Submitted by चाऊ on 2 December, 2008 - 10:11
निळ्या सावल्या डोळ्या भोवती
शीण रेषा भालावरती
जगण्याचा हा ताण अनावर
रोज किती करु ह्या कसरती
चाकरीची चाकोरी
थकुन गात्रे यावे घरी
माझ्या अनोळखी माणसांच्या
तेथेही ना ना परी
प्रवास वेडा जीवघेणा
पोटासाठी एक दिशा
चरका जुडले एक जनावर
मुक्त होण्याची आकांक्षा
मना वाटते घरी रमावे
मुला लेकरा कुरवाळावे
मनाजोगते काही करावे
शांत निवांत जीणे जगावे
थकल्या नयनी स्वप्न अपुरे
भरल्या घरी लेकरांची लेकरे
गेली सोडून पिले पाखरे
जन्म भराचे फळ काय उरे?
गुलमोहर:
शेअर करा
खर
खर आहे
स्वप्नातल्या कळ्यानो .......अस वाटल
कवितेत आशय सहजपणे आला आहे ,छान
थकल्या
थकल्या नयनी स्वप्न अपुरे
भरल्या घरी लेकरांची लेकरे
गेली सोडून पिले पाखरे
जन्म भराचे फळ काय उरे?
याचसाठी केला | होता अट्टाहास |
शेवटचा घास | सु़खी जावा ||
-हरीश