केरळच्या ट्रीपमध्ये पाहिलेली विविध ठिकाणे व त्याबद्दलची माहिती

Submitted by प्रमोद् ताम्बे on 27 March, 2014 - 12:36

केरळच्या ट्रीपमध्ये पाहिलेली विविध ठिकाणे व त्याबद्दलची माहिती

Itinerary
Day 1, Wed (Oct 16): Arrive At Kochi
Day 2, Thu (Oct 17): Kochi Sightseeing
Day 3, Fri (Oct 18): Kochi To Munnar (3 Hr 30 Min, 124 Km)
Day 4, Sat (Oct 19): Munnar Sightseeing
Day 5, Sun (Oct 20): Munnar To Thekkady (3 Hr 30 Min, 100 Km)
Day 6, Mon (Oct 21): Thekkady To Alleppey (4 Hrs, 165 Km)
Day 7, Tue (Oct 22): Alleppey To Kovalam (5 Hr 30 Min, 180 Km)
Day 8, Wed (Oct 23): DAY TRIP TO KANYAKUMARI

City Hotel
Kochi
(2nt: Oct 16-17) Hotel Diwan Court
(2 Standard Room A/C)
Munnar
(2nt: Oct 18-19) Great Escapes Resorts
(2 Deluxe Room)
Thekkady
(1nt: Oct 20) Hotel Ambadi
(2 Standard Cottage)
Alleppey
(1nt: Oct 21) Deluxe Houseboat (Lakelands cruises)
(1 2-Bedroom Complete Houseboat (4 Adults)
Kovalam
(2nt: Oct 22-23) La Promonade
(2 Standard Room AC)
Day 9, Thu (Oct 24): Depart From Kovalam

कोची / कोचीन : मुक्काम Hotel Diwan Court
Divans Road, Pallimukku,
Ernakulam (Cochin), Kerala - 682 016
Phone: 0486 9222481, 9222483
मुन्नार : Great Escape Resort Near Munnar (10Kms.away)
१) Nayamkad Waterfall
२) Chinnar Waterfall
३) Luckam Waterfall
४) Devikulam Tea Garden
५) Mattupetty Dam
६) Wagavurrait Valley Point
७) Eco Point
८) Elephant Point
९) Valley View Point
Ambadi Hotel Tekkadi मसाले उत्पादन
अल्लेप्पी : बोटीवर एक दिवस मुक्काम Back Bay Water
एर्नाकुलम : मुक्काम La Promonade ह्या पंचतारांकित हॉटेल मध्ये

पहिला दिवस बुधवार १६ ऑक्टोबर २०१३ : रात्री ८.१५ कोची येथे आगमन व रात्री हॉटेल दिवाणवर मुक्काम. एका दाक्षिणात्य हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण.
दुसरा दिवस गुरुवार १७ ऑक्टोबर २०१३ : हॉटेल दिवाणवर सकाळचा नाश्ता झाल्यावर डच पॅलेस,जेविश सिनगॉग,सेंट फ्रान्सिस चर्च व चीनी मासेमारीची जाळी पहाणे व तेथील समुद्रात सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पहून रात्री हॉटेलवर मुक्काम.
तिसरा दिवस शुक्रवार १८ ऑक्टोबर २०१३ : हॉटेल दिववचा सकाळचा नाश्ता झाल्यावर मुन्नारकडे प्रयाण व मुन्नार पासून १५ किलोमीटरवर असलेल्या ग्रेट एस्केप रिसॉर्ट तेथे आगमन व हॉटेलवर चेक इन करून नंतर मुन्नार येथील प्रेक्षणीय स्थळे पहाण्यास जाणे. ब्लॉसम राष्ट्रीय पार्कला भेट,दुपारी चहा संग्रहालयास भेट व नंतर पोथामेडू व्हयू पॉईंट पहाणे रात्री हॉटेलवर मुक्काम.
चौथा दिवस शनिवार १९ ऑक्टोबर २०१३ : मुन्नार येथील एर्वीकुलम राष्ट्रीय उद्यान ,गुलाब उद्यानपाहून सायंकाळी परत येऊन रात्री हॉटेलवर मुक्काम.
पांचवा दिवस रविवार २० ऑक्टोबर २०१३ : मुन्नार जवळच्या ग्रेट एस्केप रिसोर्टवर सकाळचा नाश्ता झाल्यावर मुन्नार ते टेकडी हा १०० किलोमीटरचा ३ तास ३० मिनिटांचा प्रवास करून टेकडी येथे आगमन व हॉटेलवर चेक इन करून नंतर इच्छा असल्यास वेगळे पैसे भरून पेरिवार लेकवर बोटीवरील सफरीसाठी जाणेव बोटीवरुन जंगली हिंस्त्र प्राणी पहाणे. रात्री हॉटेलवर मुक्काम.
दिवस सहावा सोमवार २१ ऑक्टोबर २०१३ : टेकडी येथील हॉटेलवर सकाळचा नाश्ता झाल्यावर टेकडीहून आलेप्पीकडे प्रयाण. आलेप्पी येथे बोटीवरील हॉटेलवर दुपार मजेत घालवणे.बोटीवरुन सुंदर खेडी,तेथील भातशेते,छोटी छोटी चर्चेस्,मंदिरे आणि खेड्यातील लोकांचे दैनंदिन जीवन जवळून पाहून रात्री बोटीवर मुक्काम करणे.
दिवस सातवा मंगळवार २२ ऑक्टोबर २०१३ : बोटीवरील हॉटेलमध्ये सकाळचा अप्रतिम चविष्ट नाश्ता झाल्यावर अलेप्पिहून कोवलमकडे कूच करणे.कोवलम येथील ला प्रोमोनेड हॉटेलमध्ये येऊन चेक इन करून त्रिवेंद्रमला प्रयाण (११ वाजता) व तेथील जगप्रसिध्द्ध पद्मनाभस्वामी मंदिर पहाणे व दीपगृहास भेटदेऊन परतल्यावर रात्री कोवलम येथील ला प्रोमोनेड हॉटेलमध्ये मुक्काम.
आठवा दिवस बुधवार २३ ऑक्टोबर २०१३ : ला प्रोमोनेड हॉटेलमध्ये सकाळचा भरगच्च नाश्ता करून झाल्यावर कन्याकुमारीस जाणे व तेथे बोटीने समुद्रात खडकावर बांधलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकास व तेथील संग्रहालयास भेट,व पुढे त्याच बोटीने विवेकानंद स्मारकाजवळच असलेल्या तामिळनाडूतील सुप्रसिद्ध ‘ तिरुवलूवर ‘ ह्या अविस्मरणीय महाकवी व लेखकाचे भव्य दगडी स्मारक (पुतळा) पाहून तिरूवलूवर बिचवर फेरफटका मारून सायकाळी कोवलम येथे परतून रात्री ला प्रोमोनेड हॉटेलमध्ये मुक्काम.
दिवस नववा २४ ऑक्टोबर २०१३ : कोवलम येथील ला प्रोमोनेड हॉटेलमध्ये सकाळचा भरगच्च नाश्ता झाल्यावर चेक आऊट करून मुंबईस परतीच्या रेल्वेप्रवासाठी प्रयाण व २५ ऑक्टोबरला सायंकाळी ६.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आगमन

अल्लेप्पी
केरळला देवांची भूमी असे म्हटले जाते , त्यातही अल्लेप्पी किंवा अलाप्पूझा हे केरळमधील एक पर्यटकांच्या प्रथम पसंतीचे व अत्यंत आवडते आणि लाडके असे ठिकाण आहे. अल्लेप्पीला चहूबाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले असून याला ‘ पूर्वेचे व्हेनिस ’ म्हणूनही ओळखले जाते. येथील आसमंतात निसर्गाने आपला अमूल्य नजराणा जागोजागी मुक्त हस्ते उधळला असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते.अरबी समुद्र व त्याला चहूबाजूंनी येऊन मिळणार्याि सहा आडव्या उभ्या नद्यांमुळे तयार झालेल्या जाळ्यांत अल्लेप्पी वेढले गेले आहे. येथे सहा गोड्या पाण्याच्या नद्यांखेरीज अनेक प्रवाह,तलाव,विस्तीर्ण सरोवरे, जलाशय व ओढे एकमेकांना छेदतात व त्यामुळे त्यांच्या मध्ये जे पाण्याचे खूप रुंद पट्टे (कॅनाल) बनतात त्यातूनच बोटीतून पर्यटकांना सफर घडवली जाते. सभोवतालच्या मनोहर निसर्गाचे मन लुभावणारे अप्रतिम व अवर्णनीय सृष्टी सौंदर्य पाहतांना भान हरपून जाते,तहान-भूक विसरायला होते.कितीही डोळे भरून पाहून घेतलेतरी मनाचे तृप्तीच होत नाही. परतूच नये असे वाटते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केरळला व त्यातही अल्लेप्पी येऊन हा अलौकैक अनुभव स्वत: प्रत्यक्ष घ्यावाच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही संपूर्ण ट्रीप आमची आम्हीच प्लॅन केली (अगदी रेल्वेचे रिझर्व्हेशन करणे,ठिकठिकाणची हॉटेल्स बुक करणे,कोची ते एर्नाकुलम पर्यन्त रोडने करावयाच्या प्रवासासाठी ए.सी.इनोव्हा गाडी बुक करणे ,अल्लेप्पी येथे एक दिवसासाठी बोट रिझर्व्हेशन अशा सर्व गोष्टी आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून घरात बसून केल्या. ट्रीपचा संपूर्ण खर्च रेल्वे तिकिटे,हॉटेल्स,जेवण-खाणे,नाश्ता,ए.सी. कारचे भाडे इ.सह माणशी २५,०००/-आला.