शेवटी

Submitted by आनंदयात्री on 16 December, 2013 - 05:51

बोलतो कितीतरी तरी कमीच शेवटी
राहते मनातले खरे मनीच शेवटी

चांगले असूनही इथे न भागते मुळी
पाहिजे इथे इमेज चांगलीच शेवटी

साथ द्यायला कुणीच आपली न धावती
वाटती तरी उगाच आपलीच शेवटी

चंद्र भोवती कुठे नकोच वावरायला
स्पेस चांदण्यासही जरा हवीच शेवटी

पाहतो निमूट सर्व जे घडेल ते तसे
लागतात अर्थ सर्व नेहमीच शेवटी

काय माहिती? कुणी असेलही, नसेलही!
आसपास, अंतरात पोकळीच शेवटी

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/12/blog-post.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साथ द्यायला कुणीच आपली न धावती
वाटती तरी उगाच आपलीच शेवटी >> "आपली" चे प्रयोजन लवकर उमजत नाही... काफियासाठी तसे केले आहे असे वाटले.(वै.म.कृ.गै.न.)

चंद्र भोवती कुठे नकोच वावरायला
स्पेस चांदण्यासही जरा हवीच शेवटी >> ग्रेट खयाल..

बाकी गझल नचिकेत टच.. Happy

पाहतो निमूट सर्व जे घडेल ते तसे
लागतात अर्थ सर्व नेहमीच शेवटी

काय माहिती? कुणी असेलही, नसेलही!
आसपास, अंतरात पोकळीच शेवटी

व्वा

उरलेल्या शेरांत नचिकेत कमी दिसला.

शुभेच्छा!

Happy आवडली

काय माहिती? कुणी असेलही, नसेलही!
आसपास, अंतरात पोकळीच शेवटी>>> हा सर्वात जास्त आवडला

गझल नेहमीप्रमाणेच सुबक, प्रवाही आणि परिपक्व, पण यावेळी खयालांमध्ये नावीन्य मिळाले नाही. आपण राग मानणार नाहीत अशी आशा करतो या परखड प्रतिसादाबद्दल! धन्यवाद!

(अवांतर - अनेक ओळी स्वतंत्ररीत्या खूपच आवडल्या आणि शेर म्हणून समाधान झाले नाही असे काहीतरी झाले ह्यावेळी माझे)

चांगले असूनही इथे न भागते मुळी
पाहिजे इथे इमेज चांगलीच शेवटी

साथ द्यायला कुणीच आपली न धावती
वाटती तरी उगाच आपलीच शेवटी

चंद्र भोवती कुठे नकोच वावरायला
स्पेस चांदण्यासही जरा हवीच शेवटी

>> मस्त !

सर्वांचे आभार.
राजीव, चांदणेच म्हणायचंय...

बेफिकीर, नावीन्य नसेलही. पण यावेळी पहिल्यांदाच इंग्लिश शब्द वापरले आहेत, तो प्रयोग करून बघायचा होता. आभार.. Happy