फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 2 March, 2014 - 01:12

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. . या पुर्वी २००८ मधे प्रो.जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या मतिमंद व हुशार मुलांच्या बाबतची फलज्योतिषाची चाचणीचा अहवाल खालील दुव्यावर उपलब्ध आहेत
http://faljyotishachikitsa.blogspot.in/2008/10/blog-post_09.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेडीक्टिव्ह ऍनॅलिसिस हे आधी घटलेल्या घटना त्यावरून पुढे काय घडले यातील पॅटर्न शोधून आता घडणाऱ्या घटना पाहून त्यावरून पुढे काय होईल याची प्रॉबॅबिलिटी दर्शवते.
आपण सगळेच अशा अनेक प्रोबॅबिलिटीज काढून/गृहीत धरून निर्णय घेत असतोच. पण ते फारच मोजक्या उदाहरणांवरून. प्रेडीक्टिव्ह ऍनॅलिसिस हे प्रचंड मोठ्या डेटा बेस वरून करण्यात येईल. त्यात समजा मी तीन चार पर्यायांचा विचार करतोय तर त्यातील मी अमुक पर्याय निवडला तर त्याचे काय परिणाम होतील, तमुक निवडला तर काय होतील वगैरे पहाता येईल, त्यावरून ठरवता येईल.
त्यात आज एखाद्या गोष्टीची प्रोबॅबिलिटी खुप जास्त आली, ती उद्या दुसऱ्या घटनेमुळे अचानक कमी येऊ शकते.

फलज्योतिष्य हे एखादा मनुष्य जन्मला की कुठे केव्हा जन्मला यावरून सगळे प्रेडिक्शन्स मानते. ती व्यक्ती काय शिकेल, कशी वागेल, केव्हा लग्न करेल (किंवा करणारच नाही) किती मुलं (त्यात मुली किती, मुलगे किती), अपघात होईल का, केव्हा, मरण केव्हा सगळेच. केव्हा व कुठे जन्मला यावरुन तुमचे आयुष्य ठरलेले आहे.

आता दिल को अच्छा लगता है म्हणुन त्याला "अहो हे सुद्धा वरील प्रमाणे प्रेडीक्टिव्ह ऍनॅलिसिसच! Happy " असा दावा करता येईल. पुढे प्रेडिक्शन ऍनॅलिसिस मध्ये ग्रहस्थितीचा संबंध नसतो असे लक्षात आले तरी आधी तंत्रज्ञान एवढे प्रगत नव्हते तेव्हा ग्रहांचा आधार घेतला आता नवीन तंत्रज्ञान वगैरे मखलाशीही करता येईल.

पण ग्रहांच्या प्रभावामुळे (किंवा ग्रह बाजूला ठेवले तरी एकदंरीत जन्मतःच) आपले आयुष्य ठरलेले असते अथवा नाही यावरून ज्योतिष्यशास्त्रात तथ्य आहे किंवा नाही हे ठरते.

फलज्योतिषाला तो पल्ला, मॅच्युरिटी गाठायला अजून अवकाश आहे, तोवर सांगितलेल्या भाकितांवर विश्वास ठेवायची घाई करू नका. ते भाकीत चुकीचं असण्याची (दिव्यचक्षु लाभलेले ज्योतिषी सोडले तर - इथल्याच प्रतिसादांवरून) शक्यताच अधिक आहे. त्यामुळे त्यावर आधारित निर्णय घेण्यात काही पॉइंट नाही.

मानव, ग्रहांच्या प्रभावावरून आयुष्य ठरते यापेक्षा ग्रहांची स्थिती ही त्या त्या आयुष्यात घडणार्‍या घटनांची सूचक असते , असं म्हटलं तर?
पत्रिकेत लिहिलेलं असतं अमुक असता तमुक होईल. अमुक असल्यामुळे तमुक होईल, असं नाही.

आता दिल को अच्छा लगता है म्हणुन त्याला "अहो हे सुद्धा वरील प्रमाणे प्रेडीक्टिव्ह ऍनॅलिसिसच! Happy " असा दावा करता येईल. पुढे प्रेडिक्शन ऍनॅलिसिस मध्ये ग्रहस्थितीचा संबंध नसतो असे लक्षात आले तरी आधी तंत्रज्ञान एवढे प्रगत नव्हते तेव्हा ग्रहांचा आधार घेतला आता नवीन तंत्रज्ञान वगैरे मखलाशीही करता येईल.>>>>>>>>>>> अगदी अगदी!

मानव, ग्रहांच्या प्रभावावरून आयुष्य ठरते यापेक्षा ग्रहांची स्थिती ही त्या त्या आयुष्यात घडणार्‍या घटनांची सूचक असते , असं म्हटलं तर?मानव, ग्रहांच्या प्रभावावरून आयुष्य ठरते यापेक्षा ग्रहांची स्थिती ही त्या त्या आयुष्यात घडणार्‍या घटनांची सूचक असते , असं म्हटलं तर?>>>>>>>>>ग्रहयोग सूचक की कारक? असा एक मुद्दाही कळीचा आहे. तो असेच चर्‍हाट आहे.

ज्योतिषशास्त्रातले ठोकताळे , नियम इत्यादि लिहिले गेले तेव्हा कोणते तंत्रज्ञान होते?
ज्योतिषी लोक तेच ठोकताळे अजूनही वापरतात की स्वतःच्या अभ्यासानुरूप त्यात बदल करतात?

ज्योतिषशास्त्रातले ठोकताळे , नियम इत्यादि लिहिले गेले तेव्हा कोणते तंत्रज्ञान होते?>>>>बर्‍याच अंशी मौखिक
ज्योतिषी लोक तेच ठोकताळे अजूनही वापरतात की स्वतःच्या अभ्यासानुरूप त्यात बदल करतात?>>>>कालानुरुप थोडेफार बदल करतात. नाहीतर फारच कालबाह्य वाटेल. उदा. वाहन सौख्य हे आता घोडागाडी वगैरे सांगत नाहीत.

म्हणजे आताचं तंत्रज्ञान नसताना बांधलेले ठोकताळे बरोबर आहेत. पण आताच्या तंत्रज्ञाना च्या सहाय्याने त्यावर अंदाज बांधणे मात्र कठीण ?
की ते ठोकताळे कोणी अभ्यासून बांधले नसून अपौरुषेय आहेत?

भरत, तुमच्या वरील मला विचारलेल्या प्रश्नावर "ते ज्योतिषशास्त्राच्या सखोल अभ्यासकांनी स्पष्ट करावे" असे म्हणणार होतो, पण घाटपांडे यांनी उत्तर आधीच दिलंय की त्याबाबतीत एकमत नाहीय.

त्यांनी केलेल्या आवाहनावरुन जर ज्योतिषी त्या मुलाच्या मृत्यूची तारीख/महिना सांगण्याचा प्रयत्न करत असतील तर ग्रहस्थिती केवळ सूचक असे कसे म्हणता येईल? आपला मृत्यू केव्हा हे ठरलेलेच असते असे त्यावरुन वाटत नाही का?

हे तेच नीट , योग्य त्या संज्ञा - शब्द वापरून लिहू शकतील.

आधीच कुठेतरी लिहिलं असेलही त्यांनी.

त्यांनी केलेल्या आवाहनावरुन जर ज्योतिषी त्या मुलाच्या मृत्यूची तारीख/महिना सांगण्याचा प्रयत्न करत असतील तर ग्रहस्थिती केवळ सूचक असे कसे म्हणता येईल? आपला मृत्यू केव्हा हे ठरलेलेच असते असे त्यावरुन वाटत नाही का? >> हो नैसर्गिक मृत्यु असेल तर दिवस/आठ्वड्यापर्यंत काढणे शक्य आहे. सगळा गणिताचा खेळ आहे. वरच्या उदाहरणात तो मनुष्य कुठे जन्मला त्याचा उल्लेख नाहीये. मला आकडेमोडीसाठी वर्गकुंडल्याची आवश्यकता असल्याने जन्मस्थळ भेटले तर बरे होईल. अजून ह्याने आत्महत्या केल्याने आलेले उत्तर चुकण्याचा मोठा धोका आहे. जेवढे आयुष्य मिळणार होते ते न भोगता कुणी आधीच स्वतःच अकाली घात करून घेतल्यास गणित काय करणार त्याला ? तरीपण तुम्ही ८०-९० पिरिअड दिल्याने हे आपण दुसऱ्या पद्धतीने जमतंय का बघू.
नैसर्गिक मृत्यु जो वयोमानाप्रमाणे आलेला असेल किंवा कमी वयात भले तो अपघाताने असेल, काही आजाराने आलेला असेल अशी उदाहरणे मिळाली तर बरे होईल. मानव,भरत तुमच्याकडे काही उदाहरणे असतील तर तुम्हीही द्या.
विरोधकांना ज्योतिष खोटे आहे ते दाखवायला काहीच कष्ट घ्यावे लागत नाही. पण ज्योतिषाचे समर्थन करताना मला किंवा कोणालाही पुस्तकी चर्चा करण्याआधी "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल" या न्यायाने आधी यात काहीप्रमाणात तरी तथ्य आहे हे सप्रमाण दाखवून द्यायला हवे. त्यासाठी माझा हा खटाटोप आहे. बाकी माझा ज्योतिषावर विश्वास असला तरी लग्ने जमवताना कुंडल्या पाहणे, कुंडलीवरून करिअर ठरवणे , विद्यापीठांत शिकवणे हे मलाही मूर्खपणाचेच वाटते. हे शास्त्र नसून कला आहे असे मला वाटते.

<<कालानुरुप थोडेफार बदल करतात. नाहीतर फारच कालबाह्य वाटेल. उदा. वाहन सौख्य हे आता घोडागाडी वगैरे सांगत नाहीत. >> याला ठोकताळ्यातील बदल म्हणता येणार नाही. फक्त कालानुरूप साधनात बदल.
जसे पूर्वी अपघात हे दरड कोसळून, श्वापद हल्ला, सर्पदंश, पूर, खाईत पडून वगैरे असतील आता त्यात वाहन अपघात, विजेचा धक्का, सिलेंडर स्फोट इत्यादि भर असेल.
पूर्वी शिक्षण / उच्च शिक्षण त्यावेळेस उपलब्ध शिक्षणावर असेल. काही दशकां पूर्वी त्यात इंजिनियर, वकीलची भर पडली असेल (वैद्य आधीच होते) आता पीएचडी वगैरे.
हे ग्राह्य धरायला हवे.

मला वाटले बदल म्हणजे बेसिक बदल जसे पूर्वी अमुक ग्रह अमुक घरात अपशकुन तर आता नव्या डेटा नुसार तसे मानत नाहीत, किंवा पूर्वी पेक्षा अजून जास्त ग्रहांचा विचार केल्या जातो किंवा वेगळे नवीन क्रायटेरियनची भर घातली आहे असे भरतना म्हणायचे आहे.

जीद्दु, थोडक्यात तुम्हाला आत्महत्या व हत्या (खुन, घातपात) नसलेले मृत्यू हवेत.
मग जन्म सुद्धा नैसर्गिकच घेऊ, शस्त्रक्रियेने, सक्शनने झालेले जन्म नाही घेऊ.

तुम्हाला पत्रिका हवी की जन्म तारीख, वेळ, स्थळ पूरेसे आहे?
आणि जन्मवेळेत कमी/अधिक किती मार्जिन चालते? कारण दवाखान्यात जन्मवेळेची अचूक नोंद असेलच असे नाही.

उदा: जर कुणाची नोंद सकाळी ११ वाजून ४४ मिनिटे आहे. तर नोंद करण्यात किती मिनिटे कमी/अधिक असले तर चालेल? त्यापेक्षा जास्त तफावत असण्याची शक्यता असली तर ती उदाहरणे टाळता येतील.

हो नैसर्गिक मृत्युवाले मिळाले तर बरे राहतील कारण त्यातून उत्तरांची अचूकता जास्त असेल. मला आकडेमोडीसाठी जन्मलग्न, नक्षत्र-त्याचे चरण यांची आवश्यकता आहे. हे अचूक मिळेल त्यासाठी जन्मवेळ, स्थळ पाहिजे. अगदी कोणत्या गल्लीतल्या कोणत्या दवाखान्यात जन्मला, किती मिनिटे-सेकंदांनी जन्मला इतके डिटेल्स नाही अपेक्षित. पण काहीवेळा मिनिटांच्या फरकाने लग्न बदलते त्यावेळी पुढचे सगळेच गँडणार. म्हणून निदान दहा उदाहरणे भेटली तर त्यातले दोन जरी बरोबर आले तरी माझे किंवा कोणाचेही समाधान व्हायला हरकत नसावी. पत्रिकेची काही गरज नाही. नैसर्गिक जन्माचा आणि घातपाताचे लॉजिक नाही कळले पण असो. जास्त काही वाद घालत बसण्यापेक्षा सध्या डेटा पाहिजे तो येउद्या. त्यानंतर समजा मी पडलोच तोंडावर तर विषयच संपला
ठीक आहे घातपाती मृत्यूपण चालेल फक्त आत्महत्यावाले नको.

जिद्दू एक लिहायच राहिल की ही कुंडली ज्योतिषाने बनवली होती. तीच सुरवातीला धनुर्धारीला पाठवली गेली . परंतु आम्ही ती जेव्हा बनवली तेव्हा त्यात चुकी आढळली होती. आम्ही ती नंतर ज्योतिषांना परत पाठवली होती. जन्मस्थळ- मिरज

घाटपांडे सर नोटेड
जन्म-मृत्यु कसाही चालेल फक्त स्वतःच जीव दिलेला नसावा आणि जन्मवेळ-स्थळ शक्य तितके बरोबर असावे एवढीच अपॆक्षा आहे. बाकी कमीतकमी दहा उदाहरणे मिळतील ही आशा आहे. मला काही बिनकामाची चर्चा करण्यात रस नसल्याने ही माझी सध्या इथली शेवटची कमेंट. ज्यावेळी सगळी उत्तरे तयार असतील तेव्हाच या धाग्यावर आणि पर्यायाने मायबोलीवर पुढची कमेंट असेल. देणारे प्रामाणिक डेटा देत आहेत हे गृहीत धरले आहे.
समजा उद्या तोंडावर पडलोच तर कायम रोमात राहण्याचा शक्य तितका प्रयत्न असेल Proud

जिद्दू, त्यात तोंडावर पडण्यासारखे काही नाही. गृहितकांत मिळणारा डेटा अचूक असणं गरजेचं आहे.

एक प्रश्न - जातकाच्या तोपर्यंतच्या आयुष्यातील घटना पाहून मिळालेली जन्मवेळ अचूक आहे का हे पडताळून पाहणं शक्य आहे का?

माझ्याकडे कोणाही मृत व्यक्तीची जन्मवेळ नाही. मिळते का पहातो.

भरत यांच्यासाठी एवढा अपवाद
हो , जन्मवेळ शुद्धीकरणासाठी हीच पद्दत असते ज्यात जातकाच्या आणि त्याच्या घरच्यांसम्बन्धी प्रश्न विचारून विविध घटना टॅली करतात आणि त्यानुसार जन्मवेळ मिनिटांपासून सेकंदांपर्यंत दुरुस्त करता येते. यात असे असते की कुंडलीत लग्न साधारण तासाने बदलते तसे जसजसे वर्गकुंडल्या मांडू तसे त्यांतले लग्न कमीकमी वेळात बदलते. उदा- D९ म्हणजे नवांश कुंडलीत लग्न दहा मिनिटांनी बदलते तर D६० म्हणजे षष्टीअमसा मध्ये ते काही सेकंदांत बदलते. इंदूरचे एक ज्योतिषी होते ते D८० पर्यंत जाऊन त्यावरून जातकच नाही तर त्याच्या घरच्यांचेहि दिवसादिवसाचे भाकीत करायचे पण या लोकांनी त्यांच्या पद्दती डॉक्युमेंट न केल्याने सगळे तसेच निघून गेले. या पद्दतीने जुळ्यांचे भविष्यही बघता येते. मला ज्यांनी थोडेफार शिकवले ते याच परंपरेतले होते आणि मेदनीय ज्योतिषात चक्रे असतात काही भाकिते वर्तवण्यासाठी तीही शिकवली होती पण ते नाही जमत मला जाडा क्लिष्ट असल्याने.
जन्मवेळ शुद्दतीकरणात अजून एक दक्षिण भारतात तत्व-अंतर्तत्व पद्दती वापरतात त्यातही ३० सेकंदांपर्यंत जन्मवेळ दुरुस्त करता येते. पंचमहाभूतांवर ही पद्धती असून जास्त प्राचीन आहे. पंचपक्षी ज्योतिष नावाचे प्रभावी पण अत्यन्त अवघड असे एक शास्त्र आहे तिकडे जे ह्याच तत्व-अंतर्तत्व सारखे काम करते. सगळ्यात अचूक पण अवघड असा "नाडी अमसा" प्रकार आहे नाडी शास्त्रात ज्यात लग्नाचा १५०वा भाग केला जातो. नाडी ग्रंथात त्याचे डिटेल्स मिळतात.
परत हस्त सामुद्रिकमध्येही अंगठा आणि हातावरून कुंडली मांडण्याच्या पद्धती आहेत ज्या अचूकच असतात पण ते ज्ञान आता फार कमी लोकांकडे उरले आहे. काशीला नीलकंठ शास्त्री होते अगदी काही वर्षांपर्यंत जे हातावरून आपली कुंडली मांडायचे. मी लखनौ पोस्टिंगमध्ये गेलो होतो त्यांच्याकडे. त्यांचा तंत्र शास्त्रावरही चांगला अधिकार होता. यूटुबवर आहेत त्यांचे काही व्हिडिओस कोणाला पाहायचे असल्यास.
आता भेटू काही महिन्यांनी Happy

कुर्ल्याच्या कर्वे यांनी अमेरीकेत एले ला आलेले असताना, अक्षरक्षः फक्त चेहेर्‍यावरुन माझी पत्रिका तंतोतंत (ग्रहं व घरे, अंश नाही) मांडली होती. अट एकच तुम्ही तुमची पत्रिका घेउन, त्यांच्यासमोर बसायचे. मधे चांगले लांब खोलीभर अंतर होते. मागे आरसा नव्हता.

@राज, तुमची या लेखावरील प्रतिक्रिया वाचली. खालील लेख वाचून त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याची मी तुम्हाला विनंती करतो.
ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन गुलमोहर - ललितलेखन
https://www.maayboli.com/node/80793

>त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याची मी तुम्हाला विनंती करतो.<<
काल वाचलेला तो धागा, परंतु तिथे प्रतिक्रिया देण्यासारखं काहि इंटरेस्टिंग दिसलं नाहि. तुम्हि माबोवर नविन आहात, तेंव्हा "नया भिडु, नया राज" हि एकच रिअ‍ॅक्शन होती माझी. तसा हा विषय माबोकरता खूप जुना आहे; शिवाय इथल्या नेहेमीच्या खेळाडुंना त्यांच्या चष्म्याबाहेरचं जग दिसत नाहि. मग उगाच डोकेफोड का करा? मागे एका धाग्यावर एआय फलज्योतिषात काय्/कशी वॅल्यु अ‍ॅड करु शकते हे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा तिथला ऑडियन्स, कन्सेप्ट्युअल अबिलिटीत मार खातो हे दिसुन आलं. आता इथेहि तोच प्रकार दिसुन येतोय. असो.

काहि महिन्यांपुर्वि, बेथोवनची दहावी सिंफनी, जी तो त्याच्या हयातीत पुर्ण करु शकला नाहि, ती एआयच्या सहाय्याने पुर्ण केली गेली (आता संगीत कुठे, एआय कुठे - गो फिगर...). उद्या, एआय कदाचित विंची किंवा माय्कलँजलोचं अनफिनिश्ड पेंटिंग पुर्ण करु शकेल. आता प्रिस्क्रिप्टिव अनॅलिटिक्स मेन्स्ट्रीम झालेलं आहेच, फलज्योतिषाने ते एंब्रेस करणं इज ए मॅटर ऑफ टाइम. बघा पटतंय का...

कुर्ल्याच्या कर्वे यांनी अमेरीकेत एले ला आलेले असताना, अक्षरक्षः फक्त चेहेर्‍यावरुन माझी पत्रिका तंतोतंत (ग्रहं व घरे, अंश नाही) मांडली होती. >> पुढच्या वेळेस आधी पार्लर मध्ये जा .... म्हणजे कोण ग्रह वक्री बिक्री निघणार नाही. Light 1

आजच्या एआयच्या आधीच वॉल्ट डिस्ने ने बोलणारे बदक आणि उंदीर पडद्यावर दाखवले. जे कुणी आधी लेखनातून इमॅजीन केले होते.
तरीही लोक बदक आणि उंदीर बोलू शकतात, आपल्या सारखे विचार करू शकतात यावर विश्वास ठेवत नाहीत.
शेम!

>>>>>>पुढच्या वेळेस आधी पार्लर मध्ये जा .... म्हणजे कोण ग्रह वक्री बिक्री निघणार नाही.
आई ग्ग!! Lol Lol
माझे बाई मेक अपशिवायच सगळेच्या सगळे एग्झाल्टेड ( उच्चीचे) निघाले Wink

जिद्दु, तुम्ही इथे अजून लिहिणार नाही असं म्हटलंय. त्यामुळे नाही लिहिलंत तरी चालेल, पण तुमच्या वरच्या पोस्ट्स वाचून एक विचार मनात आला.
आत्महत्या करण्याइतकी दारुण निराशा एखाद्याला वाटणे ही त्याच्या आयुष्यातली फार मोठी उलथापालथ नाही का? ती का नाही प्रेडिक्ट करता येणार? (जर फलज्योतिषात अर्थ असेल तर) उलट अपघात झाला तर तो अनपेक्षित म्हणता येईल. त्यात त्या व्यक्तीची स्वतःची चूक असेलच असं नाही, मोठी कारणपरंपरा असेल असं नाही. पण आत्महत्येला लॉजिक असू शकतं. त्याचा अंदाज का नाही लावता येणार?

आमच्या ऑफिस खाली एक सेफोरा नावाचे दुकान आहे. मी तिथून शंभर लिपस्टिक्स ( रेव्ह्लॉन किंवा बेअर मिनरल्स) आणेन, मग जवळच्याच स्टेपल्स मधून हजार कोरे कागद आणेन. हजार लोकांना जमवून त्यांच्या ओठांचे ठसे ( कागदावर, एकमेकांच्या ओठावर नव्हे) घेइन. अर्थात प्रत्येकाचे ठसे वेगवेगळे असतील. ( व्हटा व्हटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे) शिवाय त्या कागदांमागे त्यांची माहिती ( शिक्षण, पगार, वैवाहिक स्थिती , आरोग्य) आता हे सारे मशीन लर्निंग च्या चरख्यात घालेन. मग तिकडून काही अर्थपूर्ण निष्कर्ष येणर आहेत का? मग या प्रयोगात आणी हस्तरेखा, पायावरच्या रेखा, जन्मकुंडली, यात काय फरक आहे? मुळात क्ष आणी य यांच्यात कार्यकारणभाव नसेल तर मशीन लर्निंग चा उपयोग काय ?

ज्योतिष शास्त्राचे आस्तिक आणि नास्तिक यांच्यात सडन डेथ गेम खेळावा. आस्तिकाने पत्रिकेचा सहारा घ्यावा. नास्तिकाने विज्ञानाचा.
मग कुणीही "अब हम इसे घुमायेंगै. अब गोली कहा हमको नही पता" असे म्हणावे.
पत्रिकेच्या सहाय्याने गोली कहा हे जाणून घेणारास पहिला कि दुसरा टर्न हा चॉईस द्यावा. जर गोळी विषम क्रमांकावर असेल तर ज्योतिषी दुसरा टर्न घेईल. किंवा याऊलट.
विज्ञानाने गोळीचा क्रम जाणून घेणाऱ्यास मरायचे नसेल तर ज्योतिष बरोबर आहे. मी क्विट करतो असे म्हणावे लागेल.
जर ज्योतिषी मेला तर ते थोतांड आहे असे समजावे. नास्तिक मेला तर विज्ञान थोतांड आहे असे समजावे.
हाकानाका.

माहीत असलेल्या हजारो "अचूक" कुंडल्यामधला विदा (data) एकत्रित गोळा करून त्यावरून मशीन लर्निंग करून चाचणी करता येईल.

Pages