दिव्य

Submitted by पल्ली on 19 November, 2008 - 04:49

ही माझी कविता बहारीन महाराष्ट्र सांस्कृतीक मंडळातर्फे प्रकाशित 'सलाम बहारीन' पुस्तकांत प्रसिद्ध झाली होती. प्रविण दवणेसरांना आवडल्याचं त्यांनी कळवलं होतं.
--------------------
हात पसरावेत आभाळभर
दिशा भरुन आकांक्षा
आकाशातले तारे
माझ्या ओंजळीत छोट्याशा...
एक ठोका काळजाचा
अख्खं आयुष्य जगुन घ्यायचा...
एक सूर सप्तकातला
श्वासाश्वासांत विणुन घ्यायचा...
एक आठवण त्या सोनेरी क्षणांची!
मनाच्या वहीत जपुन ठेवायची.
एक पक्षी स्वप्नांचा,
पंख त्याला आशेचा,
दूर निळ्या आकाशात
मोकळा त्याला सोडायचा,
पिंजर्‍यात नाही बांधायचा,
परत नाही आला तरी....
कुठेही सुखात असेल
असं मानुन घ्यायचा!
-------------------

गुलमोहर: 

तसंही तु नेहेमी परत परत वाचावं असंच लिहीतेस, आणि आता तर दवणे सरांचं नाव घेतलंस मग राहवलं नाही आणि मग तुझ्या शब्दांसोबत वाहवत गेलो.
ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजमध्ये माझी एक मैत्रीण होती, तिने एकदा दवणे सरांची ओळख करुन दिली होती. त्यांना मी माझ्या कविता (?) वाचायलाही दिल्या होत्या. त्यांनी देखिल तुझ्यासारखीच तक्रार केली होती, जरा रिदम येवु दे, बाकी छान आहे.....पण अजुन काही नाही जमलं....
कुत्र्याचं शेपुट.......

पण छान, मस्तच.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

आम्हीही गौरवतोय की तुमच्या कविता. वहीची पानं चाळा. एखाद दुसरा आमचा प्रतिसाद असेलच.
गंमत.
नेहमीप्रमाणे मस्त लिहिलयं.

hi! pallavi!!!! छान आहे कविता.!!! I would like to know more about you!! can u give me your e-mail id?
Saw your profile as well!!!
I am also living in UAE for last 8 years!!!

मस्त कविता!!!!

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

एक कविता पल्लीची
पुन्हा पुन्हा वाचायची
तृप्त तृप्त होताना
पुढचीची वाट पहायची

**********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !

छान...

एक क्षण भाग्याचा
ओंजळी भरभरून वाहण्याचा
एक अश्रू समाधानाचा
पंखात ताकद आल्याचा !

ही पण सुंदर गं...

चांगली आहे..३ वेळा वाचली..नंतर लिहून ठेवली.
सुभाष