Submitted by विशाल कुलकर्णी on 4 December, 2008 - 01:20
सावळ्याची तनु सावळी
सावळीच सावली
का न मी झाले सावळी ?
राधा खंतावली
सावळ्याच्या मुरलीसवे
सुर ही सावळे
'काय माझे झाले असे हे'
राधेला ना कळे
गंधावली गवळण वेडी
रास सावळा खेळी
सावळ्याची प्रीत मनी अन
सावळा जळी स्थळी
पैलतीरी सावली सावळी
राधिके साद घाली
गेली वेडावुनी गोपिका
बासरी धुंदावली
प्रीत सावळी, भाव सावळा
श्याम तो सावळा
सुखाची चाहुल सावळी
जग राधे सावळा
विशाल.
गुलमोहर:
शेअर करा
सुदंर! विशा
सुदंर!
विशाल, तुझ्या कवीता नेहमी आकृतीबंधात वाटतात (यमक, गण, इत्यादी).
तु जानिवपुर्वक लिहीतो की आपोआपच होतात?
-हरीश
विशाल... छान
विशाल... छान आहे कविता...
पल्लवी
*********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !
यमुनातीरी
यमुनातीरी ती शाम-राधिका डोळ्यासमोर उभी राहीली. सावळी सुंदर कविता!
गंधावली
गंधावली गवळण वेडी
रास सावळा खेळी
सावळ्याची प्रीत मनी अन
सावळा जळी स्थळी
छान शब्द.
जग राधे सावळा, म्हणजे काय?
राधेचं
राधेचं सगळं जग सावळ्यातच सामावलेले आहे. सावळ्याशिवाय तिला दुसर्या कुठल्याही भौतिक गोष्टीशी देणेघेणे नाही असा हा अर्थ आहे.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.
http://maagevalunpahataana.blogspot.com