अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो,

एक लेख पूर्वीच वाचण्यात आला. तो देवयानींच्या चालू प्रकरणात अत्यंत समयोचित आहे. यंदाच्या ऑगस्टात लिहिलेला आहे. त्यातील एक निरीक्षण :

>> बऱ्याच पाश्‍चिमात्य देशांचे राजदूत व राजनैतिक अधिकारी भारतातले नियम पाळण्यापासून पळवाट काढतात.

पुढे एक प्रश्न लेखकाने विचारला आहे. आपल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्नही केला आहे. लेख मुळातून वाचवा असं सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

चर्चा फक्त काहीजण करत आहेत.
बाकीचे फक्त सोयीस्कर एकांगी बाजु घेवुन भान्डत आहेत अस वाटतय वाचुन.

डोकं शांत ठेवुन चर्चा झाली तर जास्त चांगली होते.

अनेक भारतीयांनी मनोमन अमेरीकेला आपला बाप मानले आहे याची प्रचीती आली...अश्या गद्दार लोकांमुळेच भारताचा अपमान करता येतो

गानू आजोबा

पण भारताच्या पंतप्रधानचे अमेरिका प्रेम तर सर्वश्रुत आहे. तुमचा रोख त्यांच्याकडे आहे का???
Wink Wink Wink

गानू आजोबा

काहीतरी चर्चात्मक असेल तर बोला, नाहीतर माझ्यासारख निर्विकारपणे इतरांचे प्रतिसाद वाचा.
उगीचच देवयानी दलित आहे म्हणून चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न करू नका. येथील प्रतिसाद वाचल्यास
आपणास कळून येईल कि ती भारतीय असल्यामुळे काही जण तिच्या बाजूने बोलत आहेत, दलित असल्यामुळे नाही. आणि जे याचा प्रतिवाद करत आहेत त्यांच्या प्रतिसादात सुद्धा मला कुठे काही जातीवाचक दिसलेलं नाही.

अनुमोदन सुनटुन्या. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे "आम्ही एकशेपाच" म्हणून सगळे एक झालो आहोत तेच कायम ठेवणे उचित ठरेल.

Drop case against Khobragade: Indian-Americans to Obama
Chidanand Rajghatta TNN

Washington: A section of the Indian-American community in the United States has petitioned President Barack Obama to drop the criminal case against Indian diplomat Devyani Khobragade, who is charged with visa fraud in the context of bringing an Indiabased domestic assistant to New York, saying the manner of her arrest and her public humiliation “injures the sentiments of the Indian American community” and “such incidents are bound to strain the Indo-US relations.”
In a White House petition generated on December 18, the activists recounted the events surrounding her arrest and said there was “perceptible animus in the manner in which the arrest was handled,” an episode they said involved her being detained when she was dropping her daughter to school, followed by hand-cuffing, strip-search, and body cavity search before being temporarily incarcerated.
Protesting the “manner of detention” (but not the case itself), the petitioners requested the President that given the trauma and public humiliation the diplomat has “egregiously suffered, the criminal case against her should be dropped immediately.” The petition described her as one of the faces of Indian government for the Indian community in the United States.
Some 400 people had signed the online petition at the time of writing this article under a new “We the People” provision that allows Americans to seek a White House review on important national issues.
A whitehouse.gov user account needs to be created to sign the petition. If a petition gets enough support, White House staff reviews it, ensures it is sent to the appropriate policy experts, and issues an official response. To cross the first threshold and be searchable within WhiteHouse.gov, a petition must reach 150 signatures within 30 days (which this one has done). To cross the second threshold and require a response, a petition must reach 100,000 signatures within 30 days. Among the more popular and successful petitions is one seeking pardon for whistleblower Edward Snowden that has gathered some 142,000 signatures. Another petition to declare Muslim Brotherhood a terrorist organization has 196,000 signatories.

फारेण्डा,
"शेवटी वाचले"त त्यावरून फक्त प्रतिसाद लिहितो आहे. कुणाला कोणत्या बकेटमधे घालायचे, ते फक्त façade वरून ठरत नाही. आतला आवाजही पहावा लागतो. वडाची साल पिंपळाला कशी लावावी याचे उदाहरण म्हणजे तुमचा मोट्ठा प्रतिसाद. तुम्हास तो लिहावा लागला, कारण मी बोललो त्याला काही अर्थ आहे. नाहीतर तुम्ही धाग्यावरचे लै प्रतिसाद इग्नोर मारत आहात, तसा मारला असता.
अगदी, पंतप्रधानांच्या बोलण्याची किंमत तुम्ही काढली नाहीत इत्यादी शिशूवर्गालाही मूर्ख बनवणार नाहीत असली स्टेटमेंट्स. इत्यादी.
आता पुढे ** नंतर उत्तर आहे: फक्त शेवटल्या मुद्द्याचे. तेही, फारेण्ड नामक आयडी सकृतदर्शनी तरी निष्पक्ष वाटतो म्हणून.
गिरेबान, झाँकना इत्यादी गेले फाट्यावर..

**
एकदम भिक्कारचोट अ‍ॅटिट्यूड!>>> हे जरा शेवटी वाचले. आधी वाचले असते तर ही वरची उत्तरे देत बसलो नसतो. इथे इतर लोक लिहीतात त्याच्याशी माझ्या पोस्टचा संबंध नाही. मी जे लिहीले आहे त्यावरून बोलावे कृपया.
<<
फारेण्डा,
ही अ‍ॅटीट्यूड तुमची आहे, असे मी म्हटले, अशी तुमची समजूत कशी काय झाली?

मायबोलीकरहो, वरील भिक्कारचोट अ‍ॅटीट्यूड कुणाची, याबद्दल माझे वाक्य वाचून मी कुणाबद्दल बोलतो आहे असे आपणास वाटते, याचा कौल द्याच!

ऑट ऑफ कॉन्टेक्स्ट वाक्ये काढून घाण बोलायचे आहे का? त्यात मी तुम्हाला पुरून उरेन ही ग्यारंटी. माझे पूर्ण वाक्य खाली कॉपी पेस्ट करतो आहे..>>

>>च्या*ला! भारतातून त्या मेडच्या फ्यामिलीला 'इव्हॅक्युएट' करतात! फारच माज आहे हा. जणू हितं युद्ध पेटलंय. एकदम भिक्कारचोट अ‍ॅटिट्यूड! जौद्या. लैच भडकलंय माझं.<<

ह्या वाक्यातून त्या अ‍ॅटीट्यूडशी तुमच्याशी व्यक्तीगत संबंध आहे, असे कसे वाटते तुम्हाला? वर कौल मागितला आहे. ही अ‍ॅटिट्यूड अमेरिकेची की फारेण्ड यांची??..

अगदीच काहीच (xx) वाटत नाही का मोडतोड करून असे बोलताना? पूर्ण स्क्रीनशॉट डकवू इथे?

तुम्हाला थोडी पाचपोच असेल असे समजलो होतो आजपर्यंत. आताम तुम्हाला निष्पक्षपातीपणाचा आव आणता येतो फक्त, इतकेच म्हणतो.

यापुढचे/मागचे तुमचे सर्व प्रतिसाद बायस्ड म्हणून फाट्यावर!

कारण तुमची आकलनशक्ती मी लिहिलेले सरळ मराठी मोडतोडण्यातच खर्ची होते आहे हे दिसले मला.

डिजगस्टिंग! या धाग्याचे नाव 'कोण कुणाचा किती अपमान करतंय पाहू' असं करायला हरकत नाही आता. वेगवेगळे कंगोरे वाचायला मिळत आहेत याचा आनंद मानायचे सोडून वैय्यक्तिक शेरेबाजी सुरू झाली. आता "पुरेशी चर्चा झालेली आहे" असे अ‍ॅडमिन पुरस्कृत कुलूप लागणार लवकरच.

मंदारवा,
लागू द्या कुलुप.
चर्चा करताना लै निष्पक्षपातीपणाचा वा वैयक्तिक नसल्याचा आव आणणारे डोक्यात जातात माझ्या. आतून बाहेरून अजेंडे पाहिलेत मी.
प्रत्येकाला पर्सनल व्ह्यूपॉईंट असतोय. अन जो तो आपला व्ह्यू पुढे ढकलतोय. यात चुकीचे काहीच नाही. फक्त माझं जास्त पुढे ढकललं गेलंय हे पाहून बाकीचे बोंबाबोंब करतात इतकेच सत्य आहे..
तुम्हाला काय वाटते? मा. अ‍ॅडमिन यांनी धागा वाचलाच नसेल?
एल ओ एल.
..

फक्त माझं जास्त पुढे ढकललं गेलंय हे पाहून बाकीचे बोंबाबोंब करतात इतकेच सत्य आहे..>>

एल ओ एल. हास्यास्पद वाक्य.

If you feel so desperate to have the last word, तर या नंतर एक कमेंट टाकच. म्हणजे समाधान होईल तुझे. Happy

मी अजूनही कोणाबद्दलही व्यक्तिगत लिहीलेले नाही.

ऑट ऑफ कॉन्टेक्स्ट वाक्ये काढून घाण बोलायचे आहे का?>> कोण घाण बोलत आहे? मी लिहीले त्यात "घाण" काय आहे? मी येथे कधीही घाण लिहीत नाही. माझ्या येथील असंख्य पोस्ट्स शाबूत आहेत. कोणीही कधीही चेक कराव्यात.

त्यात मी तुम्हाला पुरून उरेन ही ग्यारंटी.>> तशी वेळ येइल तेव्हा पाहू. जगातील घाण लिहीण्याचे कौशल्य फक्त तुम्ही राखून आहात व केवळ सेल्फ कंट्रोल मुळे तसे लिहीत नाही हा तुमचा समज असेल तर मला त्यात पडायचे काहीच कारण नाही.

ही अ‍ॅटीट्यूड तुमची आहे, असे मी म्हटले, अशी तुमची समजूत कशी काय झाली? >>> तुमची ती पोस्ट माझ्या पोस्टला उत्तर म्हणून बरीचशी होती. त्यातील बहुसंख्य भाग माझ्या पोस्टला "आता चिरफाड स्टाइल उत्तर" या मथळ्याखाली आलेली आहे. मग त्यातील हे वाक्य माझ्याबद्दल नाही, हे तुम्ही स्पेसिफिकली सांगितल्याशिवाय मला कसे कळणार?

तुम्हाला थोडी पाचपोच असेल असे समजलो होतो आजपर्यंत. आताम तुम्हाला निष्पक्षपातीपणाचा आव आणता येतो फक्त, इतकेच म्हणतो.>>> तुम्ही किंवा कोणीही माझ्याबद्दल काय समज करून घेणार हे मी कंट्रोल करू शकत नाही. फक्त तुम्ही तसा आरोप केलेलाच आहे तर काय निष्पक्षपाती नाही ते सांगायची तसदीही घ्या.

पोस्ट मधले कोणते वाक्य कोणाला आहे हे संदिग्ध ठेवायचे आणि त्यावरून काही झाले की वाचणारा घाण लिहीतो, निष्पक्षपाती नाही ई. अजब तर्कशास्त्र आहे हे.

फारेण्डा,
तुमची व माझी पोस्ट तिथेच आहे.
लोकांना ठरवू द्या कोण काय बोलते आहे ते Happy ओके?

>>
पोस्ट मधले कोणते वाक्य कोणाला आहे हे संदिग्ध ठेवायचे आणि त्यावरून काही झाले की वाचणारा घाण लिहीतो, निष्पक्षपाती नाही ई. अजब तर्कशास्त्र आहे हे.<<

वैयक्तिक, तर्कशास्त्र इत्यादी शब्दही कसे काय बोलू शकता तुम्ही? स्वतःचीच पूर्ण पोस्ट वाचा, अन मग ठरवा कि व्यक्तिगत शेरे ताशेरे आहेत की नाहीत. हसू बी येईना राव Sad

मंदार जोशी,
तुमची कॉमेंट एडिट केल्याबद्दल धन्यवाद! पण ती तुमची जुनी सवय आहे, हे मायबोलीवर सर्वांना ठाउक आहेच. Wink

इब्लिस ह्यांच्या सर्व पोष्टींशी सहमत!

तसेच, फारेंड ह्यांनी नेहमीप्रमाणे संतुलित व मुद्देसूद पोष्टी लिहिल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन, ह्यात त्यांनी मांडलेल्या मुद्यांना अनुमोदन आहे की नाही हा मुद्दा नाही.

अरे हो,
जोशी,
तुम्हाला अरे तुरे वर उतरावे लागतेच नेहेमी. ओसीडी आहे का तुमची?
अगदी प्रेमाखातर देखिल कुणालाही ओळखपाळखिशिवाय एकेरीवर का उतरता तुम्ही?

@ अ‍ॅडमिन महोदय,
धाग्याशी अवांतर व वैयक्तिक प्रतिसाद आहे, हे ठाऊक आहे.
पण नाईलाजास्तव लिहिणे भाग आहे.. जमल्यास माफी द्यावी. धन्यवाद.

@ अ‍ॅडमिन
धाग्यावर वय्यक्तिक प्रतिसाद आधी कुणी टाकले हे तुम्हास विदीत आहे. तेव्हा त्यांना माफी देऊनच टाका Happy

ओके मीही थांबतो या तुमच्या मुद्यांशी असलेल्या वादाबद्दल. मला जे म्हणायचे आहे ते मी ऑलरेडी लिहीलेले आहे.

आता इतरांसाठी: कालची माझी मूळ पोस्ट ही सध्याच्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न होता. कोण चूक किंवा बरोबर ते ठरवण्यासाठी नाही. मला भारतात असताना जे दिसले व येथे आल्यावर येथील इमेज दिसली त्यावरून ते लिहीले होते. या बाफ वरच्या माझ्या कोणत्याही पोस्टवरून जाणवेल की मूळ घटनेबद्दल मी काहीही जजमेण्टल लिहीलेले नाही. फक्त नंतर काय चालू आहे त्याबद्दल लिहीलेले आहे.

(आणि मी इतरांच्या पोस्ट इग्नोर मारल्यात हे ही खरे नाही. त्यावर माझ्याकडे नवीन लिहीण्यासारखे काही नाही, म्हणून लिहीले नाही).

गप्पिष्ठ, मी इब्लिस ह्यांच्या ह्या धाग्याशी संबंधीत असलेल्या पोष्टींशी सहमत आहे. Happy

आप्णा दोघांमध्ये जो वाद किंवा चर्चा चालू आहे त्याबाबत माझे काहीच मत नाही.

Pages