बरं झालं - अतिरेक्यांची गोळी करकरेंचं बुलेट-प्रूफ जॅकेट भेदून गेली. आता निदान पोलिसांना निविदा, कंत्राटं इ. च्या कचाट्यात न अडकलेली बुलेट-प्रूफ जॅकेटस मिळतील.
बरं झालं - करकरेंच्या पत्नीनं मोदींची आर्थिक मदत नाकारली. निदान आता तरी निगरगट्ट मोदींना शहाणपण येईल.
बरं झालं - गिरगाव चौपाटीवर अतिरेक्यांवर तीन(च) फैऱ्या झाडल्यावर पोलिसांच्या बंदुका नादुरुस्त झाल्या. निदान पोलिसदलाकडे दुर्लक्ष झाल्याचं मुर्दाड राजकारण्यांच्या लक्षात तरी आलं. (की त्यांनी मिडियासमोर नुसतं तसं दाखवलं? कारण आजपर्यंत त्यांनी दुसरं केलंय तरी काय? )
बरं झालं - राम गोपाल वर्मा आणि रितेश देशमुख पण ताज हॉटेलमध्ये ’मजा’ बघायला गेले. निदान त्यामुळे तरी निर्लज्ज मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची सोडली.
बरं झालं - ताजमध्ये दगावलेल्या टाईम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ स्त्री-पत्रकाराचा त्या दिवशी हरवलेला मोबाईल रायगड जिल्ह्यात कुठेतरी सापडला. निदान त्यामुळे दहापेक्षा जास्त अतिरेकी मुंबईत घुसले होते हे सामान्य जनतेला कळलं.
बरं झालं - हेलिकॉप्टर मधून दोरखंडाच्या सहाय्याने सरसर उतरणारे कमांडो अवघ्या देशाने पाहिले. निदान तसंच प्रशिक्षण पोलिसांनाही देता येऊ शकतं हा मतप्रवाह निर्माण झाला.
बरं झालं - मिडीयावाल्यांच्या अति उत्साहामुळे कमांडो कारवाईला विलंब लागला. निदान आता तरी मिडीयासाठी एखादी आचारसंहिता बनवली जाण्याची आशा (पुन्हा एकदा) निर्माण झाली.
बरं झालं - फटाक्यांचा आवाज ऐकून कुतुहलानं बाहेर डोकावलेल्या हरिशचा दुसऱ्या क्षणी अतिरेक्यांची गोळी लागून जीव गेला. तो फटाक्यांचा आवाज नसून बंदुकांचा होता हे कळायच्या आत त्याचा प्राण गेला. निदान आता तरी उठसूट कुठल्याही कारणांसाठी रस्त्यांवर फटाके फोडण्यावर निर्बंध घातले जातील ही आशा (पुन्हा एकदा) निर्माण झाली.
बरं झालं - अतिरेकी समुद्रामार्गे मुंबईत घुसले. त्याच समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं घाणेरडं राजकारण करणाऱ्या आणि ते उभारण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चायला तयार असणाऱ्या राजकारण्यांना आता महाराजांचा आत्माच मुस्कटात भडकावून ’आधी सागरी सीमा सुरक्षित ठेवा’ म्हणून खडसावेल.
बरं झालं - अतिरेक्यांनी या वेळी उच्चभ्रू हॉटेल्स आणि उच्चभ्रू व्यक्तींना वेठीस धरलं. दर चार-सहा महिन्यांनी कुठे ना कुठे बॉंबस्फोटांत मरणाऱ्या सामान्य लोकांची अगतिकता यांच्या उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपली.
बरं झालं - आय. एस. आय. च्या प्रमुखांना भारतात पाठवण्याचं कबूल करून नंतर पाकिस्ताननं घूमजाव केलं. निदान आता तरी डोळ्यांवर कातडी ओढून बसलेल्या अमेरिकेला पाकिस्तानचा दुटप्पीपणा लक्षात येईल.
बरं झालं - माझ्यासारख्या सामान्य भारतीय नागरिकाला (इच्छा नसताना) अशी खोचक भाषा वापरावीशी वाटली.
असेच, राजकारण्यांच्या पापांचे पाढे अजून वाढतील, या यादीत अजून भर पडेल...
पण, एक ना एक दिवस काही ठोस उपाययोजना केली जाईल आणि निदान आपल्या पुढच्या पिढ्या तरी निर्भय मनानं जगतील.

>>एक ना एक दिवस काही ठोस उपाययोजना केली जाईल आणि निदान आपल्या पुढच्या पिढ्या तरी निर्भय मनानं जगतील.
अगदी अगदी! आशेवर जग आहे.
ललिता, नेहमीप्रमाणेच 'टू द पॉईंट'.....
मंजूला अनुमोदन.
------------------------------
आता "जिंकू किंवा मरु" या गाण्याची नव्हे, तर "आम्ही जिंकू व तुम्हाला मारु" ह्या शौर्यगजराची आवश्यकता आहे.
हो किमान उद्या आपल्यालाही अशाच परिस्थितीत बळी जावं लागलं तरी ह्यावरुन धडा घेऊन कार्यवाही होईल आणि त्यामुळे पुढची पिढी निर्भय मनाने जगू शकेल अशी आशा बाळगायला हरकत नाही..
छान लिहिलं आहे. पण -
<<बरं झालं - करकरेंच्या पत्नीनं मोदींची आर्थिक मदत नाकारली. निदान आता तरी निगरगट्ट मोदींना शहाणपण येईल<<>>
मोदींनी अशी कुठलीही मदत करकरेंच्या पत्नीला दिली नव्हती. ती बातमी चुकीची होती.
<<बरं झालं - ताजमध्ये दगावलेल्या टाईम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ स्त्री-पत्रकाराचा त्या दिवशी हरवलेला मोबाईल रायगड जिल्ह्यात कुठेतरी सापडला. निदान त्यामुळे दहापेक्षा जास्त अतिरेकी मुंबईत घुसले होते हे सामान्य जनतेला कळलं.<<>>>>
सबीना सैकीया यांचा फोन हा पूर्णवेळ ताजमध्येच होता. त्या भागातले टॉवर्स काम करेनासे झाले की रायगड जिल्ह्यातील टॉवर्स सिग्नलची देवाणघेवाण करतात. एअरटेलने त्या दिवशी अर्धवट माहिती दिली होती. आणि आपल्या मूर्ख वार्ताहरांनी ती उचलून धरली.
शिवाय, इंटरनेट हाताशी असलेल्या अनेकांनी घाईत सबीनाला अतिरेकी ठरवलं. हा बिनडोकपणाचा कळस होता.
अतिरेक्यांची संख्या किती होती, हा मुद्दा वेगळा. पण सबीनाच्या फोनशी त्याचा काहीच संबंध नाही.
.....
An eye for an eye makes the whole world blind.
बर झाल केरळ च्या मुख्यमंत्र्यां ना शहिद मेजर सन्दिप च्या पितश्रि नि घरातुन हाकलले.... आता तरि निगरगट्ट राजकारणी सुधारतील.
अगदी सच्चा लेख आहे. शेवटी आशेवरच जग आहे. तिलाच धरुया आपल्या पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी.
*****************
सुमेधा पुनकर
*****************
>एक ना एक दिवस काही ठोस उपाययोजना केली जाईल आणि निदान आपल्या पुढच्या पिढ्या तरी निर्भय मनानं जगतील.
तुला खरंच असं वाटतं? सॉरी, पण मला भारताकडून आता कुठल्याच आशा-अपेक्षा नाहीत!
ललिता छान लिहिलस
ललिता,
छान लेख.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ललिता , तुमच्या लेखात म्हणल्याप्रमाणे आशा बाळगायला मलाही आवडेल.
पण दुर्दैवाने मला सायुरीचेच मत खरे ठरण्याची जास्त शक्यता वाटते आहे. हे खरोखर खुप दुर्दैवी आहे पण कटु असले तरी सत्य आहे,
आता हेच बघा ना, कालचे ओबामाचे स्टेटमेंट आहे कि भारताला वादग्रस्त काश्मीरवर हल्ला करण्याचा पुर्ण अधिकार आहे आणि आम्ही शक्य ती मदत करायला तयार आहोत. तरी सुद्धा आपले सरकार केवळ इशारे देणे आणि निषेधपत्र पाठवणे या वरच समाधानी आहे.
फक्त भारताकडुन म्हणण्यापेक्षा मी या सरकार कडुन असे म्हणेन. अर्थात कुठलेही सरकार आले तरी चित्र फार काही वेगळे असेल असे वाटत नाही.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
भारताला वादग्रस्त काश्मीरवर हल्ला करण्याचा पुर्ण अधिकार आहे >> हे कुठे वाचले तुम्ही ? जरा लिंक द्याल का प्लीज ...
अहो विशाल आपला भारत देश 'शांतता प्रिय' (
) देश आहे, शिवाय नुसतेच निषेधपत्र आणि इशारे देईल नाहीतर काय करेल? अजून काही करण्यासाठी हात बरेच लांब लागतात. आहेत का ते आपल्याकडे?
आणि ओबामा हा ही शेवटी सत्तेतला प्रतिस्पर्धीच. तो काय मजा पहायला टपलेलाच असेल. आज भारताला सांगतोय की काश्मिरवर हल्ला करण्याचा तुम्हाला पुर्ण अधिकार आहे, उद्या पाकिस्तानला पण भारतावर हल्ला करायला सांगेल, काय भरवसा?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ललिता, लेख आवडला..
-------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
बरं झालं, तु हा लेख लिहिलास, बरं होइल जर राजकारण्यांनी हा वाचला तर.. पण....
>>बरं झालं - अतिरेक्यांची गोळी करकरेंचं बुलेट-प्रूफ जॅकेट भेदून गेली. आता निदान पोलिसांना निविदा, कंत्राटं इ. च्या कचाट्यात न अडकलेली बुलेट-प्रूफ जॅकेटस मिळतील. >> हे मला आवडलं नाही. शहीद करक्रे साहेब नुसते जखमी असते तर हे वाचायला बरं वाटलं असतं पण.... वाईट झालं.
<<भारताला वादग्रस्त काश्मीरवर हल्ला करण्याचा पुर्ण अधिकार आहे>>
दीपुर्झा, वेबवर आहे की नाही माहीत नाही, पण कालच्या मुंबई म. टा. च्या पहिल्याच पानावर खालच्या बाजुला (bottom right) ही बातमी होती. अर्थात हे तितकेच सत्य आहे कि हे विधान करण्यामागे ओबामांना काही भारताचा खास कळवळा आहे अशातला भाग नाही. तो संदर्भ एवढ्यासाठी दिला कि आता बाहेरचे लोक सल्ले द्यायला लागले आणि आपले सरकार मात्र फक्त इशारे देतंय...जे आज पर्यंत करत आलंय....आणि त्याचा आजपर्यंत काहीही उपयोग झालेला नाही किंवा त्यापलिकडे जावुन कुठल्याच सरकारने काहीही केलेले नाही.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
थोडक्यात काय तर? घरची भांडणं आता चव्हाट्यावर आली आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रीतीताई, तुम्ही फेमस झालात..
तुमचा हा लेख मला आज इमेल मधुन आला.. अर्थात नावाशिवाय..
मी ही लिंक पाठवून कोण लेखिका आहे हे कळवले आहे..
ढापूगिरी कधी संपणार !!
विशाल कुलकर्णी,
अगदी बरोबर. अनाहूत सल्ले देण्यात अमेरिकेचा हात कुणी धरणार नाही. खरं तर जिथे तिथे नाक खुपसायच्या त्यांच्या वर्षानुवर्षांच्या सवयीमुळेच आज आपल्यावर ही पाळी आली आहे.
पल्ली,
मी तुमच्याशी सहमत नाही. करकरे साहेब नुसते जखमी झाले असते तर ही बाब इतक्या प्रकर्षाने समोर आली नसती. तशीच ती आठ-दहा पोलीस शिपाई जखमी झाले असते तरीही जाणवली नसती. भलेभले धारातीर्थी पडतात तेव्हाच कारणे खरेपणाने शोधली जातात.
बी. एस्स. के. ---
मनापासून धन्यवाद.
ढापूगिरी करणारे करोत बापडे. पण जोपर्यंत आपल्यासारखे जागरूक मायबोलीकर आहेत तोपर्यंत चिंता नाही.
ललिता,
मलाही तुमचा लेख परवा म्हणजे ४ तारखेला ईमेल मधून आला होता...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ललित, काय सुरेख लिहितेस गं. त्या पार्ल्याच्या बीबीवर मायबोलिवरच्या साहित्याची टिंगल टवाळी करणार्यांना चांगले लेख दिसत का नाही कळत नाही.
बी,
धन्यवाद.
मस्त ललिता, सगळे माझ्या मनातलच वाचतेय असे वाटले.
उत्तम लेख! अप्रतिम!!
फक्त आता आशेवरचाच विश्वास उडत चाललाय..