Submitted by सिद्धा on 25 November, 2008 - 00:44
आमच्या व्हरांड्याला लागून असलेल्या छोट्याश्या जागेचा असा मेकओव्हर केला. इथे पूर्वी लॉन होतं, जे उन्हाळ्यात अक्षरशः पाणी पितं. पाण्याची बचत व्हावी म्हणून हा बदल केला. आम्हीच सर्व काम केल्याने लँड्स्केपर ने सांगितलेल्या किंमतीपेक्षा खर्च खूपच कमी आला.
मेकओव्हरच्या आधी
आणि नंतर.

गुलमोहर:
शेअर करा
मॉड्स, मला
मॉड्स, मला हे खरे तर Do It Yourselves (DIY) असा थ्रेड उघडून टाकायचे होते, पण नवीन थ्रेड कुठे उघडावा हे लक्षात आले नाही. प्लीज योग्य तिथे हलवणार का?
मस्तच... ~~~~~~~~~~
मस्तच...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
सहीये! ..
सहीये!
.. ट्रॅव्हल अँड लिव्हिंग चॅनलावरच्या कार्यक्रमासारखं शूटिंग केलंत की नाही? 
बाकी, गोट्यांवर मध्ये काय घातलंत? फरश्या आहेत का वेगळं काही?
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
कसं आणि
कसं आणि काय काय केलत तेही लिहा ना
मस्त आहे
मस्त आहे मेकोव्हर... कॉन्ट्रॅक्टने काम घेणार का ?
छाने!
छाने!
सुंदर!! ते
सुंदर!! ते गोटे होम डीपोतून आणलेत का? कारच्या ट्रंक मधे टाकून?? २ पोत्यात कार खाली बसते.
भाग्य, सही
भाग्य,
सही केलयस अंगण. बरीच मेहनत घेतली असणार.
२ पोत्यात कार खाली बसते. >>> मृ स्वानुभव का?
प्राची,
प्राची, चिनू, धन्स!
फ, शूटिंग नाही रे केलं! फोटो घेतलेत मधून मधून. कारण अंतिम परिणाम कसा होईल ते माहित नव्हतं ना. आणि हो, गोट्यांवर फरशाच आहेत.
आयटी, नंतर डीटेल्स मध्ये लिहायचे आहेच. पण थोडक्यात सांगायचे तरः
१. लायब्ररीतून लँडस्केपिंग्/गार्डेनींग ची पुस्तके आणली आणि आपल्या जागेत साधारण काय करता येईल ते ठरवले. इथे (ऑस्ट्रेलियात) जेमी डरी च्या होम गार्डन शो मधून काही कल्पना मिळाल्या. मधोमध फरश्यांचा साधारण ३ मी * ३ मी चा चौकोन (बार्बेक्यू ठेवायला, सतरंज्या टाकून बसायला किंवा टेबलखुर्च्या ठेवायला), चारही बाजूला गोटे आणि व्हरांड्याच्या अपोझिट एल शेप चे वाफे असे ढोबळ डिझाईन ठरवले. त्याप्रमाणे फरश्या किती लागतील (३००*३०० मीमी च्या) त्या मोजल्या आणि आणल्या, गोटे आणि वाळू लागेल तशी आणत गेलो कारण किती लागेल याचा अंदाज नव्हता.
२. आंगण बॉबकॅट ने लेव्हल करून घेतले.
३. मधोमध ३.५*३.५ मी च्या चौकोनात ब्ल्यू डस्ट पसरवली (३० मीमी) , फरश्यांना बेस म्हणून. पण रोड बेस पण टाकतात, रोड बेस टाकून केलेल पेव्हिंग २० वर्षे टिकते असे म्हणतात. ब्ल्यु डस्ट वर पेव्हिंग ची खास वाळू मिळते, ती २० मी मी थीक अशी पसरवली. त्यावर फरशा ठेवल्या आणि चारही बाजूने ट्रीटेड पाईन ची फळकुटे (फरश्यांच्या चौकोनाची लांबी-रुंदी मो़जून कापून आणली) आणि जरा खोल खणुन बसवली.
हे सर्व करताना स्पिरिट लेव्हल वापरली, कारण सगळीकडे even thickness हवा असतो नाहीतर फरश्या वेड्यावाकड्या लागतात.
पेव्हिंग कसे करावे ह्याच्यावर पुस्तके पण मिळतात आणि जिथे हे सामान मिळते, तिथले लोक पण अगदी व्यवस्थित सांगतात.
४. बसवलेल्या फरश्यांच्या फटींमधे अगदी बारीक अशी गॅप सीलंट नावाची वाळु मिळते, ती कोरडीच टाकली आणि त्यावर हलकेच पाणी स्प्रे केले. १२ तासांनी ती अगदी घट्ट झाली.
५. चारी बाजूला वीड्स येउ नये म्हणुन एक खास प्लास्टी़क मिळते, ते खाली पसरवले आणि त्यावर गोटे टाकले.
५. वाफे बनवून त्यात झाडे लावली.
आणि भारतात असशील, तर स्वतः करायची गरज नाही.
चित्रेसाहेब, कॉन्ट्रॅक्टने काम घेऊ की! ते तेव्हढं ऑस्ट्रेलियाहून विमानाच्या तिकिटाचं..... काय ते बघाल तर नक्किच.
मॄ, नाही गं! गोटे, फरश्या आणि वाळु समोरच्याचा ट्रेलर मागून घेतला होता, त्याने आणलीत. सामान वाहायला त्याच्याच शेजार्याचा व्हीलबॅरो मागितला होता. हो, आणि गोटे, वाळू, फरश्या इ. होम डेपो सारख्या दुकानातून न आणता त्यांचा होल्सेल डिस्ट्रिब्युटर कोण आहे, त्याचा पत्ता काढून आणली. बरेच पैसे वाचले त्यात.
रुनी सहा विकेंड गेले ह्यात, अगदी हळू हळु करून. कारण ऑफिस, येणारे-जाणारे, दिवाळी इ. सगळे सांभाळून केले, पण मुलांनी पण मदत केली, नवरा मेन वर्कर.
वा! झकास
वा! झकास झालंय काम.
~~~~~~~~~
भाग्या,
भाग्या, मस्त..अगदी येऊन तिकडे सतरंजीवर पहुडावं वाटतंय..
तुझ्यापासुन स्फुर्ती घेऊन आता माझ्या गच्चीचा कायापालट करावा असं वाटतंय. झाडं लावली आहेतंच. आता छानसं सीट आउट ही करावं. inspirationसाठी धन्स.. 
भाग्या.......म
भाग्या.......मस्तच गं..... !! आणि स्वतः केल्याचा आनंद वेगळाच ना
भाग्या,
भाग्या, खुप मस्त झाले आहे अंगण. तिकडे येउन मस्त पुस्त़क आणि कॉफी घेउन बसावेसे वाटते.
ऑस्ट्रेली
ऑस्ट्रेलीयात देखील कॉंग्रेस गवत आहे
...
आता एका कोपर्यात गौतम बुद्धांचा पुतळा ठेवला की योगा साठी मस्त env तयार होईल :), good job
भाग्या
भाग्या धन्यवाद, कृती लिहिल्याबद्दल
आता वेळ झाला की सविस्तर लिहा ह्याबद्दल, आवडेल वाचायला.
फारच छान...
फारच छान... सुटसुटीत आणि सुंदर...
धन्स ऑल.
धन्स ऑल. तिथे निवांत बसून, चहा/कॉफी पीत मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी आणि पुस्तके वाचण्यासाठीच ती जागा बनवलीय.
योगा ... आयडिया छान आहे.
भाग्या,
भाग्या, अंगण बाकी सुरेख केलेस. आखीव नी रेखीव.
मस्त वाटत असेल ना असे स्वत खपून सुंदर केलेल्या जागेबद्दल?
आज बघितले
आज बघितले तुझे आंगण... मस्त्...किती उरक ग तुला अन तुझ्या नवर्याला... माझ्या नवर्याला दाखवावे लागेल, त्याला तर काम करवुन घेण्यासाठी मजुर शोधणे पण जिवावर येते...
झकास! किती
झकास! किती छान वाटत असेल नाही आपणच केलेला हा कायापालट बघायला?

चहा/कॉफी पीत मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी आणि पुस्तके वाचण्यासाठीच ती जागा बनवलीय.
>> कधी येऊ?
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
अजुन वाचल
अजुन वाचल नाही सर्व, पण दोन्ही फोटो बघुन.......
आवडेश! घरी करण अन केलेल, दोन्ही
आईशप्पथ, हे घरच्या घरीच केलत??? वा वा वा! मस्तच!
नन्तर येतो प्रश्ण घेवुन!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
मस्तच
मस्तच केलस.
तिथे बसुन सोबत चहा, कॉफी प्यायचा योग लवकर येवो.
तिकीट आणि आमंत्रण कधी पाठवतेस?
मने, खूपच
मने, खूपच छान वाटतं ग.
अल्पना, लग्नाला ८-१० वर्षे झाली ना, की नवरा पडेल ते काम (पडेल चेहर्याने का होईना) करतो बरं.
आशू, तू आणि इतरांचे स्वागत आहे, नुसत्या चहा/कॉफीवर नाही बोळवण करणार, जेवणखाण पण करू.
आणि नलू, तुझ्या तोंडात साखर. लवकरच योग येवो, माहेरपणालाच ये. पुढच्या महिन्यात आलीस तर मिरच्या, पुदीना, कोथिंबीर, टोमॅटो, बेबी कॉर्न, सिमला मिरची, भरताची वांगी अशी भाजी पण तयार मिळेल.
>>लग्नाला
>>लग्नाला ८-१० वर्षे झाली ना, की नवरा पडेल ते काम (पडेल चेहर्याने का होईना) करतो बरं>>
हे वाक्य खूपच आशावादी आहे नवविवाहीतांना गं.
अगदी अगदी
अगदी अगदी मनु.... अजुन ६-७ वर्ष आशा ठेवावी लागेल....
केल्याने
केल्याने होत आहे रे.............!!!
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
खुपच सुंदर
खुपच सुंदर आहे... ब्ल्यू फरश्यांमध्ये गोटे टाकुन केलेली बॉर्डर् डीझाईन तर मस्तच!
लेव्हलींग करणे जिकरीचे काम असेल ना!.
--------------
बरसुनी अनवट राग जाशी तू
दडी मारूनी नको हसू, अन् नको रुसू तू
तुझ्या सईचे लागले पिसे जाऊ नको राजसा
नको खुणावू झुलते झुंबर इंद्रधनूचे
नको नको रे पावसा......
आधी मला
आधी मला दिसले होते फोटो, आता दिसत नाहीयेत. काढुन टाकलेस का?
नाही
नाही गं....मी नाही काढलेत. विचारते मदत समिती नाही तर अॅडमिनना.
फोटो दिसत
फोटो दिसत नाहीये भाग्या !
Pages