माय मराठी

माय मराठीची करीन | जन्मभर सेवा |
वाटील हा मेवा | सकळांसी ||

मिरवीन जगी | ज्ञानोबांचा दिवा |
उधळीन ठेवा | चैतन्याचा ||

आळवीन मुखे | नामाचे अभंग |
होईन मी दंग | भीमातीरी ||

वाचीन मी सदा | तुकोबाची गाथा |
घेईन मी माथा | दासबोधा ||

चांगल्याच्या गळा | घालीन मी हार |
तलवारीची धार | वाईटाच्या ||

शिवबाचे माझ्या | गाईन पवाडे |
चारीन मी खडे | शत्रुलागी ||

जागेन मी सदा | संभाजीच्या धर्मा |
कोणाही अधर्मा | वाकनार नाही ||

संताजी धनाजी | व्हावे दोन्ही हात |
करीन निपात | दुर्जनांचा ||

वाहत ठेवीन | पानिपताचा घाव |
रक्ताचा भाव | करनार नाही ||

नेईन मी पुन्हा | गंगेकाठी अश्व |
उजळीन विश्व | मराठीचे ||

माय मराठीस | गाईन आवडी |
जेथवर नाडी | वाहे माझी ||

हरीश दांगट

वा, आम्हीही संगे आहोतच.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

छान स्मित

वा क्या बात है! हे सगळ्या मराठी जनांचं राष्ट्रगीतच झालं पाहीजे.

चारील मी खडे | शत्रुलागी ||

चारीन वगैरे शब्द ऐकिवात आहेत काय? की बोली भाषेत अभंग लिहीण्याचा मानस आहे ?

वा क्या बात है!
हे सगळे नव्या मराठीत असे लिहायचे:

वा क्या बात है! माशल्ला, जवाब नही! हे सगळ्या मराठी जनांचं national anthem only झालं पाहीजे.
स्मित

कल्पना एकदम चांगली आहे. थोडं शुद्धलेखन अन व्याकरण याकडे लक्ष दिलं तर अधिक परिणाम होईल.
मला खटकलेले काही

आळवीण मुखा | नामाचे अभंग | >> इथे आळवी मुखे अस हवंय.
होईल मी दंग | भिमातीरी || > होई मी दंग भीमातीरी

वाचीन मी सदा | तुकोबाची गाथा | >> वाचेन मी सदा
घेईल मी माथा | दासबोधा || >> घेईन मी माथा

शेवटच्या कडव्यात 'मी' असल्याने सगळ्या ओळींमध्ये क्रियापद
मिरवीन, करीन, घालीन , नेईन, असं हवंय.
कोणी दुसरा जर हे सगळं करणार असेल तरी सगळी क्रियापदं ( तो किंवा ती) करेल, वाचेल, ठेवेल, अशी झाली असती.

शोनू, सवीस्तर प्रतीसादाबद्दल मनापासून आभार.

लवकरच चुका दुरूस्त करीन.

-हरीश

उत्तम कविता

शोनुला मोदक. चारीन मला तरी खटकला नाही. इथे शब्दार्थापेक्षा भावार्थ लक्षात घेतला पाहीजे असं मला वाटतं. चु.भु. क्षमस्व.

मस्त!! स्मित

*****************
सुमेधा पुनकर स्मित
*****************

पल्ली,
चारीन हा सुधारीत शब्द आहे, आधी चारील असा लिहीला होता कवितेत.
महाराष्ट्रात काही भागामध्ये, जाईन खाईन च्या ऐवजी मी जाईल, मी खाईल असं म्हणतात...

छान आहे कविता. चारील / चारीन आणि इतर अशा शब्दांबाबत दक्षिणेला अनुमोदन. हे काही शब्द बोलीभाषेप्रमाणे बदलतात.

हरिश,
अजून एक दोन सुधारणा सुचवते... चालेल ना? स्मित

>>वाटील हा मेवा >> वाटीन....
>>वाचीन मी सदा >> वाचेन
>> वाकनार नाही >> वाकणार
>>करीन निपात >> नि:पात
>>रक्ताचा भाव करनार >> करणार

पवाडे हा वापरातला लेखी शब्द आहे की नाही माहीती नाही, पण मी पोवाडे हाच शब्द ऐकला आहे, पवाडे ही छान वाटतोय. स्मित

बाकी कवितेचा आशय अतिशय सुंदर..

हरिश,

कविता आवडली मित्रा.. स्मित
तुझ्या मनातला 'भाव' त्यातून कळला. खुप छान..!!
बाकी सुधारणा दक्षिणा ने सुचवल्या आहेतच..
~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

छान .... स्मित

आवडली. स्मित