तुम्ही पुन्हा या
तो पर्यंत नवीन फसल तयार असेल आमची
तुम्हाला त्रास कमी व्हावा म्हणुन
त्यांना नसतील
कणे पाठिचे
पिंजरे छातीचे
लहानपणीच जिभांची (ही) सुंता करू त्यांच्या
म्हणजे बोलणार नाहीत ते
फक्त हंबरतील ते
हलाल करताना
वेदना कमी होतात म्हणे
तसेही शाळातून घोकवून घेणार आहोत
'अहम मेंढी अस्मी' तत्व
बाकी फिकीर मत...
तुम्ही परत परत या
तुम्हाला रक्तपिपासू व्रेथ
म्हणणार्यांना आम्ही
पाठवणार आहोत
मानवाधिकार समितिकडे
अरुंधती चेटकीणीकडे
दरवर्षी गणपती बसवतो
बुडवतोही आम्ही
वाजत गाजत
तुम्हालाहि आणू
cnn ndtv वैगेरेवर आरती करू
आमच्या मेढ्यांचा नेवैद्य दाउ
मग यथासांग पुजा बांधुन
बुडवुन टाकू...
हाय काय नाही काय
पण यायच हा तुम्ही
पुन्हा पुन्हा यायच
दिवाळिला
रमजान्ला
नानक जंयंतीला
बसंतीला
(रक्ताची होळी
खेळायला!)
पुन्हा या पुन्हा पुन्हा या
तुमचा हात निकामी होइल....
पण आमच्या माना संपणार नाहीत
ही गऍरेंटी...
फिकिर मत!
--------------------------------------------------------
निमंत्रण
Submitted by पेशवा on 29 November, 2008 - 01:49
गुलमोहर:
शेअर करा
एकदमच फिकर
एकदमच फिकर नॉट...
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
फर्स्ट
फर्स्ट क्लास!!!!! खरंच फिकीर मत!!!!!
*****************
सुमेधा पुनकर
*****************
या
या विषयावरची वाचलेली ही सर्वाधिक छान कविता. आवडली.
खुप
खुप टोकदार.. खरंच तुमचा हात निकामी होइल. पण आमच्या माना संपणार नाहीत.....