अमेरिकेतील ९/११ च्या नंतर १२ सप्टेंबरला मायबोलीवर टाकलेली ही कविता.. आज खरी ठरते आहे...
म्हणुन आज परत इथे टाकावीशी वाटते आहे...
तो काळा डोंगर अंगावर धाउन येणारा
तरी चिरकाल तटस्थ असणारा
मी हालचाल करत नाही त्याच्या छायेखालीच जगतोय
मनातली भीती मारुन तो कोसळण्याची वाट बघतोय
रोजच कोसळते त्या पर्वतावरुन दरड
अन उद्ध्वस्त करुन जाते एखादे छोटे घरटे
मग काही दिवे पेटतात,
पांढरी पाखरे उडतात
वर्तमानाचे मथळे बदलून
पुन्हा निद्रिस्त होतात
त्याचीही वामकुक्षी संपते
त्यालाही कंटाळा येतो घरटी पाडायचा
आणि तो शोधायला लागतो बहरलेले डेरेदार वृक्ष
त्या लाकडानी रचायच्या असतात त्याला चिता
नितळ पाण्याच्या आणि निळ्या स्वच्छ आकाशाच्या
पण आम्हाला आता सवय झालीय पडणारी घरटी बघायची
त्या मोडलेल्या काटक्यां पासून स्वत:ची घरटी सावरायची
परवाच्या दरडी बरोबर त्या डोंगरावरचा एक गाव कोसळला
अन डोंगरावर वसलेला गाव डोंगराच्या मुळावर उठला
अजुन तो डोंगर आमच्या माथ्यावर उभा आहे
त्यानी उपसल्या वर डोंगर, दरड आमच्यावर कोसळणार आहे
तरीही मी हलणार नाही कारण काठीवाला पुतळा इथेच जन्मला होता
त्याच्या काठीवर टांगायला फ़लक लिहून घेतोय "इथे माझा गाव होता". . .
सत्यजित.
सत्या, हे
सत्या, हे खुप टोचतं रे..पण हे असंच चालायचं! या निमित्ताने एक आठवण झाली. रंगनाथ पठारे यांची " गांधीजी ११ सप्टेंबर २००१" म्हणुन एक कथा वाचली होती. मी शोधतो माझ्याकडे हार्ड कॉपी असेल, स्कॅन करुन टाकेन जमल्यास. आजच्या या परिस्थीतीवर जळजळीत भाष्य आहे ते.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
सुंदर,
सुंदर, अतिशय अर्थपूर्ण कविता आहे हि!
वर्षा
मला पचायला
मला पचायला जड जातेय.
BEAUTIFUL !!
BEAUTIFUL !!
तो काळा
तो काळा डोंगर अंगावर धाउन येणारा तरी चिरकाल तटस्थ असणारा.मी हालचाल करत नाही त्याच्या छायेखालीच जगतोय.मनातली भीती मारुन तो कोसळण्याची वाट बघतोय.रोजच कोसळते त्या पर्वतावरुन दरड
अन उद्ध्वस्त करुन जाते एखादे छोटे घरटे .मग काही दिवे पेटतात,पांढरी पाखरे उडतात.वर्तमानाचे मथळे बदलून
पुन्हा निद्रिस्त होतात.त्याचीही वामकुक्षी संपते.त्यालाही कंटाळा येतो घरटी पाडायच..आणि तो शोधायला लागतो बहरलेले डेरेदार वृक्ष.त्या लाकडानी रचायच्या असतात त्याला चिता नितळ पाण्याच्या आणि निळ्या स्वच्छ आकाशाच्या
पण आम्हाला आता सवय झालीय पडणारी घरटी बघायची ,त्या मोडलेल्या काटक्यां पासून स्वत:ची घरटी सावरायच.
परवाच्या दरडी बरोबर त्या डोंगरावरचा एक गाव कोसळला अन डोंगरावर वसलेला गाव डोंगराच्या मुळावर उठला.
अजुन तो डोंगर आमच्या माथ्यावर उभा आहे त्यानी उपसल्या वर डोंगर, दरड आमच्यावर कोसळणार आहे
तरीही मी हलणार नाही कारण काठीवाला पुतळा इथेच जन्मला होता.त्याच्या काठीवर टांगायला फ़लक लिहून घेतोय "इथे माझा गाव होता"
तुम्हाला कवितांच्या नावाखाली ललित (?) लिहायचा मुक्त छंद आहे का?
इतक्या
इतक्या अर्थपूर्ण कवितेला गद्य रुपात सादर करून ललित का म्हणावे? कवितेला एक लय असते, आवेश असतो, यमक असतो, जो इथे आहे. ह्या कवितेचे वाचन केले तर त्याची उंची लक्षात येईल. खूप काही अलंकाराने मढवली म्हणजे कविता, असे मला तरी वाटत नाही.