचा स्वभाव एकदम मनमोकळा त्यामुळे माझ्या मनात अनेक वर्षांपासून खदखदत असलेला प्रश्न त्यांना विचारावा असे मला वाटले. आणि अगदी सहजच बोलल्यासारखा मी त्यांना म्हणालो, "एसबी साहेब, तुमच्या आत्याचा आवाज अगदी हुबेहूब लता मंगेशकरांसारखा आहे, पण लताजींच्या तूलनेत त्यांनी फारच थोडी गाणी गायलीत. गेली अनेक वर्षे मी असं ऐकत / वाचत आलोय की लताजींनी राजकारण करून तुमच्या आत्याबाईंना पुढे येऊ दिलं नाही. याशिवाय काही काळापूर्वी वर्तमानपत्रात तुमच्या आत्याबाईंची मुलाखत वाचली तेव्हा त्यांनी या गोष्टीचा साफ इन्कार केलाय. त्या म्हणतात ’माझ्या व्यावसायिक पिछाडी बद्दल दुसर्‍या कुणाला जबाबदार धरले जाऊ नये. मी मागे पडले कारण माझे लग्न झाले, संसार चालु झाला. ज्याप्रमाणे एखादी नोकरी करणारी स्त्री लग्नानंतर प्रापंचिक जबाबदार्‍यांमुळे नोकरी सोडते तितक्याच सहजतेने मी गाणे सोडले’. मग आता तुम्हीच सांगा खरं कारण काय? तुमच्या आत्याबाईंची कारकीर्द नेमकी कशामुळे संपुष्टात आली?"

एसबी साहेब उत्तरले, "त्याचं असं आहे चेतन, ही दोन्ही कारणं तितकीच खोटी आहेत. खरी गोष्ट अशी की आमच्या आत्याचे नाव त्याकाळच्या एका नामांकित हिन्दी-मराठी चित्रपटांच्या संगीतकाराबरोबर (यांचंही नाव इथे मी लिहू शकणार नाही पण वाचक अंदाज लावू शकतात) जोडले जाऊ लागले होते व त्यात काही प्रमाणात तथ्यदेखील होते याची प्रचीती आल्यावर आत्याच्या यजमानांनी आमच्या आत्याचं गाणं बंद करायला लावलं. आता आमची आत्या मुलाखतीत तिची व्यावसायिक कारकीर्द संपुष्टात येण्याच हे खरं कारण कुठल्या तोंडानं सांगणार?"

हुशार विद्यार्थी (?)
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_8435.html

वर्तमानपत्रात कुठल्याही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल काही छापून आलं की माझी आई ते मला मुद्दाम वाचून दाखविते मग त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, त्या विद्यार्थ्यांना काहीच साधन उपलब्धता नसताना त्यांनी मिळविलेलं अपार यश आणि त्या तूलनेत माझ्याकडे सारं काही असताना मी कसा अपयशी वगैरे गुर्‍हाळ दोन चार दिवस तरी आमच्या घरी चालतंच.

एकदा असंच पेपरात नाव आलं कचरू वाघ या विद्यार्थ्याचं. या गरीब विद्यार्थ्याने दिवसभर कष्टाची कामे करून, रात्रशाळेत अभ्यास करून बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलं होतं. झालं.. कचरूच्या नावाचा जप आमच्या घरी चालु झाला. अर्थात ह्यावेळी जप दोन दिवसातच थांबला कारण वर्तमानपत्राच्या पुढच्याच अंकात बातमी आली ती अशी की कचरूने स्वत: पेपर लिहीलेच नव्हते तर स्वत:ऐवजी पूर्णवेळ शिक्षण घेतलेल्या एका हुशार अल्पवयीन विद्यार्थ्याकडून ते लिहून घेतले होते.

पुढे काही काळानंतर अशीच एका पुण्यातल्या विद्यार्थिनीची (तिचं नाव आता आठवत नाही) बातमी आली - ती सीए ची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची. तिचे लगेच सत्कार वगैरे ही झाले पण दोन दिवसानंतर उघड झालं की ती प्रत्यक्षात अनुत्तीर्ण झाली होती तरी तिने खोटे निकालपत्र वगैरे गोष्टी अगदी व्यवस्थित पैदा केल्या व सर्वांना दोन दिवस चकविले.

या सर्वांवर कडी म्हणजे विद्या प्रकाश काळे ही युवती. ही प्रत्यक्षात खरोखरच अतिशय हुशार आहे. आता ही साधारण पस्तीशीची असेल पण वयाच्या जेमतेम अठराव्या वर्षापासून ती चोर्‍या करण्यात पटाईत आहे. वेळोवेळी तुरूंगात ही गेली आहे तर अनेकदा पोलिसांना तिने गुंगारा ही दिला आहे. आता तिने स्वत:ची मोठी टोळीही स्थापन केली आहे. तुरूंगातील वास्तव्यात तिने आपल्या हुशारीच्या जोरावर कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले आहे. अर्थात वकील झाल्यावर ती पुढे अनेकदा पोलिसांकडून पकडली गेली असली तरी तिला फारशी कडक शिक्षा होऊ शकली नाही याचे सारे श्रेय तिच्या वकिली कौशल्याला जाते.

तिच्या विषयीची एक बातमी तुम्ही इथे वाचू शकता :-

http://72.78.249.126/esakal/20100522/5736895754452919648.htm

इतर अनेक चोर्‍यांप्रमाणे हिने वय देखील चोरलेले दिसतंय.. बातम्यांमध्ये वय कमी दाखवलंय..

http://www.punenews.net/2010/05/lawyer-woman-run-gang-arrested-for.html

http://www.expressindia.com/latest-news/woman-among-five-arrested-for-ro...

http://news.in.msn.com/crimefile/article.aspx?cp-documentid=3924613&page=10

http://news.indiainfo.com/c-83-144953-1263496.html

विद्याचा सुरूवातीच्या काळातील पराक्रम (मोटरसायकलकरिता लहान मुलीचे अपहरण):-

http://www.indianexpress.com/ie/daily/19971213/34750503.html

काव्या विश्वनाथनची वाङ्मयचोरीची कबुली
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_596.html

काव्या विश्वनाथन या किशोरवयीन भारतीय वंशाच्या लेखिकेने आपण वाङ्मयचोरी केल्याचे कबूल केले आहे. तिच्या 'हाऊ ओपल मेहता गॉट किस' आणि 'गॉट वाइल्ड अँड गॉट अ लाइफ' या पुस्तकाचे हक्क अमेरिकन प्रकाशन कंपनी लिटल ब्राऊनने पाच लाख डॉलरना खरेदी केल्यानंतर अनेक वृत्तपत्रांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली होती.

परंतु तिच्या या पुस्तकांचे मेगॅन एफ मॅककॅर्फ्टी यांच्या 'स्लोपी र्फस्ट्स' आणि 'सेकंड हेल्पिंग' या दोन्ही पुस्तकांशी सार्धम्य असल्याचे उघडकीस आल्याने काव्याने आपली वाङ्मयचोरी कबूल केली. परंतु, ते योगायोगाने घडून आले, शाळेत असताना ही पुस्तके वाचल्याने लिहिताना त्यातील भाग अनवधानाने आला, अशी पुस्तीही तिने जोडली.

ही वर्ष २००६ ची घटना आहे.

दैनिक लोकसत्तामधली बातमी इथे वाचा (प्रथम फॊन्ट लोड करून घ्या):-

http://www.loksatta.com/old/daily/20060427/mp05.htm

चतुर गुन्हेगाराने नामवंत महिला पोलीस अधिकार्‍याला चकविले.
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_22.html

बिकीनी किलर या नावाने कुप्रसिद्ध असणारा चार्ल्स शोभराज गुन्हेगारी पेक्षाही जास्त स्मरणात राहिला तो त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळेच. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी चार्ल्स दिल्लीच्या तिहार तुरुंगात होता तेव्हा त्याच्या संभाषण कौशल्याने साक्षात किरण बेदी देखील अतिशय प्रभावित झाल्या. त्यांनी त्याला त्याच्या ज्ञानाचा (?) प्रसार करण्यासाठी इलेक्ट्रॊनिक टाईपरायटरसह इतर अनेक अद्ययावत सुविधा तुरूंगात पुरविण्याची व्यवस्था केली. तरी बरं त्याकाळी संगणक किंवा इंटरनेट नव्हता नाहीतर या गोष्टीदेखील त्याला सहज मिळाल्या असत्या. प्रत्यक्षात काहीही लिखाण वगैरे न करता या महाभागाने तुरूंगातील आपलं वास्तव्य फक्त आरामदायी करून घेतलं. आपल्याला चार्ल्सने बनविले हे किरण बेदींच्या फारच उशिरा लक्षात आले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकाच धाग्यात बरेच संदर्भ दिलेले दिसतायत. एक-एक सावकाशीने वाचायला लागतील. “बिहाइंड एव्हरी सक्सेस, देअर इज अ क्राईम” या अवतरणा बद्दल काहीच दुमत असायचे कारण नाही. जे “आऊट ऑफ वे” जाऊन कामं करतात त्यातच बरयाच वेळा “क्राईम” दडलेला असतो. ‘रांग’ मोडून घुसखोरी केली की नंबर आधी येवून यश मिळतेच. त्याचे कौतुक होते यातच पुढील “क्राईम”चा टॉवर उभा राहतो. आणि आपल्याकडे गुन्ह्यापेक्षा यशाचेच कौतुक होते. त्याला डोक्यावर चढवले जाते. आपल्या अवती भोवती अशी हजारो उदाहरणे आहेत.

तुमचा मा. मुख्यमंत्र्याबरोबरचा सुखद अनुभव म्हणजे वाळवंटातील ओऍसिसच आहे.

माफ करा पण लेखाचा उद्देश फक्त तुमच्या ब्लॉगची लिंक देणे इतकाच दिसतो आहे आहे.
"इथे वाचण्याऐवजी तिकडे जाऊन वाचा !" असे बरेचदा या लेखात आहे.
हे मायबोलीच्या धोरणाबाहेर असल्यामुळे हा धागा बंद करतो आहे