रथामाजी जो चक्रधर | करी भ्रमणध्वणीचा स्विकार |
साक्षात यमाचा अवतार | तो एक मुर्ख ||
जो करीतो उत्तम व्यापार | परंतू चुकवितो कर |
सर्व जणासी भार | तो एक मुर्ख ||
जो सोडीतो यत्नाची कास | यश अपेक्षी विनासायास |
धाव घेई ज्योतीषास | तो एक मुर्ख ||
जो अपेक्षी शश्वूर धन | करी अर्थांगीसी मारहान |
नर जो असे बुध्धीविहीन | तो एक मुर्ख ||
धनाची धरून भ्रान्ता | धाडी माहेरासी कांता |
कारण सुलक्षीणीच्या अंता | तो एक मुर्ख ||
मार्गासी उभी करूनीया कार | उघडी विजारीचे दार |
निर्लज्ज जो सोडीतो धार | तो एक मुर्ख ||
जो जाये तिर्थाचिये वाट | खाय कोंबडीचे ताट |
वर मद्याचा घमघमाट | तो एक मुर्ख ||
दारासी उभा जो पुंड | सत्कार्यनामे करीसी दंड |
दुंर्बलासी जो भयगंड | तो एक मुर्ख ||
ठेउनी पु़त्राची अपेक्षा | करीसी गर्भपरीक्षा ||
कन्या रत्नासी मृत्यूशिक्षा | तो एक मुर्ख ||
जो लागला ताम्बूल भक्षणा | रंगविसी भिंत आणी जिणा ||
जन आरोग्याची नसे वंचणा | तो एक मुर्ख ||
जो करी धुम्रपानाचा थाट | लावी श्वसनमार्गाची वाट |
जवळ आणीसी शेवट | तो एक मुर्ख ||
वक्ता ऊभा पिंडदाना | करीता पक्षाचीये स्तवना |
करी मतांची वंचना | तो एक मुर्ख ||
--------------------------------------
हरीश दांगट
जय जय
जय जय रघुवीर समर्थ !
भले गुरूजी.....छान आणि आवष्यक !
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
अरे वा...
अरे वा... एकदम मस्तच.. सगळीच लक्षणे मांडलीत, कुठचे जास्त आवडले सांगता येणार नाही..
ही लक्षणे समर्थांची सांगायची राहिलेली.. तुम्ही पुर्ण केलीत आज...
साधना
दुज्या
दुज्या धाडून जात्यात | आपण ही सुपात|
हे विसरून राही भ्रमात | तो एक मुर्ख ||
हरीशराव, यादी मोठी आहे, पुर्ण करा पुढच्या फेरीत.
कौतुक,
कौतुक, वात्रट कुठचा...........!
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
ही यादी
ही यादी वाढ्तच जाणार.
मी वेळोवेळी जोडत जाइल.
हरीश
ता.क. - मला हरीशच म्हणा, हरीशराव म्हटलं की डोक्यावरचे केस अजुनच कमी वाटतात.
हरिश, फारच
हरिश,
फारच छान
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
मस्त रे
मस्त रे हरीश
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!
मार्गासी
मार्गासी उभी करूणीया कार | उघडी विजारीचे दार |
निर्लज्ज जो सोडीतो धार | तो एक मुर्ख || >> हा हा हहपुवा
हरिश सगळी कडे 'ण' जाणुनबुजुन वापरला आहे की... मला उगाच खटकला... बाकी झकास... हरिष महाराज की जय.
सही है बे.. -
सही है बे..
- अनिलभाई
भारी
भारी लिहिलं आहे..
मस्त आहे!
मस्त आहे!
सही रे
सही रे हरीश... मस्त लिहिलंय...
'ण' आणि 'न' हे यमकात धरले जातात बहुतेक.. त्यमुळे 'न' चा 'ण' करायची तशी आवश्यकता नव्हती...
सही रे ....
सही रे .... !!!!
परागकण
जबरीच.
जबरीच.
छान आहे.
छान आहे.
फारच सुंदर
फारच सुंदर विचार | करा सर्वांनी याचा प्रचार ||
सोडा बाकी तर्क-वितर्क | एकदम छान तुमचि, तो एक मुर्ख.........
संदीप जोशी.
औरंगाबाद.
मस्तच रे !!
मस्तच रे !!
आवडलं.
आवडलं. मस्त लिहिलं आहे!
मस्त!
मस्त!
*** अर्धा
***
अर्धा रिकामा की अर्धा भरलेला
वाद कशाला घालायचा ?!
पूर्ण भरलेला मागवायचा.
सहीच.................
सहीच......................!!!!!!!!!!!!
गोदेय
धम्माल...
धम्माल... आहे. मस्तच उतरलीयेत लक्षणं. कौतुक,
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया
हरिश, एकदम
हरिश, एकदम छान!
ठेउनी पु़त्राची अपेक्षा | करीसी गर्भपरीक्षा ||
कन्या रत्नासी मृत्यूशिक्षा | तो एक मुर्ख ||>> खरचं!!!!!
हरिश, मस्त
हरिश, मस्त लिहिलंय.
छान आहे.
छान आहे.
समुद्रमंथन चालू आहे. एक एक
समुद्रमंथन चालू आहे. एक एक रत्न बाहेर येईलच. हे त्यातीलच एक.
हरीश दांगट, _____/\_____
छानच जमलिये, अन ही फिरुदे
छानच जमलिये, अन ही फिरुदे इमेलान्मधुन
(फक्त, थोडेसेच विषयान्तर.....
>>>>जो सोडीतो यत्नाची कास | यश अपेक्षी विनासायास |
>>>>धाव घेई ज्योतीषास | तो एक मुर्ख ||
यात, यत्नाची कास न धरताच विनासायास यशाकरता "सगळेजण" ज्योतिषाकडे जातात असे गृहित धरल्यासारखे वाटते, प्रत्यक्षात परिस्थिती अशी अस्ते की आमच्याकडे येणारे ९०% जातक आधी प्रचंड प्रयत्न करुनही अयशस्वी, हताश्/हरलेले/थकलेले/आशेचा किरण न दिसणारे असेच असतात, व त्यान्ना मार्गदर्शन करत स्वकर्मास प्रव्रुत्त करणे हे शास्त्रानुसारचे कर्तव्यच ज्योतिषी पाळत अस्तो.
यशासारखे दुसरे यश नस्ते, व यश उपभोगलेला/त्याची चव चाखलेला वा कसलेही यत्न करावे न लागता लाभलेली सुसम्पन्नता उपभोगणारा माणूस अहंकाराच्या दर्पात ज्योतिषीच काय, देवास देखिल मानत नाही हा आमचा अनुभव!
वरील उत्कृष्ट कवितेत, हा एक खडा लागला, तो विषयान्तराच्या जीभेने वेचून वेगळा काढला, इतकेच)
हर्या नार्या जिंदाबाद
हर्या नार्या जिंदाबाद
(No subject)
हरीश, हे इतके वास्तवपूर्ण आहे
हरीश,
हे इतके वास्तवपूर्ण आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रात छापून बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. माझ्या नोकरीच्याठिकाणी याच्या प्रती काढून वाटल्या तर काही हरकत नाही ना ?
ही सर्व मूर्खलक्षणे योग्य प्रकारे दाखवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
Pages