गरज

दाराआतला मी अन बाहेरचा तु
तुला वाटतंय... मी सुरक्षित आहे
सुखी नसलो..तरी समाधानी आहे....

तुला काय माहीत..चौकटीतलं माझं मरणं
प्रत्येक श्वासासाठी नियतीशी झगडणं
एक एक क्षण जपण्यासाठी तडफडणं

स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी
कदाचित आत येण्यासाठी, तु धडपडतोयस
प्रसंगी मलाही बाहेर खेचू पाहतोयस

पण, आणि तरीही मला तु हवा आहेस
कारण तुझ्याशिवाय संतुलन राखणं अशक्य आहे.
म्हणुन काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे.

विशाल.

स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी
कदाचित आत येण्यासाठी, तु धडपडतोयस
प्रसंगी मलाही बाहेर खेचू पाहतोयस

नेहमीच.

मला संपूर्ण कविताच आवडली!!!
एक एक ओळ.
छान आहे एकदम

वर्षा

मला टेन मेन नावाच्या कवीतेची आठ्वन झाली.
दहा जण गटार उपसायचे काम करीत असतात.
वरुन बघनारे व नोकरी असनारे त्यांना किती दुर्दवी आहे म्हनतात.
वरुन बघनारे व नोकरी नसनारे त्यांना किती सुदैवी आहे म्हनतात.

-हरीश

मला मराठी पाठ्यपुस्तकातला 'आतले आणि बाहेरचे' हा धडा आठवला.
समोरच्याला आपण सुखी समजतो हे खरंय, पण ज्याची-त्याची सुखं-दु:ख ज्याला-त्यालाच ठाऊक असतात हे अगदी खरं.

विशाल, छान लिहीलंयंत... आवडलं. स्मित

~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~