Submitted by अज्ञात on 4 December, 2008 - 01:16
कधि झडतो कधि पडतो
कधि रडतो कधि बागडतो
पाठशिवणीचा खेळ
कधि कधी रखडतोही
तरारलेल्या कोंबांना हवा असतो
निखळ वाहता वारा
अन माळावरच्या खडकाला
डंवरलेल्या वृक्षाचा मायाळू सहारा
दोघांजवळही असतो
एकमेकांना हवे ते देण्याचा उमाळा
म्हणूनच
उन्हाळा असूनही
नकळत बहरतो
मेघाळ आंतरिक जिव्हाळा
आभाळमाया ..... !!
....................अज्ञात
गुलमोहर:
शेअर करा
अज्ञातजी,
अज्ञातजी, खुप दिवसानंतर....आणि जोरदार पुनरागमन..
सुंदरच....
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
Great!! -Harish
Great!!
-Harish
>>उन्हाळा
>>उन्हाळा असूनही
नकळत बहरतो
मेघाळ आंतरिक जिव्हा>>>>
हा अज्ञात आहे
खडकाल
खडकाल मालावर मायालु व्रुक्ष डवरनार म्हनता? डोके आहेए काहो तुह्माला? का त्रास देताए लोकान्ना?
अहो राव (raw),
अहो राव (raw), ही भाषा बरोबर नाही. शांत व्हा जरा.
अज्ञात, ही कविता मला (बर्यापैकी) कळली. तुमच्या काही कवितांचा/शब्दांचा बरेचदा अर्थ लागत नाही. जड जड शब्द वापरण्यामुळे अर्थ हरवतो. तुम्ही स्वतःहून अर्थ लिहीत जा, किंवा जे लोक 'आवडली' म्हणून प्रतिक्रिया देतात त्यांनी तरी त्यांना कळलेला अर्थ लिहावा. किंवा सुटसुटीत कविता लिहिल्यात तर वाचायला आवडतील.
अज्ञात
अज्ञात सर,
काय लिहिता हो तुम्ही. एकदम आतलं. सर्वसाधारण माणसाला पटकन पहिल्या वाचनात कळणं कदाचित अवघड वाटेल. आहेच अवघड. लालु म्हणतात त्याप्रमाणे हरकत नाही.
पल्लीताईंना मेख बरोब्बर कळलेली दिसतेय.
मला यात संपूर्ण विश्वाचं प्रमेय दिसतंय.
*पहिल्या कडव्यात, जन्मलेल्या प्रत्येकाला न चुकलेला प्रवास दिसतोय.
*दुसर्यात, प्रत्येक स्वयंभू वाटणारं अस्तित्व हे कसं दुसर्यावर अवलंबून असतं हे दिसतंय. आणि
*तिसर्यात, देवाण घेवाणीतून समतोल साधणारं निसर्गाचं वास्तव आहे जे आपण सर्वांनी अनुसरायला हवं.
*ऋतुचक्र ही आभाळमाया आहे. जगाच्या अस्तित्वाचा तो आधार आहे.
हेच सौहार्द मानव जातीत अपेक्षित आहे.
आपल्याला असंच म्हणायचं आहे का ?
माफ करा अज्ञात सर, हे सर्व सांगून आपला उपमर्द तर करत नाही ना ?
आपल्याला रुचलं नाही तर तसं सांगा पुन्हा असं होणार नाही.
प्रनाम
प्रनाम लालूताई (ताई हे नन्तर कलाले. नाहितर यादव माहिति होते फक्त.)
मला सगले कच्चा ह्मनतात. तुमिच फक्त राव ह्मनालात. त्याबद्दल हजार आभार.
बाकिचे विशय गेले उडत.
राव,
राव, बहारीनला एक खूप जुना विशालकाय वृक्ष आहे, त्याला ट्री ऑफ लाईफ म्हणतात. तो दुर्गम अशा वाळवंटात उंच एका खडकाळ माळरानावर आहे. जिथे दुरवर कुठेही दुसरे झाड औषधालाही नाही. पाण्याचा टीपुसही नाही. अशा ठिकाणी हे झाड आहे. जे वर्षभर हिरवे असते. त्याच्या सावलीखाली वातानुकुलीत यंत्रासारखा (ए.सी.) गारवा अगदी ५५% तापमानातही असतो.
थोडे आपल्या भाषेवर संयम ठेवाल तर बरे. बाकी बोलण्यासारखे काही नाही. धन्यवाद.