एका लग्नाची (दु:खद) गोष्ट

Submitted by Phoenix२०१४ on 13 March, 2014 - 03:44

लग्न हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा. मायबोलीवर सामाजिक समस्यांवरच्या धाग्यावर लग्नाबद्दल वाचायला मिळाल आणि मग वाटल कि आपला अनुभव इथे का टाकू नये!

मी सध्या ३३ वर्षांचा विवाहित असून पुणेस्थित एका IT कंपनीत काम करतो. मी पुणेकरच ! एका सर्वसामान्य घरातून लहानाचा मोठा झालो. करियरमध्ये सुरुवातीला खूप कष्ट करून बरेच चढउतार होऊन शेवटी आयटी मधे स्थिरवलो आणि लग्नासाठी नाव नोन्दवल्यावर यथावकाश मुलींची स्थळ येऊ लागली. मुलांच्या शाळेत असल्याने आधी शाळा नि नंतर कॉलेज मधे देखील माझया ग्रूप मधे फक्त मुलेच होती. पुढे करियर ची गाडी स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात आपल्याला मुलगी कशी हवी वगैरे विचार कधीच केले नाहीत. पण जसजस चहा पोहे सुरू झले तसा मी सीरीयस झालो आणि एक अनामिक भीतीही वाटू लागली. एक-दोन भेटिंवर संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेण फार जिकीरीच वाटू लागल आणि मी उगाचच अतिसावध आणि पर्यायाने अतिचिकित्सकपणे वागू लागलो. केवळ भीतीपोटी मीअनेक चांगली स्थळ नाकारली आणि काही नकारही पाचवले. त्याजोडीला कधी मुलगी आवडली तरी पत्रिका जुळायची नाही तर कुठे गुण नाहीतर नाड. नंतर बरेच महिने लग्नाचे योग नाहीत म्हणून गेले. अस वर्ष-दीड वर्ष निघून गेल आणि हळूहळू मला frustration येऊ लागल आणि सय्यम सुटू लागला. शेवटी घरातूनही दबाव यायला लागला, मित्रदेखील टिंगल करू लागले. आता मोजून काही ठराविक मुली बघ आणि त्यातून पसंत कर अस जवळचे नातेवाईक म्हणू लागले. अशातच शेवटी मी एक मुलगी पहिली, तिला एकदाच भेटलो आणि काहीश्या घाईनेच पसंती दिली आणि इथेच चुकलो.

लग्न ठरल्यावर जेव्हा आम्ही पहिल्यांदाच बाहेर फिरायला गेलो तेव्हा मुलगी मला जास्त जाड वाटली. मुलगी दाखवायच्या कार्यक्रमाच्या वेळी साडीमुळे मुलगी जाड आहे ते समजल नव्हत आणि नंतरच्या भेटीच्यावेळी माझ्या लक्षत आल नाही. अर्थात तो माझ्यादृष्टीने फार महत्वाचा मुद्दा नव्हता. पण मी जसजसा तिच्याशी बोलत गेलो आणि आमचा संवाद होऊ लगाल तसतस माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. माझ्या लक्षात आल की हिची आणि आपली maturity लेव्हल अजिबात मॅच होत नाही. इतर अनेक लहानसहान गोष्टींमधला तिचं अज्ञान आता मला जाणवत होतो. एक लहानस उदाहरण द्यायचं झाल तर माझ्या होऊ घातलेल्या पत्नीला पु ल देशपांडे यांची पुस्तक सुद्धा माहिती नव्हती. अशा इतर अनेक लहान सहन बाबी पहिल्या 5-6 दिवसातच उअघडकीस आल्या. अशातच एक दिवस मला तिच्या चेहर्यावर आधी लक्षात न आलेले काही डाग दिसले नि मी बाबरून गेलो. मुलीचं दिसणं हा फार महत्वाचा भाग नसला तरी माझ्याही काही कमीतकमी अपेक्षा होत्या. लग्न ठरायच्या वेळचा 1-2 भेटिंमधे बराचसा भासच निर्माण केला गेला होता अस वाटू लगाल. एकूणच मुलीच्या निवडीच्या बाबतीत मी घोड चूक केली होती हे आता माझ्या ध्यानात आल होत. मी हळूहळू डिप्रेशन मधे जाऊ लागलो आणि मला कशातच रस वाटेना. तशातच काही घरगुती अडचणींमुळे लग्न ताबडतोब एका महिन्यात करायाच ठरलं आणि माझ्या काळजात धस्स झाल. इकडे माझ्या घरच्यांना ह्या सगळ्याबद्दल माहिती असण्याचा संबंधच नव्हता कारण त्याच्या मते मी आनंदात होतो. माझी उत्साही बहीण दादाच लग्न म्हणून आनंदात होती तर आई बाबा सुनेच्या स्वागतासाठी सज्ज होते. वय वर्ष ८० असलेली माझी लाडकी आजी डोळे मिटण्याआधी नातसून बघायला मिळणार म्हणून समाधानात होती. जवळच्या नातेवाईकांमधे मी खूप लाडका आणि त्यामुळे त्यांच्याही उत्साहाला उधाण आल होत. पण ह्या सगळ्यात मी मात्र कुठेही नव्हतो...मी फक्त दिसागणिक सग्यासोयर्यांच्या इच्छा अपेक्षानच्या ओझ्याखाली दबला जात होतो. पुढच्या 2 दिवसात बैठक पण झाली आणि मग प्रचंड दडपण आल. अनेक ओळखीचे लाग्नावरून माझी चेष्टा करायचे त्याच्या गुदगुल्या होण सोडाच पण अक्षर्ष: नको नको व्हायच. मला प्रचंड नैराश्य आल.

मला माझया होणार्या बायाकोबरोबर बाहेर फिरायला जाणही नकोस वाटू लगाल. शेवटी न राहवून मी माझ्या एका मित्राला हे सगळ बोललो. त्याने मला हे लग्न मोडण्याचा उचित सल्ला दिला आणि त्यात काहीही गैर नाही हेही समजावलं. पण माझ्यासारख्या conservative कुटुंबात वाढलेल्या मुलासाठी हे खूप अवघड होत. त्या रात्री मी रात्रभर मनाची तयारी केली. मला तो दिवस आजही आठवतोय. दुसर्या दिवशी companytun तब्बेतीच कारण देऊन लवकर घरी परत आलो. घरी आल्यावर सगळ्याना समोर बसवून कसबस माझया मनातल बोललो. घरच्यांना हा अनपेक्षित धक्काच होता. आज्जी डोक धरून बसली आणि आई रडू लागली, वडिलांना office मधून लवकर बोलावून घेतलं. आता घरचेही अवघडले कारण जरी लग्न ठरून फक्त १० दिवसच झाले होते तरी महिन्याभरात लग्न उरकायच असल्याने गोष्टी बर्याच पुढे गेल्या होत्या आणि लग्नाची सर्व बोलणी देखील झाली होती. त्यामुळे सगळ्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसच मुलीच्या वडिलांना BPचा त्रास आहे तेव्हा त्याना काय धक्का बसेल वगैरे भीती घातली. घरच्यानी ओळखीच्या कोण्या एका महाराजांना फोन करून रडत रडत घडला प्रसंग सांगितला. त्यानी फोनवरून समजूत काढून सर्व काही ठीक होईल काही काळजी करू नका असा सल्ला दिला. आता माझाही सुरुवातीचा जोर आपोआप थोडा कमी झाला सगळा गुंता होऊन मी गप्प बसलो मग घरच्यानी मझीच समजूत काढली आणि तो विषय तिथेच संपला. माझच लग्न मोडण्याचा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न फसला. त्या दिवसानंतर रोज अगदी आजपर्यंत मी स्वतःला त्यासाठी शिव्या शाप देतो. जर मी लावून धरल असत तर तेव्हाच माझ ठरलेलं लग्न मोडून पुढचा अनर्थ टळला असता.

हा प्रसंग घडून गेला आणि मी मात्र आतून जळत राहिलो. कुठेतरी लांब पळून जवस वाटू लागल पण तेवढीहि धमक दाखवू शकलो नाही. टिकटिक करत काटा पुढे सरकत होता आणि पुढच्या १०-१२ दिवसात मी बोहल्यावर चढलो सुद्धा. म्हणता म्हणता माझ लग्नही झाल आणि मग हळूहळू उरलेल्या आशा अपेक्षनचि शकल उडाली. माझया बायकोला साधा हिशेबही चटकन करता येत नाही आणि चार चौघात काय कस बोलाव वागाव तेही काळत नव्हत. ह्या सगळ्या मधे मे पुरता फसलो होतो आणि माझया हाती काहीही पडल नव्हत. 21 व्या शतकात स्वत:च्या मधुचंद्राला रडणारा मी एकमेव पुरूष असेंन. मी बरेचदा स्वताला सावरण्याचा आणि ह्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. त्यातल्या त्यात माझया दैवाने माझी एकाच बाबतीत आब राखली होती ती म्हणजे माझया बायकोचा स्वभाव वाईट नव्हता. पण नुसत्या चांगल्या स्वभावाने संसारात रस कसा निर्माण होईल. प्रत्येक पुरुषाची स्त्रीकडून त्यापलीकडे अपेक्षा असतात नं! सुरुवातीला तर आमच्या आवडी निवडी एकूणच विचार करायची पातळी वेगवेगळी असल्याने संवाद असा व्हायचाच नाही. नव्या लग्नाचे ते पहिले वर्ष तर जीव घेणार होत. आक्ख आयुष्य अस काढायचय ह्या विचारानेच मी डिप्रेस राहू लागलो आणि इतर जोडप्याना पाहून मला प्रचंड न्यूनगंड निर्माण व्हायचा. मी कोणाच्यात सामील होईनसा झालो आणि एकूणच ते नव्या नवलाईचे दिवस 'मोस्ट हेटेड' ठरले. भरीस भर म्हणजे इतारांकडून कधी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे हिणकस शेरेही आईकायला मिळायचे. पण आता इथून मागे फिरण नव्हत कारण आपल्या समाज मान्यतेचा एक भाग म्हणून मला हे लग्न टिकवाव लागणार होत आणि सगळ आलबेल असल्याचा सूर आळवावा लागणार होता. अशाच डिप्रेशन आणि मानसिक त्रासात मी चुका करतच गेलो आणि कदाचित मुल झाल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल आणि आपल्या संसाराला वेगळा अर्थ येईल या विचारने मी संततीबाबत डिसिशन घेतला. मुलगा झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस छान गेले पण हळूहळू परत जुन्या जखमा नवीन होऊन वाहू लागल्या. अर्थात ह्या सगळ्यात माझ्या सारखी माझ्या बरोबर माझी बायको देखील होरपळत होती ते मला पक्क ठाऊक होत. माझ्या एका चुकीच्या निर्णयाने त्या बिचारीच आयुष्याच पण मी नुकसान केल होत. कित्येकदा मी स्वताची समजूत काढायचा प्रयत्न केला पण ह्या संसारात मला पहिल्यापासूनच रस नव्हता आणि लग्नानंतरच हे विस्कटलेल सहजीवन हे त्याचच प्रतीक होत.

आज माझा मुलगादेखील 3 वर्षांचा आहे आणि तोच फक्त आम्हाला जोडणारा दुआ आहे. अजूनही कित्येकदा भूतकाळातील गोष्टींचा पश्चात्ताप होतो, खूप तळमळतो आणि सतत स्वताला दोष देतोआणि हे सगळा सोडून देऊन विभक्त होऊन नव्यान सुरूवात करायची तीव्र इच्छा होते. पण तेव्हढ्यपूरतच....परत एकदा उरलासुरला सदसदविवेक जागा होतो आणि विचारतो की "काय रे कुठल्या कारणासाठी विभक्त होणार तू तुझया बायको मुलापासून ?..काय दोष आहे तिचा आणि काय दोष आहे तुझया मुलाचा !!!" बस्स!! इतक्या 2 प्रश्नांनी मी भानावर येतो आणि मुकाटपणे परत आपल्या निरस संसाराकडे वळतो. मी आणि माझी बायको दोघांनीही आता हे आयुष्य accept केलय. माझया बद्दल बोलायच झाल तर जुन्या खोल जखमंवारती काळाने एक पातळसा पापुद्रा धरलाय! आनंदी प्रेमी युगुल पहिली किंवा उत्साहात फिरणारी नवविवाहित जोडपी पहिली की आपण काहीतरी कायमच गमावल्याची तीव्रतेने जाणीव होते. हे नाजूक क्षण आपल्याला कधीच अनुभवता नाही आले आणि येणारपण नाहीत ह्या विचारने मन सुन्न होत आणि शब्दश: डोळ्यात पाणी येत. लग्न हा माझ्यासाठी किती महत्वाचा आणि नाजूक विषय होता पण मझा प्रचंड भ्रमनिरास झाला आणि मनावर एक खोल जखम झाली ती कायमची...अश्वत्थाम्याच्या त्या कपाळावरच्या जखमेसारखी..सतत भळाभळा वाहणारी.

आज इतक्या वर्षांनी मी हे सगळ लिहितोय त्यामागचा एकाच उद्देश आहे की देव न करो आणि कुणी अशा अनुभवातून जावो पण जर का गेले असतील तर त्यांना हे समजावे कि ते काही एकटे नाहीत आणि जे कोणी लग्नाचे आहेत त्यानी हा critical डिसिशन घेताना अधिक सतर्क रहाव आणि जोडीदाराबद्दल नीट माहिती काढावी. सर्वात महत्वाच म्हणजे घाईघाईत किंवा संयम न दाखवता कुठलाही निर्णय घेऊ नका. होणार्या जोडीदाराला ठरवून ४-५ वेळा भेटा तर कधी सहज unplanned casually भेटा. तुमच्या मनाचा आवाज ऐका. दुर्दैवाने जर कोणी लग्नाआधी माझ्यासारख्या अनुभवातून जात असेल तर व्यवस्थित विचार करून प्रत्यक्ष कृती करताना अजिबात गडबडून जाऊ नका. घरातील मोठ्यांना नीट विश्वासात घेऊन त्यांना तुमच्या अपेक्ष मोकळेपणे सांगा. तुमच्या भावी अयुष्यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा !!
बाकी माझ्याबद्दल बोलायचं झाल तर हा लेख वाचून मला हव तर मला नाव ठेवा, शिव्या शाप द्या, माझी चेष्टा करा पण फक्त शेवटी एकदा 'लढ' म्हणा ..बस बाकी काही नको

टीप: हा लेख सुशिक्षित समाजातील मुले व मुलीं दोघांसाठी आहे. ह्यामागे आपला समाज किंवा लग्नव्यवस्था ह्यातील त्रुटी दाखवायचा अजिबात उद्देश नाही. आज आपल्याच अवतीभवती पारंपारिक मार्गाने लग्न करून संसारात सुखी झालेली अनेक जोडपी आहेत तेव्हा तो प्रश्नच येत नाही. तरीसुद्धा ह्या व्यवस्थेचा एक भाग बनताना कुणाच नुकसान होऊ नये हाच एकमेव सार्थ हेतू आहे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिशोब न करता येण, लोकांशी बोलता न येण, विचार न जुळण.. >>
मला नाही वाटत इतका complex आहे हे. लोकांच्या वैवाहिक आयुष्यात याहून जास्त प्रॉब्लेम्स असतात. इथे मायबोलीवर तुम्हाला अनेक अनुभव वाचायला मिळतील. तडजोड करायला शिका. अन्यथा ३ वर्षे तर मानसिक त्रास करून घेतलाच आहे. अ़जून आयुष्यपण वाया घालवाल. get well soon..

<मला नाही वाटत इतका complex आहे हे. लोकांच्या वैवाहिक आयुष्यात याहून जास्त प्रॉब्लेम्स असतात.> +१

मला कधी हे कळतच नाही की या लोकांना बायको आवडत नसते तरी यांच्या घरी वर्षाच्या आत पाळणे बरे हलतात. ( कदाचित मुल झाल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल आणि आपल्या संसाराला वेगळा अर्थ येईल या विचारने मी संततीबाबत डिसिशन घेतला) कुणी काही बोलु नये म्हणुन अशी फुटकळ कारणे देतात.

दिवसा यांना बायकोसोबत फिरायला लाज वाटते पण रात्री तिच्यासोबत शय्या करायला लाज वाटत नाही. मनाविरुद्ध केले असे देखील पुरुष नाही म्हणु शकत कारण त्याच्या इच्छेशिवाय सहवास होउ शकत नाही हे सगळे जाणतात.

हिशोब न करता येण, लोकांशी बोलता न येण, विचार न जुळण.. >>
मला नाही वाटत इतका complex आहे हे. लोकांच्या वैवाहिक आयुष्यात याहून जास्त प्रॉब्लेम्स असतात. इथे मायबोलीवर तुम्हाला अनेक अनुभव वाचायला मिळतील. तडजोड करायला शिका. + १११११
अन्यथा ३ वर्षे तर मानसिक त्रास करून घेतलाच आहे. अ़जून आयुष्यपण वाया घालवाल. स्वतःसोबत बायकोचही. get well soon..

nivaal phaltupana aahe ha
nusatya cheharyavaril dagane lagna modale , mulagi pahilyavar dekhil kahi divsani nakar deta aalaa asata.

timepass vatato

Tumachya ID madhe ch Phoenix aahe, tyamule tumhi parat bharari gheu shakata ha tumhala swatala wishwaas asawa ase watate.
Prateyk sansaara madhe kahi kurburi, kahi uune-duune asate, tyala faar jast mahatva na deta, je kahi changale aahe tyakade laksh dile tar aayushya samadhani rahu shakate..
Mi swata eka Ph.D. zalelya professor cha fakt 7th pass zalelya bayakoshi asalela aatishay uttam sansaar pahila aahe..
He accepted her as she is and supported her for further studies. Now she is also a school teacher.

Ek salla – tumhala psychiatric doctor chya upcharacha khup fayada hoeel ase watate..
Manamadhe satat yenare nirash wichar ani depression duur karanari aushadhe uplabdha aahet, matra ti yogya tya doctor chya sallyane ch ghyaweet.
Mazya khup jawal chya maitrinila ashyach nirash wicharachya trasatun baher padayala tyachi madat zali hoti.

Je zale te zale, aata pudhache aayushya samadhanache jawo ya sathi ha salla nakki amlaat aana hee vinanti.

Marathi type hot nahiy mazya computer var..
Please forgive me for that..

फिनिक्स, खरोखर एखाद्या चांगल्या वैवाहिक समुपदेशकाला भेटा. तुमच्या पत्नीबद्दल तुम्ही जे प्रॉब्लेम्स सांगितले आहेत ते खरंच प्रॉब्लेम्स नाहीत. हिशोब न करता येणारी, लोकांशी न बोलता येणरी अनेक लोक या जगात असतात. तुम्हाला एवढा वाटत असेल तर तिला या छोट्या छोट्या गोष्टी शिकवत जा. जितका होइल तितका संवाद साधायचा प्रयत्न करा. कुठल्याही नात्याचा भरभक्कम पाया हा उत्तम निरोगी संवाद असतो हे जाणून घ्या.

विचार न जुळणं पेक्षाही आवडीनिवडी न जुळणं हा तुमचा प्रॉब्लेम वाटत आहे. आणि हा सार्वकालिक प्रॉब्लेम आहे. तुमच्या बायकोला पुलंचं एकही पुस्तक माहित नाही.... माझ्या नवर्‍याने कधीतरी एकदा मी पु ल देशपांडे वाचलेस का असं विचारलं तर "आम्हाला त्यांचा एक धडा होता. तेच का?" हा प्रश्न विचारला होता. सीरीयसली!!!

तुम्ही जेवढं लिहिलंय त्यावरून तरी समस्या तुमच्या पत्नीची नसून तुमच्या अपूर्ण अपेक्षांची आहे. म्हणून इतर कपल्सकडे बघून तुम्हाला वाईट वाटतंय. तुमची पत्नी जर स्वभावाने चांगली आणि समजूतदार असेल तर काही प्रश्न यायला नको. न्यूनगंड तुमच्या मनात आहे तो काढून टाका, हिणकस शेरे अगदी प्रत्येकालाच मिळतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करायला शिका. जो संसार आहे त्यामध्येच आनंदी रहाण्याचा प्रयत्न करा.

सगळाच वेडेपणा आहे.

कदाचित मुल झाल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल आणि आपल्या संसाराला वेगळा अर्थ येईल या विचारने मी संततीबाबत डिसिशन घेतला>>> Angry मुलं होऊन, लग्न करून इत्यादी कारणांनी परिस्थिती सुधारते असे मानणार्यांना काय म्हणावे Uhoh

प्रथम मनातला न्यूनगंड काढून टाका आणी आनंदी रहाण्याचा प्रयत्न करा. माझ्या मते, तुम्ही तुमच्या पत्नी मध्ये असलेल्या चांगल्या गुणांचा विचार करा. Positive Mind ने पुढे जा.

मायबोलीवरील चर्चांमध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात.

१. प्रथम दिल्या गेलेल्या दोन चार प्रतिसादांनी अनेकदा पुढील प्रतिसादांचा टोन सेटच होऊन जातो. बाकी काही विचार करणे, ते व्यक्त करणे ह्याला मग इतर सदस्य एक तर धजावत तरी नाहीत किंवा स्वतःची मतेच बदलून घ्यायला लागतात.

२. काही सदस्य आवश्यकता नसताना एकदम आक्रमकपणे अक्कल वगैरे काढतात.

३. निष्कर्षावर उडी मारण्याची घाई झाल्याची काही उदाहरणे दिसतात.

=================

वरील लेख आठ दहा वाक्यात सांगायचा तर असा होईलः

करिअरमुळे लग्नाबाबत विशेष विचार करत नसताना लग्नाचे वय होणे, लग्नाचे वय झाल्यावर चिकित्सक वृत्ती जागृत होणे / अधिक कार्यान्वित होणे, ह्या चिकित्सेमुळे काही सकृतदर्शनी चांगली स्थळे नाकारली जाणे, काही नकार पचवायला लागणे, मग लग्नाची घाई आहे हे दडपण स्वीकारायला लागणे (ज्याच्या मुळाशी संस्कार वगैरे असतात), मग जेथे होकार दिला तेथे निव्वळ टाईम एलिमेंटच्या बेसिसवर व किमान अपेक्षांची पूर्तता बघून होकार दिला जाणे, ते लग्न उरकण्याची काही कारणाने घाई असणे, त्या घाईच्या दिवसांत मिळालेल्या वेळात अनुरुपता नसण्याचे लक्षात येणे, पुनर्विचार करणे काही कारणांनी अवघड होऊन बसणे, नंतर लग्न होणे व शेवटी परिस्थिती स्वीकारली जाणे!

आता ह्याच्यात खालील प्रश्न का पडावेत किंवा खालील विचार का नोंदवले जावेत?

१. बायको आवडत नसताना पाळणा कसा हालतो? लक्षावधी उदाहरणे आहेत जगात की नवरा बायकोंचे पटत नसतानाही त्यांना मुले झालेली आहेत. ह्याचा अर्थच असा की सदासर्वकाळ मारामार्‍याच चाललेल्या असतात असे होत नसणार.

२. लोकांच्या वैवाहिक आयुष्यात याहून अनेक मोठे प्रॉब्लेम्स असतात - म्हणून ह्या लेखकाने स्वतः व्यक्त होऊ नये काय? त्याचे प्रॉब्लेम्स सांगू नयेत काय? ते प्रॉब्लेम्स तुमच्यामते लहान आहेत म्हणून तो लेखक चुकीचाच असेल हे नक्की कसे ठरते?

३. समस्या तुमच्या पत्नीची नसून तुमच्या अपूर्ण अपेक्षांची आहे - म्हणजे काय? अपेक्षा पत्नीकडूनच अपूर्ण राहात आहेत अशी जर समस्या मांडली जात असेल तर अपूर्ण अपेक्षा हीच समस्या कशी काय? पू लं चे पुस्तक माहीत असणे, हिशोब येणे, चारचौघात कसे बोलावे हे कळणे ह्या काही फार अवघड अपेक्षा आहेत का? त्या पत्नीत सुधारणा होतील हे मान्य, पण आजघडीला ती अशी आहे हे चुकीचे असणे का अमान्य व्हावे? चेहर्‍यावरील डाग (जर एकदा मेक अप मुळे दिसले नसले आणि पुढच्या वेळी दिसले) तर त्याला महत्वच नाही असे कसे?

तरीसुद्धा, लेखक, त्याचा मित्रपरिवार व कुटुंबीय आणि इतर नातेवाईक ह्या सर्वांचे दडपण घेऊन विचार करत होता हे मात्र लक्षात आलेले आहे. त्याने हे दडपण न घेता वेळच्यावेळीच योग्य त्या स्टेप्स घेतल्या असत्या तर हे प्रॉब्लेम्स झाले नसते.

(आणि लेखकही हेच म्हणत आहे की ज्यांना 'अश्या प्रकारचे' प्रॉब्लेम्स भेडसावत असतील त्यांनी वेळीच योग्य ते मुद्दे चर्चेला घेऊन सोक्षमोक्ष लावलेला बरा)!

तुमचा बायकोला वाचायला येत असेल तर वेगवेगळी पुस्तके आणुन द्या ना त्याना.थोड, थोड का होईना वाचेल ती, तीच्या गुणांना develop करा.मनातील न्युनगंड काडुन टाका.तुम्चा मुल्गा आता 3 वर्षांचा आहे तो मोठा होतो आहे,तुम्चा वागण्याचा त्याचावर हि परिणाम होईल . नव्याने सुरवात करा.

>>>>> पण फक्त शेवटी एकदा 'लढ' म्हणा .. <<<<<<<
अहो त्यापेक्षा, आयुष्याच्या जोडिदारावर "निरपेक्षपणे" प्रेम करा की! हाय काय अन नाय काय त्यात.......
लग्न होईस्तोवर माणुस "स्वतःपुरताच" तेवढा जगलेला असतो, लग्न करायचे तेच दुसर्‍याकरता जगण्यासाठी, तर जिथे काही मिलवायचे/घ्यायचेच नसते तिथे अपेक्षाभन्ग कसला? Happy असो.

ते प्रॉब्लेम्स तुमच्यामते लहान आहेत म्हणून तो लेखक चुकीचाच असेल हे नक्की कसे ठरते?
>>>
बेफिकीर,, शोषित योध्यांवर लेख लिहिणार्‍या तुमच्यासारख्या लेखकाकडून असा प्रतिसाद surprising होता.
मला सांगा, योग्यवेळी लेखकाने लग्न मोडले गेले नाही म्ह्णून बायकोच्या वाटयाला आलेला मानसिक त्रासाची काहीच किंमत नाही का?

बेफिकीर,, शोषित योध्यांवर लेख लिहिणार्‍या तुमच्यासारख्या लेखकाकडून असा प्रतिसाद surprising होता.<<<

विसंगत विधान! तसेही, तिथे प्रतिसाद न देता तेथील रेफरन्स इतरत्र देणे मलाही सरप्राइझिंग वाटते.

मला सांगा, योग्यवेळी लेखकाने लग्न मोडले गेले नाही म्ह्णून बायकोच्या वाटयाला आलेला मानसिक त्रासाची काहीच किंमत नाही का?<<<

बायकोच्या वाट्याला कोणता मानसिक त्रास आल्याचे आपल्याला जाणवले? तिलाही व्यक्त व्हायला मुभा आहे व तिच्या सोर्सेससमोर ती कदाचित व्यक्त होतही असेल.

नंदिनी + ११
मी लग्न करताना नेहमी विचार करायचे की त्या मुलाने निदान एकदा तरी पु. ल. वाचलेलेच असायला पाहिजेत ..त्यावर चर्चा करताना किती मजा येईल..
माझही लग्न तस घाईतच झाल ...... नवर्याने एकही पुस्तक वाचल नव्हत...
दोघांनी एकमेकांना सांभाळुन घेतल .. आज आता तोही पुस्तकं वाचतो..
मज्जा म्हणजे मी त्याला पु.ल.... पु.ल. इतक सांगायचे की नंतर आम्ही दोघानी एकत्र व्यक्ती आणि वल्ली वाचलं...
सल्ला ई. नाही.. पण स्वानुभवातुन सांगते.. समजुन घ्या .. तिच्यात जश्या उणिवा आहेत आपल्यात ही असतातच...
आम्ही खुप भांडतो आणि नंतर ५ मिनिट्स मध्ये मिटवतो...
स्वभाव खुप वेगळे असुन ही बेसिक रिलेशन खुप स्ट्राँग आहे...
शुभेच्छा तुम्हाला पण.. Happy

याच्या पुढे लग्न ठरवताना तुमच्या प्रश्नांची यादीच काढायला हवी आणि त्याप्रमाणे प्रश्न विचारावे तसेच नीट न्याहाळून बघावे आणि काही शंका आल्यास उघड उघड प्रश्न विचारावे म्हणजे मग असा प्रोब्लेम येणार नाही Happy

बायकोच्या वाट्याला कोणता मानसिक त्रास आल्याचे आपल्याला जाणवले?
>> एका स्त्रीच्या द्रुष्टिकोनातून लेख वाचला तर सहज जाणवते.

एका स्त्रीच्या द्रुष्टिकोनातून लेख वाचला तर सहज जाणवते.<<<

१. जगातील सर्व प्रॉब्लेम्स स्त्रीच्या दृष्टिकोनातून बघावेत असा समज मायबोलीवर फार मोठ्या प्रमाणावर आढळतो.

२. स्त्रीच्या दृष्टिकोनातून प्रॉब्लेम्स असले की पुरुषाला प्रॉब्लेम्स नसतात हेही एक चमत्कारिक गृहीतक! दोघांनाही प्रॉब्लेम्स असू शकतात, फक्त ह्या धाग्यावर त्यापैकी पुरुष व्यक्त झालेला आहे.

३. समोर आलेला धागा लेखकाला अभिप्रेत असलेल्या दृष्टिकोनापेक्षा वेगळ्याच दृष्टिकोनातून का वाचावा हाच एक मुळात प्रश्न आहे (जोवर लेखकाचा दृष्टिकोन फारच काहीच्या काही, अमानवी, निंद्य असा नाही तोवर)

१. जगातील सर्व प्रॉब्लेम्स स्त्रीच्या दृष्टिकोनातून बघावेत असा समज मायबोलीवर फार मोठ्या प्रमाणावर आढळतो.

२. स्त्रीच्या दृष्टिकोनातून प्रॉब्लेम्स असले की पुरुषाला प्रॉब्लेम्स नसतात हेही एक चमत्कारिक गृहीतक! दोघांनाही प्रॉब्लेम्स असू शकतात, फक्त ह्या धाग्यावर त्यापैकी पुरुष व्यक्त झालेला आहे.

३. समोर आलेला धागा लेखकाला अभिप्रेत असलेल्या दृष्टिकोनापेक्षा वेगळ्याच दृष्टिकोनातून का वाचावा हाच एक मुळात प्रश्न आहे (जोवर लेखकाचा दृष्टिकोन फारच काहीच्या काही, अमानवी, निंद्य असा नाही तोवर)

kya baat hai!
Wink

तुमच्यापेक्षा जास्त वाईट तुमच्या बायकोबद्दल वाटतंय Sad
चारचौघात काही बोलून दाखवत नाही म्हणताय ती , मग तीच्या मनाची घालमेल कुठे व्यक्त करत असेल ती?
आपल्या आई वडीलांना- घरदाराला सोडुन आली तेंव्हा ज्याच्या भरोस्यावर आली त्याचे हे आपल्याबद्दलचे हे विचार ऐकुन कसं वाटत असेल तिला? Sad
एकुणातच आपला जोडीदार आपल्याबरोबर सुखी नाही यापेक्षा मोठी टोचणी कोणतीच नाही.
तीने कधी तिच्या मनातलं सगळं बोलून दाखवलं का हो?
तिला स्वतःहुन तुम्ही कुठली पुस्तकं वाचायला दिलीत का कधी?
तिची आवड नक्की कशात आहे (कशातच नाही असं होऊच शकत नाही)? त्याबद्दल तुम्हाला १००% , किमान २५% तरी ज्ञान आहे का? (म्हणजे तिला नाचायला आवडत असेल तर तुम्हाला नाचता येत का?, तिला गायला आवडत असेल तर तुम्हाला गाता येतं का?) तिच्या आवडीच्या क्षेत्रातलं एकुण एक महान नाव तुम्हाला माहीत आहे का?
मुळात तिची आवडच तुम्हाला माहीत आहे का?
मधुचंद्राच्या रात्री रडणार्‍या या एकमेव पुरुषाने आपल्याला असं रडताना पाहुन बायकोला कसं वाटलंय हे जाणुन घ्यायचा कधी प्रयत्न केलाय का?
ती जाड आहे म्हणून तिला जीम लावायला सांगितलत का? तिच्या बरोबर पहाटे उठुन पळायला गेलात का?
चेहर्‍यावरचे डाग नक्की कशाचे आहेत ते माहीत करुन घेतलंत का? मुलात तुम्ही स्वतः क्लिन चेहरा , गोरेपान, देखणे , स्मार्ट, र्‍हितिक रोशन झक मारेल असे दिसायला आहात का?
तुम्ही आधीपासुनच हे जे मला ती आवडलीच नाहीये हे विचार मनात ठेवलेत ते बदलायाची तयारी दाखवलीये का? प्रयत्न केलेत का?

वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नाही असं असेल तर तुम्हाला तुमच्या बायकोबद्दल बाहेरची - परकी चार लोकं चर्चा करतील अशा प्रकारचा हा लेख लिहायचा काहीच अधिकार नाही हे माझं स्पष्ट मत आहे.

स्त्रीच्या दृष्टिकोनातून प्रॉब्लेम्स असले की पुरुषाला प्रॉब्लेम्स नसतात हेही एक चमत्कारिक गृहीतक!
>> मी असे कुठेही म्हणले नाहीये. माझा पहिला प्रतिसाद नीट वाचा "मला नाही वाटत इतका complex आहे हे. लोकांच्या वैवाहिक आयुष्यात याहून जास्त प्रॉब्लेम्स असतात."
तुमच्या प्रतिसादात "ते प्रॉब्लेम्स तुमच्यामते लहान आहेत म्हणून तो लेखक चुकीचाच असेल हे नक्की कसे ठरते?" आणि "बायकोच्या वाट्याला कोणता मानसिक त्रास आल्याचे आपल्याला जाणवले?" असे फाटे तुम्ही फोडले आहेत आणि विषय "जगातील सर्व प्रॉब्लेम्स स्त्रीच्या दृष्टिकोनातून बघावेत असा समज मायबोलीवर फार मोठ्या प्रमाणावर आढळतो." असा तिसरीकडेच नेत आहात.

असो.

तिला नाचायला आवडत असेल तर तुम्हाला नाचता येत का?<<< Rofl

फिनिक्स,

मला आता तुमची कीव येऊ लागली आहे. ज्या ठिकाणी तुम्ही हा लेख लिहिला आहेत तेथे ह्या लेखाची अजुन फार तर तासाभरात लक्तरे लोंबत असतील.

ऑल द बेस्ट!

बायकोच्या वाट्याला कोणता मानसिक त्रास आल्याचे आपल्याला जाणवले?" असे फाटे तुम्ही फोडले आहेत <<<

कृपया भानावर राहून प्रतिसाद वाचा व लिहा:

हे तुमचे वाक्य खाली देत आहे, त्यावर मी वरील वाक्य लिहिले होते.

>>>योग्यवेळी लेखकाने लग्न मोडले गेले नाही म्ह्णून बायकोच्या वाटयाला आलेला मानसिक त्रासाची काहीच किंमत नाही का<<<

बायकोला लग्न मोडायचे होते हेच गृहीत तुम्ही आधी कुठून काढलेत?

मंडळींनो,

१. लेखकाच्या पत्नीच्या बाजूने ह्या लेखात काहीही लिहिलेले नसणे ह्याचा अर्थ ती अत्यंत हलाखीत आहे, भयानक छळ सोसत आहे, जीवनाला कंटाळलेली आहे वगैरे होत नाही. हा लेख लेखकाने स्वतःच्या बाजूने लिहिलेला आहे. त्याला इच्छाच नाही आहे पत्नीचीही बाजू वगैरे मांडण्याची! त्याने तसे करायलाच हवे असा माबोचा मुळीच दंडक वगैरे नाही. त्याच्या पत्नीला शक्य झाले तर तीही येथे लिहील.

२. लेखकाच्या पत्नीची अशी इच्छा होती की लेखकाने योग्य वेळीच लग्न मोडावे हे काहीच्या काही गृहीतक आहे. लेखकाच्या पत्नीला तसे काहीही वाटलेले नसणे, किंबहुना तिला ते लग्न हवेसे असणे अतिशय सहज शक्य आहे.

३, येथे एका बाजूचा प्रॉब्लेम आपल्या समोर आलेला आहे, ह्याचा अर्थ असा होत नाही की आपण दुसर्‍याच बाजूवर बोलत राहावे. पहिल्या बाजूलाही काहीतरी अर्थ असू शकतो.

रि या.. भारिच ग ...११११११+१११११
मी पुर्णपणे सहमत तुझ्याशी..:)

Pages