तू

Submitted by वर्षा.नायर on 19 November, 2008 - 03:39

तूझे आणि माझे एक अगम्य नाते होते,
तू जवळ होतास, तेव्हा वाटे खूप परका आहेस तू
"तू खरच फक्त माझा आहेस?"
पण तू सोडून गेलास तेव्हा कळाले की तू माझा आहेस की नाही माहित नाही,
पण मी फक्त तूझीच आहे.
काळ सरला की आठवणी पुसट होतात म्हणे,
खोटं आहे ते, काळासरशी तूझ्या आठवणी अधिक गडद होत गेल्या
मन तूझ्या आठवणींच्या जेरबंद कोठडीत अजूनही बंदिस्त आहे
हि शीक्षा ते स्वतःहूनच भोगत आहे.
तूझ्या आठवणी ह्या फक्त आठवणी न राहता
मला दुखा:त फुंकर घालणारा, सुख देणारा अव्याहत स्त्रोत आहेत.
तू दिलेल्या दु:खांच्या देखिल मी सुंदर बागा फुलविल्या आहेत,
त्या बागांची माळीण देखिल मीच आहे.
त्या बागांमधे मी कधीपण मनाला फिरायला घेवून जाते
आणि निरस आयुष्यात त्या सुंदर बागांचा सुगंध आणि गारवा आणते.

गुलमोहर: 

मन तूझ्या आठवणींच्या जेरबंद कोठडीत
खास.

विद्या सप्रेंच्या "कृष्णमयी" ची आठवण झाली.
'प्रेम करण्यात जे ऐश्वर्य आहे, ते प्रिय होवुन बसण्यात मुळीच नाही.".......

खुप छान.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

काळ सरला की आठवणी पुसट होतात म्हणे,
खोटं आहे ते, काळासरशी तूझ्या आठवणी अधिक गडद होत गेल्या
मन तूझ्या आठवणींच्या जेरबंद कोठडीत अजूनही बंदिस्त आहे
हि शीक्षा ते स्वतःहूनच भोगत आहे.

छान !! Happy

सुरेख....... प्रामाणिक !!

हि कविता छान वात्लि, तुम्हाला कुथ्लि आवद्ते ?

dream तूझा पश्न परत विचारतेस का? मला नीट समजला नाही. माझ्या कवितांपैकी मला सर्वात कुठली आवडते असे तूला म्हणायचे आहे का?