नापासाच्या ओव्या

Submitted by ji_nikhil on 30 November, 2008 - 02:31

रीझल्ट तो कळाला, गणवेश तो गळाला, कॉलेजचा प्रवेश, सम्पून जून गेला !
रॅगिंगची ति भीती, मित्रांत नविन नाती, गाडी नवीन हाती, जुलई सरून गेला !
लाजाळुता जिरविता, ऐटी नव्या मिरविता, दृष्टी 'तिथे' स्थिरवता, ऑगस्ट सरुन गेला !
पत्ता तिचा हुडकता, पार्किंगमधे धडकता, त्रासून ती भडकता, सप्टेंबरही सरला !
ऑक्टोबरात सुट्टी, नोव्हेंबरात भेटे, स्माईल ओठि दिसता, मित्रांस भेळ पार्टी !
तिचा वाढदिवस येता, ग्रीटिंग गिफ्ट देता, ओठात केक येता, संपून वर्ष गेले !
महिना जानेवारी, पडलो जरा आजारी, स्पर्शून ताप बघता, आजार मम बदलला !
मग व्हॅलेंटाइन डेला, मी भेटताच 'ती'ला, स्माइल तेच परंतु, "फ्रेंडशीप फक्त ठेवू" !
अंतर्मनी उदास, होऊनि देवदास, विसरूनिया अभ्यास, मी मार्च घालविला !
वाचीत दिवसरात्र, दवडी न मिनिटमात्र, पण पाहुन प्रश्नपत्र, एप्रिलभरून रडलो !
मे संपता संपता, नोटीसबोर्ड पाहता, डिस्टिंक्शनात 'ती' ये, मज दोन ए.टि.के.टी..........

ऑक्टोबरात सुट्टी, नोव्हेंबरात भेटे, स्माईल ओठि दिसता, मित्रांस भेळ पार्टी !

वा वा ! कै च्या कै म्हंजे कित्ती कै च्या कै

सरळ सिलॅबस छापायचं हो . मजा आली असती

हे एक कटू सत्य आहे!

मग व्हॅलेंटाइन डेला, मी भेटताच 'ती'ला, स्माइल तेच परंतु, "फ्रेंडशीप फक्त ठेवू" !
अंतर्मनी उदास, होऊनि देवदास, विसरूनिया अभ्यास, मी मार्च घालविला !.......

नीखील, माझ्या मित्रा....
खरच॑ छान. बोल्ड केलेली ओळ वाचुन मला एक जाहिरात आठवते, " लडकी हु, नादान नही".

नापासाला अजरामर केलस मित्रा.
त्याच्या या व्यथा आजवर कुणिच सांगितल्या नाही.

"वाचीत दिवसरात्र, दवडी न मिनिटमात्र, पण पाहुन प्रश्नपत्र, एप्रिलभरून रडलो !
मे संपता संपता, नोटीसबोर्ड पाहता, डिस्टिंक्शनात 'ती' ये, मज दोन ए.टि.के.टी.........."

सत्य, सत्य, सत्य.....!!!

कविता ..एकदम भन्नाट..

मग व्हॅलेंटाइन डेला, मी भेटताच 'ती'ला, स्माइल तेच परंतु, "फ्रेंडशीप फक्त ठेवू" !
यात 'ती'ला ऐवजी 'तिजला' टाकले तर छान होइल ---- just a suggestion ... राग मानु नका.

निखिल ,
मस्त लिहिलयस.
पण पहील वर्ष जरा सभ्यपणे काढुन दुसर्‍या वर्षात प्रयत्न केला असतास तर कदाचीत व्हेलेंटाईन डे ला प्रेमात डिस्टिंक्शन मिळालं असतं ........;)

वाचीत दिवसरात्र, दवडी न मिनिटमात्र, पण पाहुन प्रश्नपत्र, एप्रिलभरून रडलो !
मे संपता संपता, नोटीसबोर्ड पाहता, डिस्टिंक्शनात 'ती' ये, मज दोन ए.टि.के.टी..........

छान..................