आरुषी हत्याकांड : - हे असेही असू शकेल…

Submitted by मी मी on 28 November, 2013 - 05:00

आरुषी च्या केस मधून जे काही बाहेर पडतंय किंवा जगाला कळतंय ते तसेच व्हावे हीच तिच्या आई वडिलांची इच्छा होती… खरतर या सर्वांमागे खूप काहीतरी दडलंय जे बाहेर येऊ दिले जात नाहीये.

तलवार फार पोचलेला माणूस होता त्याला काहीही करता आले असते, हेमराज ला नेहेमीसाठी भारतातून हाकलवून लावता आले असते जर हे प्रेम प्रकरण असतं. पण फक्त प्रेम प्रकरण संपवण हे कारण यात नाही… यात मोठ मोठी लोक इनवोल्व आहेत आणि त्यांच्या प्रेशर खालीच हे प्रकरण गुपित ठेवायच्या हेतूने आरुषीचा जीव गेला असावा असा माझा अंदाज आहे.

तुमच्यापैकी कुणाला आठवतं का माहिती नाही पण हे हत्याकांड घडले त्या काळात काही गोष्टी पुढ्यात येत होत्या ज्या नंतर सोयीस्कर पणे दडवल्या गेल्या . जसे… ज्या रात्री आरुषी मारली गेली त्या रात्री तलवार दाम्पत्यांनी कुठल्याश्या थ्री स्टार हॉटेल मध्ये अनेक खोल्या बुक केल्या होत्या म्हणे ....

कुणासाठी, कशासाठी हे अजून गुपितच आहे.

तसेच आरुषी चा मृत्यू होण्यापूर्वी चार दिवस आरुषी च्या मोबाइल वरून दिल्ली च्या कमिशनर ला फोन गेला होता आणि त्यानंतर त्याच रात्री कृष्णा(त्यांच्या क्लिनिक मधला कम्पौनडर) च्या मोबाइल वरून त्याच नंबर वर फोन केला गेला … हि बातमी दोन दिवस दाखवली गेली होती आणि नंतर ती पूर्ण पणे झाकली गेली…. प्रश्न असा आहे कि आरुषी जवळ काहीतरी गुपित तर नव्हतं जे ओपन होणे परवडण्यासारखे नव्हते.

तेरा वर्षाच्या मुलीचे पन्नास वर्षाच्या माणसाशी संबंध जुळवून बघण्यापेक्षा दुसर्या बाजूने विचार केल्यास मनात असा प्रश्न येतो कि … हेमराज आरुषी सोबत काहीतरी चुकीच करत असतांना मारला गेला कि आरुषीला कोणी मारलंय हे त्याने डोळ्याने बघितले होते आणि म्हणून मुख्य विटनेसच संपवायचा हेतू होता …… हे आता कुणी सांगावे ??

का कुणास ठावूक पण आरुषी चुकीच काही करत होती अस वाटत नाही मनाला …. बिच्चारी जीवानेही गेली आणि काहीतरी मोठ्ठ गुपित लपवायला तिच्या चारित्र्यावरहि बोट उचलले जात आहे अस वाटतं…. हेमराज आरुषीला वाचवतांना मारला गेला किंवा आरुषी हेमराज ला वाचवण्याच्या प्रयत्नात मारली गेली अस होऊ शकतं दोघे जन मारले गेले म्हणजे त्यांचे काहीतरी अनैतिक संबंध असतील हा एकाच अर्थ निघू शकत नाही ….

यातून आणखी एक अर्थ असा निघतो कि जर असेल तर ते इतके भयंकर गुपित असेल कि जे लपवण्यासाठी तलवार दाम्पत्यांना पोटच्या पोरीच्या न आब्रू शी घेणे देणे आहे न जीवाशी ….यात इतर यंत्रणा सुद्धा कार्यरत असतील कदाचित काहीही झाले तरी गुपित बाहेर येऊ नये हा एवढाच एक मुद्दा महत्वाचा वाटतोय सर्वांना…हे असेही असू शकेल…नाही का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयी, अशी अनेक प्रकरणे दडपली जातात. भारतातच नव्हे तर जगभरात. त्यातले सत्य कधीच बाहेर येत नाही.
एक जीव मात्र हकनाक जातो.

खरच आहे...केवळ एवढया लहान मुलीच "सो कॉल्ड" प्रेम प्रकरण आहे म्हणून कोणी जीव घेणार नाही...ते प्रेम प्रकरण कसही मोडीत काढता आल असत..नक्कीच तलवारची काही तरी फार मोठी भानगड आरुषीला कळली असेल..त्याची ती नालायक बायको अजुनही त्याला साथ देतीये आणि!

मयी पुर्णपणे सहमत आहे, खरतर सावधान इन्डीया, क्राइम पेट्रोल इ. मालिका ज्या सत्य घटनांवर आधरीत आहेत, त्या बघून खरतर असच वाटतय की काहीतरी मोठा घोळ लपवण्यासाठी तिचा बळी गेलाय ;(

मलाहि तेच वाट्त कि १३ वर्षाच्या मुलीचे प्रेम प्रकरण असेल हि पण ते नोकरा सोबत.... नक्किच नाहि पट्त.
काहितरि गौड्बंगाल आहे, जे लपवल जात आहे.

मयी एकदम सहमत आहे.
आणि मागे त्या अनिता दुर्रानी चे ही नाव येत होते.ते नंतर बंदच झाले.
आधी सीबीआय ने क्लोजर रिपोर्ट काय दिला, मग केस परत ओपन काय झाली.
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट ही बदलला गेला.आईवडिल तिची खोली लॉक काय करून झोपत होते.त्यांच्या घरालाही बाहेरून लॉक होते (हे कशासाठी ?) .सकाळी भारती(मेड) आली तेंव्हा किल्ल्या वरून तिच्याकडे फेकल्या व तिने दार उघडले.मग नुपूरने भारतीला आरुषीच्या खोलीत नेले व म्हणाली 'ये देख हेमराज ने क्या किया?' . म्हणजे हेमराज ला बळीचा बकरा बनवायचे आधीच प्लॅन्ड होते. पुन्हा गच्चीच्या किल्ल्या पोलिसांना दिल्या नाहीत तलवार नी. दुसर्या दिवशी जेंव्हा तलवार अस्थि विसर्जनाला हरिद्वार की कुठे गेले होते तेंव्हा पोलिसांनी गच्चीचे कुलूप तोडले तर हेमराज चे प्रेत सापडले.मग तलवार ना बोलवून घेतले.

जरी आरुषीचे प्रेम प्रकरण आहे असे गृहित धरले तरी तिचा जीव घेण्याएवढी ही चूक नव्हती.तिला चूक सुधारण्याची संधी मिळायला हवी होती. जरी प्रकरण असले तरी घरी काही प्रकार करू नयेत एवढेही त्या हुषार मुलीला कळले नसेल? आणि करायचेच असते तर बाहेर मुले नव्हती काय? ४५+ नेपाळी नोकराबरोबर कशाला ती प्रेम प्रकरण करेल? हेच जर मुलगा असता आणि त्याने मोलकरणीबरोबर हा प्रकार केला असता तर त्यालाही हाच न्याय लावला असता का ? ही थेअरी खूप वरवरची वाटत्येय.निव्वळ ते दोघेही एकाचवेळी मारले गेले या सुतावरून त्यांचे कथित प्रेमप्रकरण रचले गेलेय की काय असे वाटते. अत्यंत फिशी प्रकरण आहे हे.

खरे काही वेगळेच असेल असे वाटते.ते आई वडिल कधी धाय मोकलून रडताना दिसले नाहीत.नुपूर तर कायम तणावग्रस्त दिसत होती.ती मराठी आहे हे चॅनेलवाल्यांनी तिच्या आई वडिलांच्या (भालचंद्र चिटणीस) मुलाखती दाखविल्यावर कळले आणि अजूनच आश्चर्य वाटले.

काल माझ्या नवर्‍यासोबत या प्रकरणाबाबत चर्चा करत असता तो मला म्हणाला की तलवार दांपत्याला अस पण कळल होत म्हणे की आरुषीचे अनेक जणांबरोबर अनैतिक संबंध होते. या प्रकरणाबद्दल मला तरी ही गोष्ट कधीच ऐकल्याच आठवत नाहिये.

मुग्धा.रानडे ,
तुम्ही जे लिहिलंय तसे कधीच ऐकले नाही.
तिचा आगरवाल नावाचा कुणीतरी शाळेतला बॉयफ्रेंड होता असे मागे ऐकले होते.नंतर त्याचेही नाव बंद झाले.

पूर्ण केस निकालानंतरही संशयाच्या भोवर्‍यातच आहे. पण या निमित्ताने भारतीय मिडीया जर्नलिझम ने काय नियम पाळले पाहीजेत यावर बर्‍याच वॄत्तवाहीन्यांवर भली मोठी चर्चा सुरू होती.

मुलीच्या चारित्र्या बद्दल उगीच शंका घेणे बरोबर नाही. ती डिफेंड करू शकत नाही. आणि ती कायद्याने मायनर होती. गेल्या जिवाबद्दल थोडी सेन्सिटिव्हीटी दाखवायला काहीच हरकत नाही.

स्पष्ट बोलतो, पण तुम्ही तुमच्या माजघरात काय बोलता ते इथे येऊन लिहिण्याची गरज नाहीये. 'असं ऐकलं म्हणे आणि तसं ऐकलं म्हणे' च्या नादात कोणाच्यातारी चारित्र्यावर आपण शिंतोडे उडवत आहोत, याचे भान असू द्या.

हे प्रकरण साधे सरळ नाही, गुंतागुंतीचे आहे अगदी पहिल्यापासूनच. अनेक गोष्टी अशाही आहेत ज्या तलवार दांपत्याला निर्दोष असल्याचे दाखवतात. अनेक गोष्टी अशाही आहेत ज्यात पोलिसांची आणि सीबीआयची भूमिका संशयास्पद वाटते. कृपया न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरू नका कोणीही.

अनेक गोष्टी अशाही आहेत ज्या तलवार दांपत्याला निर्दोष असल्याचे दाखवतात.
>>
<<
कृपया न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरू नका कोणीही.

Happy

या केससंदर्भात ज्या गोष्टी माझ्या कानावर आल्या त्या मी इथे लिहिल्या. त्याच वेळी मी असही म्हणाले आहे की या बद्दल माझ्या वाचण्यात अथवा ऐकण्यात कुठेही आलेले नाहि, माझ्याही मनात आरुषीबद्दल सॉफ्ट कॉर्नरच आहे. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा कोणताही हेतु नाही हे कृपया लक्षात घ्यावे.

स्पष्ट बोलतो, पण तुम्ही तुमच्या माजघरात काय बोलता ते इथे येऊन लिहिण्याची गरज नाहीये. 'असं ऐकलं म्हणे आणि तसं ऐकलं म्हणे' च्या नादात कोणाच्यातारी चारित्र्यावर आपण शिंतोडे उडवत आहोत, याचे भान असू द्या.

हे प्रकरण साधे सरळ नाही, गुंतागुंतीचे आहे अगदी पहिल्यापासूनच. अनेक गोष्टी अशाही आहेत ज्या तलवार दांपत्याला निर्दोष असल्याचे दाखवतात. अनेक गोष्टी अशाही आहेत ज्यात पोलिसांची आणि सीबीआयची भूमिका संशयास्पद वाटते. कृपया न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरू नका कोणीही.

<<< ज्ञानेश +१.

अख्ख्या भारतात ५ वर्षे या ना त्या कारणाने ही केस चर्चेत राहिली.
निकालाच्या दिवशी तर काही चॅनेल्स वर दिवसभर हीच केस दाखवत होते.कोर्टाने जे हत्येचे कारण दिले ते आरुषीच्या चारित्र्यासंबंधात आहे.
कित्येक साईट्सवरही बरीच माहिती आहे. ईथे जी काही चर्चा चाललीये ती फक्त त्या केससंदर्भात.
मुद्दाम कुणाचे चारित्र्यहनन करायचा माझा उद्देश अजिबात नाही. उलट गेलेल्या जीवांबद्दल पूर्ण सहानुभुती आहे.

अर्थात नक्की काय झाले ते कदाचित कधीच बाहेर येणार नाही.

एक पथ्य सगळ्यांनीच निर्विवादपणे पाळायला हवे ते असे की न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी.

Happy

अख्ख्या भारतात ५ वर्षे या ना त्या कारणाने ही केस चर्चेत राहिली.
निकालाच्या दिवशी तर काही चॅनेल्स वर दिवसभर हीच केस दाखवत होते.कोर्टाने जे हत्येचे कारण दिले ते आरुषीच्या चारित्र्यासंबंधात आहे.
कित्येक साईट्सवरही बरीच माहिती आहे. ईथे जी काही चर्चा चाललीये ती फक्त त्या केससंदर्भात.
मुद्दाम कुणाचे चारित्र्यहनन करायचा माझा उद्देश अजिबात नाही. उलट गेलेल्या जीवांबद्दल पूर्ण सहानुभुती आहे.>>>> अनुमोदन..

ज्याबाबत नक्की काही माहीत नाही, कळण्याची शक्यता नाही त्याची इथे चर्चा करायची गरज नेमकी काय? मिडियात झालेली चर्चा वाचून, पाहून पुरेसे होत नाही का?

मला प्रामाणिकपणे काहीतरी विचारायचे आहे. या प्रकरणाबद्दल मला खरोखरंच फारशी माहिती नाही. त्यामुळे हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे किंवा कसे हेही माहीत नाही. पण तरीही, या विषयावर आता इथे लिहिलेच जाऊ नये अशी अपेक्षा (काहीजणांकडून) का व्यक्त करण्यात येत आहे, हे मला खरंच जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणजे तसे काही खास सेन्सिटिव्ह कारण आहे की उगाचच तसे म्हंटले जात आहे?

जर 'येथील चर्चांमुळे प्रत्यक्षात काहीतरी फरक पडेल / काही हाती लागेल' असा निकष ठेवला तर येथील ९९% हून अधिक चर्चा निरुपयोगी ठरतील असे मला वाटते.

चु भु द्या घ्या

अगदी बरोबर आहे बेफी. हाच न्याय लावायचा तर मायबोलीवरील निम्म्याहून अधिक धागे irrelevant ठरतात. तिथे असे कुणी बोलल्याचे दिसले नाही. तिथे मात्र हिरीरीने वितंडवाद, आणि इथे चर्चा बंद व्हावी म्हणून दमदाटी.

Happy

Pages