लावण्य

Submitted by आशिष पवार on 10 October, 2013 - 05:27

कपाळी लट कुरळ्या कुतलांची,
नयनांतरी आभाळ,
चाल म्रुगाची चाले ती,
लावण्याचा उडवीत बार!

सोन्यात न्हाहुनी आली,
रखरखत्या उन्हात,
हुर-हुर लावुनी गेली,
सोनकांता ती एकवार!

पैठणी बुट्टेदार तिची
कर्ण फुलं चमकदार,
पायी पैजणं खणणंत,
कटाक्ष नजरेचा धारदारं!

हाती कंगण, गळ्यात हार,
कंबरपट्टा साजे भरदार,
३६ नखरे तिचे बेसुमार,
"लावण्य" उधळत चहुवार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाती कंगण, गळ्यात हार,
कंबरपट्टा साजे भरदार,
३६ नखरे तिचे बेशुमार..........
"लावण्य" उधळत चहुवार.

बेशुमार हा हिंदी शब्द आहे.
बेसुमार असे हवे.

टिंबे नकोत.

जरा प्रयत्न केले तर गझल करू शकाल असे वाटते.

झकास