ये तो होना ही था!

Submitted by मेधा on 25 November, 2008 - 09:28

माझ्याच नशिबी का
असली कविता स्फुरणे होते ?

जन्म ज्याला भिऊन काढला
अटळ ते मरणे होते

किती त्याला सांगू पाहिले
अखेर मुक्याने झुरणे होते

व्यासंग म्हणती सारे ज्याला
अखंड पुस्तके चरणे होते

अटी तटीच्या डावात
जिंकूनही ही हरणे होते

नको नको म्हणता म्हणता
इथे असे लिहिणे होते Proud

का.शा.चा बैल गेला
तेव्हा झोपा करणे होते!!

आता लिहू जावे तर
का.च्या का. ठरणे होते!

काव्याचे सडे वेचून
पाकळ्या कुस्करणे होते

गुलमोहर म्हणजे मॉड्सना
केवळ 'एक निस्तरणे' होते

Proud

शोनू, यु टु ? Happy 'मॉस्कर' साठी नॉमिनेशन पाठव लवकर..

बाकी हरणे आणि चरणे आवडल
उंदीर आणि सिंहाला विसरलीस का ? Happy

स्वाती. Rofl

गुलमोहरवर काव्याचे सडे कुठे दिसले बाई तुला ?

Lol शोनू तुला पण मोह आवरला नाही ना शेवटी.. ??

स्वाती.. Proud

स्वातीच्या काव्यातलं 'काव्याचे सडे वेचून 'ऐवजी 'काव्याचे उकीरडे फुंकून' म्हणावं लागेल मग. Wink

शोनू.. Happy

--
भेटण्याआधीच ठरलेली असते वेळ जेव्हा जायची-
शहाण्या मुलासारखी खेळणी आवरून घ्यायची..!!

Proud
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...:)

चांगली होती की ही...गणेशोत्सवात गोष्टी लिहिल्या, दिवाळी अंकाचं संपादन केलं...आणि आता कशानं असं झालं हिचं Wink

ही मिल्याची पार्ले बीबीवर टाकलेली , वाहून जाउ नये म्हणून

सर्वांनाच

इथे सगळे सुटले आहेत तर मग मी पण मी पण...

तू म्हणालीस ते 'खरे' होते
वाटले का मला 'भुरे' होते?

नाव त्यांचे म्हणे स.दा. भोळे
शब्द चाबूक बोचरे होते

केवढे मोल दोन केसांचे
भाव देशातले बरे होते

सांग रस्त्यातुनी कसा जाऊ
श्वान वाटेत चावरे होते

हीच शोकांतिका खरी माझी
पूर्ण कंगाल सासरे होते

हे मराठीत बोलला भैय्या
"भेटले राज ठाकरे होते"

>>> व्यासंग म्हणती सारे ज्याला
अखंड पुस्तके चरणे होते
Happy (पालकनीतीचा दिवाळी अंक वाचलात का?)
केवढे मोल ... Lol
शोकांतिका... Lol मिल्या, आता आठवडाभर जेवण बाहेरचे ना ? Happy

    ***
    अर्धा रिकामा की अर्धा भरलेला
    वाद कशाला घालायचा ?!
    पूर्ण भरलेला मागवायचा.

    शोनु काव्याळली आहे आणि मिल्या गझला आहे Happy Lol

    शोनू खूप सारे धन्यवाद ही हजल इकडे टाकल्याबद्दल..

    मी ही माझ्या रंगिबेरंगी वरच टाकतो! कसे?

      ================
      जरी आंधळा तरी जगाची
      नेत्रपल्लवी कळू लागली