आरुषी हत्याकांड : - हे असेही असू शकेल…

Submitted by मी मी on 28 November, 2013 - 05:00

आरुषी च्या केस मधून जे काही बाहेर पडतंय किंवा जगाला कळतंय ते तसेच व्हावे हीच तिच्या आई वडिलांची इच्छा होती… खरतर या सर्वांमागे खूप काहीतरी दडलंय जे बाहेर येऊ दिले जात नाहीये.

तलवार फार पोचलेला माणूस होता त्याला काहीही करता आले असते, हेमराज ला नेहेमीसाठी भारतातून हाकलवून लावता आले असते जर हे प्रेम प्रकरण असतं. पण फक्त प्रेम प्रकरण संपवण हे कारण यात नाही… यात मोठ मोठी लोक इनवोल्व आहेत आणि त्यांच्या प्रेशर खालीच हे प्रकरण गुपित ठेवायच्या हेतूने आरुषीचा जीव गेला असावा असा माझा अंदाज आहे.

तुमच्यापैकी कुणाला आठवतं का माहिती नाही पण हे हत्याकांड घडले त्या काळात काही गोष्टी पुढ्यात येत होत्या ज्या नंतर सोयीस्कर पणे दडवल्या गेल्या . जसे… ज्या रात्री आरुषी मारली गेली त्या रात्री तलवार दाम्पत्यांनी कुठल्याश्या थ्री स्टार हॉटेल मध्ये अनेक खोल्या बुक केल्या होत्या म्हणे ....

कुणासाठी, कशासाठी हे अजून गुपितच आहे.

तसेच आरुषी चा मृत्यू होण्यापूर्वी चार दिवस आरुषी च्या मोबाइल वरून दिल्ली च्या कमिशनर ला फोन गेला होता आणि त्यानंतर त्याच रात्री कृष्णा(त्यांच्या क्लिनिक मधला कम्पौनडर) च्या मोबाइल वरून त्याच नंबर वर फोन केला गेला … हि बातमी दोन दिवस दाखवली गेली होती आणि नंतर ती पूर्ण पणे झाकली गेली…. प्रश्न असा आहे कि आरुषी जवळ काहीतरी गुपित तर नव्हतं जे ओपन होणे परवडण्यासारखे नव्हते.

तेरा वर्षाच्या मुलीचे पन्नास वर्षाच्या माणसाशी संबंध जुळवून बघण्यापेक्षा दुसर्या बाजूने विचार केल्यास मनात असा प्रश्न येतो कि … हेमराज आरुषी सोबत काहीतरी चुकीच करत असतांना मारला गेला कि आरुषीला कोणी मारलंय हे त्याने डोळ्याने बघितले होते आणि म्हणून मुख्य विटनेसच संपवायचा हेतू होता …… हे आता कुणी सांगावे ??

का कुणास ठावूक पण आरुषी चुकीच काही करत होती अस वाटत नाही मनाला …. बिच्चारी जीवानेही गेली आणि काहीतरी मोठ्ठ गुपित लपवायला तिच्या चारित्र्यावरहि बोट उचलले जात आहे अस वाटतं…. हेमराज आरुषीला वाचवतांना मारला गेला किंवा आरुषी हेमराज ला वाचवण्याच्या प्रयत्नात मारली गेली अस होऊ शकतं दोघे जन मारले गेले म्हणजे त्यांचे काहीतरी अनैतिक संबंध असतील हा एकाच अर्थ निघू शकत नाही ….

यातून आणखी एक अर्थ असा निघतो कि जर असेल तर ते इतके भयंकर गुपित असेल कि जे लपवण्यासाठी तलवार दाम्पत्यांना पोटच्या पोरीच्या न आब्रू शी घेणे देणे आहे न जीवाशी ….यात इतर यंत्रणा सुद्धा कार्यरत असतील कदाचित काहीही झाले तरी गुपित बाहेर येऊ नये हा एवढाच एक मुद्दा महत्वाचा वाटतोय सर्वांना…हे असेही असू शकेल…नाही का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला प्रामाणिकपणे काहीतरी विचारायचे आहे. या प्रकरणाबद्दल मला खरोखरंच फारशी माहिती नाही. त्यामुळे हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे किंवा कसे हेही माहीत नाही. पण तरीही, या विषयावर आता इथे लिहिलेच जाऊ नये अशी अपेक्षा (काहीजणांकडून) का व्यक्त करण्यात येत आहे, हे मला खरंच जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणजे तसे काही खास सेन्सिटिव्ह कारण आहे की उगाचच तसे म्हंटले जात आहे? >>>>>>>+१

ज्याबाबत नक्की काही माहीत नाही, कळण्याची शक्यता नाही त्याची इथे चर्चा करायची गरज नेमकी काय? >> कुठल्याच केसबद्दल बाहेरच्यांना 'नक्की काही' माहित नसते.हा नियम लावायचा झाला तर कितीतरी न्युज चॅनेल्स बंद करावे लागतील.साईटस बंद कराव्या लागतील.चर्चा होतच राहते.
आता तहलकाचीही चर्चा चालू आहे. मागे निर्भया केस ची होती.

मायबोली हा एक सार्वजनिक प्लॅट्फॉर्म आहे.एखाद्या सदस्याने एखाद्या विषयावर धागा काढला आणि बाकीच्यांनी प्रतिसाद दिला तर त्यात एवढे काही आक्षेपार्ह नसावे.एखाद्याचे चारित्र्यहनन होऊ नये हे बरोबर आहे.गेलेल्या जीवाबद्दल भलते सलते आपल्याला काही माहित नसताना बोलू नये यात काही दुमतच नाही.कुणीही संवेदनशील/सूज्ञ व्यक्ती हे मान्यच करेल.

पण कुणी कशावर चर्चा करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मिडियात झालेली चर्चा वाचून, पाहून पुरेसे होत नाही का? असा प्रश्न विचारणे अप्रशस्त वाटते. एखाद्याला या केसबद्दल केस म्हणून चर्चा करायची असेल तर त्याने ती करू नये का ?

जर 'येथील चर्चांमुळे प्रत्यक्षात काहीतरी फरक पडेल / काही हाती लागेल' असा निकष ठेवला तर येथील ९९% हून अधिक चर्चा निरुपयोगी ठरतील असे मला वाटते.

Lol

सकाळी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं लिहीता का ?

आणि गप्पिष्ठ दोन्ही वेळा सहमत असतो का ? Lol
(अ)संतुलन

<जर 'येथील चर्चांमुळे प्रत्यक्षात काहीतरी फरक पडेल / काही हाती लागेल' असा निकष ठेवला तर येथील ९९% हून अधिक चर्चा निरुपयोगी ठरतील असे मला वाटते> या केसमध्ये घराच्या चार भिंतींत दोन माणसांचा खून झालाय. त्या मुलीच्या आईवडिलांनीच तिचा खून केला असा न्यायालयाचा निकाल आहे. हे पूर्णतः खाजगी प्रकरण आहे. त्यावरची चर्चा म्हणजे गॉसिपच्या पलीकडे काहीही असू शकेल का? माध्यमांतही हाच मुद्दा चर्चेला आहे.

<चर्चांमुळे प्रत्यक्षात काहीतरी फरक पडेल / काही हाती लागेल' > माझे शब्द किंवा त्यांचा अर्थ हे नक्कीच नव्हते. सार्वजनिक हिताच्या चर्चांमधून हाती काहीच लागत नाही असे कोणाला वाटले तरी त्या चर्चा गरजेच्याच असतात.

.

म्हणजे अ‍ॅक्च्युअली मला असे म्हणायचे होते की कसाब, अफजल यांच्याप्रमाणे हा एखादा सेन्सिटिव्ह विषय आहे की कसे! (माहीत नसल्यामुळे विचारले).

हे पूर्णतः खाजगी प्रकरण आहे. त्यावरची चर्चा म्हणजे गॉसिपच्या पलीकडे काहीही असू शकेल का?<<<

घराच्या चार भिंतीत दोन माणसांचा खून झाला असून तो आईवडिलांनी केला आहे असे न्यायालयाने जाहीर केलेले आहे, हे खासगी प्रकरण कसे काय आहे मयेकर?

पुन्हा एकदा - येथील कित्येक चर्चा अश्या प्रकरणांवर होतात असे अजुनही मला वाटते.

घराच्या चार भिंतीत दोन माणसांचा खून झाला असून तो आईवडिलांनी केला आहे असे न्यायालयाने जाहीर केलेले आहे, हे खासगी प्रकरण कसे काय आहे मयेकर? >>> Biggrin

मयेकर, अजिबात पटले नाही. मृत अल्पवयीन मुलीच्या चारित्र्याबद्दल नक्की माहिती नसताना (निकालामधे वगैरे समावेश नसताना) गॉसिपिंग करू नये इतपत ठिक आहे, पण घरात खून झाला म्हणून खाजगी प्रकरण आहे वगैरे अजिबात पटले नाही. शिवय ती केस काही देशासाठी अतिगुप्त अथवा सुरक्षिततेला धोका वगैरे आहे असं पण नाही.

न्यायालयात असलेल्या कुठल्याही केसबद्दल न्यायालयाचा अवमान न करता चर्चा करणे यात काय चूक?

केवळ दोन लोकाम्चा खुन, या व्यतिरिक्त इतर वर चर्चिलेले मुद्दे न्यायालयापुढे मांडले गेले होते का? या बद्दल काही माहीती आहे का? कारण हे मुद्दे रिलेव्हंट आहेत की नाही तेही महत्त्वाचेच.

म्हणजे अ‍ॅक्च्युअली मला असे म्हणायचे होते की कसाब, अफजल यांच्याप्रमाणे हा एखादा सेन्सिटिव्ह विषय आहे की कसे! (माहीत नसल्यामुळे विचारले).

हे पूर्णतः खाजगी प्रकरण आहे. त्यावरची चर्चा म्हणजे गॉसिपच्या पलीकडे काहीही असू शकेल का?<<<

घराच्या चार भिंतीत दोन माणसांचा खून झाला असून तो आईवडिलांनी केला आहे असे न्यायालयाने जाहीर केलेले आहे, हे खासगी प्रकरण कसे काय आहे मयेकर?

पुन्हा एकदा - येथील कित्येक चर्चा अश्या प्रकरणांवर होतात असे अजुनही मला वाटते. >>>>

कुणाला तरी दाखवून घ्या स्वतःला. किती कोलांट उड्या मारायच्या. ते ही एकाच धाग्यावर. ते ही कमी काळात.

चल रे गप्पिष्ठ. आज वारजे नाक्यावर बसू. उगाच लोकांना वाटायचं आपण वेगवेगळे आहोत Lol

गेल्या पाच वर्षांपासून ज्या केस ने अक्ख्या देशात सनसनी पसरवून ठेवली आहे ती केस अति गोपनीय किंवा खाजगी आहे असे म्हणूनच कसे शकता तुम्ही ?

दुसरे वर धाग्यात कुठेही कुणाचे चरित्र हनन केलेले नाहीये उलट चारित्र्यावर जे बोट उचलले जातेय ते कसे पचनेबल नाहीये ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

तिसरा आणि महत्वाच मिडिया मध्ये काहीही सांगितले असले तरी माझ्या मनात निर्माण होणार्या प्रश्नांची उत्तर मागायला मी मिडिया कडे जाऊ शकत नाही ना …. मग त्या प्रश्नांची उत्तर मी अश्याच चर्चे मधून शोधू इच्छिते… मी अस करू नये असे सांगण्याचे काहीच कारण नाही…

संपूर्ण देशासाठी जी केस एक फार मोठा प्रश्न चिन्ह बनून बसली आहे आणि ज्यातले अनेक कंगोरे अजून अनुत्तरीत आहे त्यावर चर्चा केल्याने ती केस सोल्व होणार नसली तरी मनातल्या शंकाचे निरसन होणार असेल तर चर्चा करण्यास काय हरकत आहे ??

मिडिया मध्ये वर्षानु वर्ष २४ तास गाजलेल्या प्रकरणांना खाजगी अस बोलणच विनोदी नाहीये का ?

उद्या म्हणाल आसाराम बाप्पुंनी केलेले कृत्य खाजगी आहे तो त्यांचा प्रश्न आहे …. निर्भय वर झालेला बलात्कार एका बस च्या आत झालाय ती आठ मंडळी बघून घेतील काय ते आपण बोलूच नये ….

आपण तिथे उपस्थित नव्हतो म्हणून त्या प्रकरणांनी आपल्या आयुष्यावर परिणाम केलेला नाहीये का ? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा एकदा …. आणि परिणाम केला असेल तर त्याची उत्तर आपल्याला घरात गप्प बसून मिळणार आहे काय ?

आसाराम आणि नारायण सारख्या पाखंडी लोकांपासून दूर राहण्याचा संदेश तुम्ही तुमच्या मुलांना विना चर्चा करता कसे द्याल.

निर्भया वर झालेला अत्याचार बस च्या चार भिंतींच्या आतला मानला आणि त्यांचा खाजगी प्रश्न म्हणून सोडून दिला तर तुमच्या मुलीला अश्या गोष्टींपासून सेफ ठेवण्याचे धडे देता येईल काय तुम्हाला? उगाचच विरोध करायचा म्हणून विरोध करण्यात काहीही अर्थ आहे काय…. या अश्याच विरोध करण्याने धाग्यांवर वाद निर्माण होतो आणि नंतर चांगलि चर्चा झालेए माहितीपूर्ण धागे सुद्धा गहाळ केले जातात …. त्यात नुकसान कुणाचे होते ? आपलेच ,,, लक्षात असू द्या

मागल्या वेळी आसाराम वरून काढलेला धागा ज्यात अतिशय सुंदर चर्चा होती कितीतरी चांगली माहिती होती पण नाहक वादावादी मुळे तो धागा उडवला गेला … मला अजूनही त्यासाठी खंत आहे.

निर्भया केस मधे भारतीय स्त्रियांची सुरक्षितता, पुरुषी मानसिकता, राजकारणी गटाची या सगळ्या इश्यूजबद्दलची उदासीनता आणि संबंधित मुद्दे होते
आसाराम केस मधे भोंदू बुवा, बुवाबाजी, आंधळे भक्तगण, या सगळ्यात असलेली शारिरीक आर्थिक एक्स्प्लॉयटेशन रॅकेट्स असे मुद्दे होते.
हे सर्व मुद्दे आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेले इश्यूज आहेत. ही सामाजिक संकटं आहेत

तलवार केस मधे चारभिंतींच्या आत नक्की काय झालं कळणं अशक्य आहे. अनैतिक संबंध, बदफैलीपणा, पार्टनर स्वॅपिंग, बेकायदेशीर्/वैद्यकीय गुन्हेगारीची रॅकेट्स, दारूपार्ट्या असे अनेक आरोप्/तर्ककुतर्क झालेत. पण त्यातली कुठलीही गोष्ट शाबित करण्याएवढा पुरावा समोर आला नाहीये. जर नक्की काय झालं होतं हेच माहित नाहीये तर त्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी इतका निकटचा संबंध कसा लावणार? किंवा एखादं सामाजिक संकट आहे का हे?

मी आणि मयेकरांनी आम्हाला काय वाटतं ते लिहिलं. तुम्हाला चर्चा करायचीये तर करा (त्यात नक्की कसं काय शंका निरसन होणार आहे मला कळत नाहीये), पण उगाच निर्भया आणि आसाराम केसेसशी याची तुलना करू नका.

असो. हेमाशेपो.

ज्यांना आरुषी हत्याकांडाविषयी डिटेल माहिती (?) हवी असेल त्यांच्यासाठी ही लिंक , ह्यात घटनाक्रम , घराचा नकाशा वगैरे गोष्टी दिलेल्या आहेत. http://en.wikipedia.org/wiki/Noida_double_murder_case

वाचकहो,

एक गोष्ट जाणवली म्हणजे खून झाल्यावर पोलीस आले तेव्हा त्यांनी सदनिकेस सील केले नाही. अपराधस्थळी (क्राईम सीन) नातेवाईक व बघे खुलेआम येजा करीत होते. हे विचित्र वाटते. पोलिसांनी असे का केले ते कळंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

वरदा … यात काहीच नाहीये काय असं.. अर्थात आहे. आणि नसेल तरीही चर्चा करण्यात काय गैर आहे.... असो

वाद नको आपण चर्चा करूया ... झालंच तर शन्केचं निरसनच होइल ..

मला व्यक्तिशः नाही वाटत तिच्या आई वडिलांनी तिचा खून केला असेल.

आत्ता ज्या कोर्टात केस चा निकाल लागला, त्याचे जज थोड्या दिवसात रिटायर होणार होते. नवीन जज म्हणजे परत सगळी प्रोसेस त्यामुळे त्यांनी असलेल्या सगळ्या पुराव्यांवरून आई वडिलांना दोषी जाहिर केले.

ते गुन्हेगार ठरले तर ते वरच्या कोर्टात जाणार आणि निर्दोष सुटले तर सीबीआय वरच्या कोर्टात जाणार हे जवळ जवळ ठरलेच होते त्यामुळे हा निकाल ही फक्त खालच्या कोर्टात अजून जास्त वेळ जाऊ नये म्हणुन केले
ली औपचारिकता होती.

"१०० गुन्हेगार सुटले तरी चालेल पण १ निरपराध अडकू नये" हे भारतीय न्याय घटनेचे लॉजिक लक्षात घेतले तर
पुरावे नक्कीच तितके ठोस नाहीत की कोणाला एकाला शिक्षा देता येईल. आणि तपासातला सुरूवातीपासून चा ढिसाळ पणा लक्षात घेतला तर अजून नवीन काही ठोस पुरावे मिळतील असेही वाटत नाही.

माझा असा अंदाज आहे की सर्वोच्च न्यायालय त्यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करेल.

खरे खूनी कोण ही गोष्ट कायमच गुलदस्त्यात राहील, ते नक्की माहीत असणारे लोक दोघेही आता या जगात नाहीत.

निनुकू .... पुरावे नाही ? भरपूर पुरावे आहेत आणि ते सर्व यांच्याच विरोधी आहेत ... पाच वर्ष झालेत केस फिरतेय ह्याला तुम्ही घाईने दिलेला निर्णय म्हणताय ?.... कमाल आहे

Pages