नारको
गेली अनेक वर्षे:
दर शुक्रवारी सन्ध्याकाळी ठरल्या वेळी आमचा कुल्फीवाला गेटावर हजर असायचा. दुरून त्याच्या डोक्यावरची ती मिणिमिणती पणती दिसली की "गोंद्या आला रे" म्हणत आम्ही गेट्पाशी जमत असू. अन मग त्याची ती होममेड मटका कुल्फी खायची. अगदी पोट भरेस्तोवर. कधी कुल्फीत कमी जास्त झाले तर आम्ही त्याची खेचत असू, तोही गमतीने मग "ठीक है कल दो कुल्फी जादा देगा" म्हणत आमची समजूत घालत असे.
कालः
क्या भैया आज दूध मे पानी जादा है? खर बोल नाही तर तुझी नारको टेस्ट घेईन...
साहेब आज म्हशीने दूध नाही दिले नेहेमीसारखे, आता हव तर तिच ब्रेन मॅपींग करा..
आजः
आमचा नेहेमीचा नव्हे तर प्रत्त्येक कुल्फी विक्याकडे मि संशयाने पाहणार अन प्रत्त्येक कुल्फीविक्या एकतर "काय नसती कटकट आहे" म्हणून मला टाळणार किव्वा काहितरी दुसरे पर्यायी मार्ग वा कारणे शोधणार.
परस्परांमधला विशवास एकदा संपला की तो पुन्हा प्रस्थापित करायला अनेक काळ लोटतो. मग दरम्यान कितीही प्रयोग करा वा चाचण्या घ्या. यातून कुणाचे भले होत आहे?
हे उदाहरण किव्वा प्रसंग फार अस्थायी वाटतय? इतकी ओढून ताणून तर भय्या देखिल कुल्फी लांब करत नसेल ना? अगदी कबूल आहे. या एकन्दरीत "नारको" प्रकरणाबद्दल मलाही अताशा असच वाटू लागलय.
काही अपवादात्मक प्रसंगात, केस मधे किव्वा इतर काही धागे दोरे हाती येत नाहीत म्हणून एक शेवटचा मार्ग म्हणून नारको चाचणी आधी केल्या गेल्या आहेत.. आजवर खर तर आम्ही त्या चाचण्यांकडे कुतुहलाने पहात आलो. थोड सम्मोहन आणि थोडे फार रासायनिक घटक वापरून माणसाच्या मनातील गूढ उकलण्याचा एक मार्ग इतपत नारको बद्दल आमच ज्ञान. नारको चाचणीतही खोट बोलता येत, किव्वा या चाचणीतून ठाम निश्कर्ष काढता येत नाहीत असे यातील खुद्द"तज्ञ" लोक म्हणतात.
असे असताना आजकाल या ऊठ सूठ नारको अन त्याही उपर त्या अनुशंगाने कुणालाही बुकलण्याचे वा डाम्बण्याचे वा अपराधि ठरवण्याचे जे नविन प्रयोग सुरू आहेत त्याबद्दल कुतुहल नाही पण संशय, चीड, अविश्वास मात्र नक्की वाढत आहे.
अर्थात मि "मालेगाव" बॉम्ब्स्फोट प्रकरणाबद्दल बोलतोय हे ओळखायला इथे कुणाचीही "नारको" घ्यावी लागणार नाही.
पुन्हा नारकोतून आज केलेल एक विधान (RDX बद्दल) दुसर्या दिवशी स्वता तपास अधिकारीच बदलत आहेत..
हे नक्की काय चालू आहे? कशासाठी? आणि कुणासाठी?
दोषी लोकाना अगदी खुशाल फासावर लटकवा (अर्थात त्याचे नाव अफजल नसेल तर, किव्वा फाशीची फाईल राष्ट्रपती भवनात धूळ खात पडली नसेल तर), मग तो हिंदू असो वा मुस्लमान वा आणि कुणी. बॉम्बस्फोटासारख्या गोष्टि वाईटच अन तो गुन्हा शम्भर वेळा फासावर लटकवले तरी प्रायश्चित्त कमीच ठरेल इतका घ्रुणास्पद आहे. विधवा होणार्या स्त्रीया, कोवळ्या वयातील किव्वा हाताशी असणार्या कमावत्या व्यक्तीला गमावणारे कुटूंब, कुणाचे भाऊ, कुणाच्या बहिणी, कुणाचे जिवलग, कुणाचे आणखिन कोण.. उध्वस्त होणार्याला जात, धर्म नसतो, असतात ते नशीबाचे कॄर भोग.
कितीही नारको घेतल्या तरी ते दुख्ख भरून येणार नाहीये...अन इतके नारको घेवूनही स्फोट काही थाम्बत नाहीयेत. थाम्बतील असे तरी वाटत नाहीये.
माझे दुर्दैव म्हणा, नुकतीच अरबाच्या राज्यात घरी भारतीय वाहिन्या दिसू लागल्या म्हणून खुश होतो अन हे असल नको ते पहाव लागतय.. त्यातही नेमकी परवा एका वाहिनीवर एक कार्यक्रम बघितला: काय तर म्हणे Is there anything like Hindu Terrorism? फार मोठ मोठ्या व्यक्ती अन सामन्य जन त्यात होते, पोलिस वाले, मिलिटरी वाले, राजकीय नेता, धार्मिक, विचारवंत (डोम्बल!) इत्यादी.
तो तमाशा पाहून मला इतके वर्षात पहिल्यांदा मि "भारतीय आहे" हे म्हणण्याची लाज वाटू लागली. देशाला इतक्या भयानक रोगाने (रोगच तो, संकट म्हणणार नाही मि) ग्रासले असताना, कुठल्या फोल वादात हे लोक अडकून पडले होते, अन त्यातून साधल काय तर म्हणे "आता मिलीटरी वर तरी कसा विश्वास ठेवायचा"..? बाबान्नो, यातून कुठल्याही एका संस्थेवर नव्हे अख्ख्या देशाच्या व्यवस्थेवर तुम्ही घाला घालत आहात असे त्यान्ना ओरडून सान्गावेसे वाटले. पण जो तो आपल्याच विश्वात मग्न. अन प्रत्त्येकाचे स्वताचे टुमणे: अल्पसंख्यांकाचे हाल अपेष्टा, दलितान्चे गार्हाणे, रा़जकीय मुद्दा, हिंदूंचा राग, बाबरी मस्जीद, बान्गलादेशी परकीय स्थलांतरीत, सीमेवरील आरमीचा हींसाचार, गोधरा हत्त्याकांड, पोटा कायदा, जातीयवादी पोलिस, अगदी अमेरीकेतील 911 इत्यादी इत्यादी...
एक मनुष्य म्हणून आपण कधी जगणार आहोत आणि दुसर्याला मानाने जगू देणार आहोत? का मनुष्य आहोत हे सिध्ध करायला आधी नारको चाचणी घ्यावी? अन घेतलीच तर किती जण "पास" होतील हा प्रश्णच आहे.
खर तर अनेक प्रश्ण आहेत..
नळाला दिवसभर नाही तरी किमान गरजेच्या वेळी शुध्ध पाणि येईल का..?
अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा सर्व सामान्य जनतेपर्यंत पोचतील का..?
आमच्या पुढच्या पिढीला शुध्ध प्राणवायू मिळेल का ऑक्सिजन सिलींडर पाठीवर घेवून फिरावे लागेल..?
वंदे मातरम चा अर्थ, सक्ती, वा पाठ्यपुस्तकातून राष्ट्रगीत लिहीताना कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल का..?
पाचवी फेल पप्पू देशाचा पंतप्रधान नाही तरी राज्याचा मुख्ख्यमंत्री होणार नाही ना..?
अगदी अलिकडचा "जोर" लागणारा प्रश्ण म्हणजे किमान शहरातून तरी स्वच्छ सार्वजनिक सुविधा, शौचालये उपलब्ध होतील का..?
अन इतके करूनही आमचा एकमेकावरील एक माणूस म्हणून विश्वास बसेल का..?
मि एक सामान्य मनुष्य आहे, नारको ची सत्त्य, असत्यता, किव्वा तांत्रिक गोष्टीवर चर्चा करू शकणारा तज्ञही नाही पण मला असे विचारावेसे वाटते की या खालील लोकांची नारको चाचणी घेतली तर त्यातून काय हाती लागेलः
१. "अफजल गुरू" च्या फाशीची फाईल लपवलेल्या व्यक्तीची. "आता मंगळावर चला" म्हणणार्यांन्नी मालेगाव मधे नेमका कुठला "प्रोब" सोडलाय यावर प्रकाश टाकावा.
२. तमाम राजकीय नेत्यांची.. किमान मुलायम, लालू, माया, शिबू कम्पनीची. "सिमी" (गरेवाल नव्हे) नक्की काय काम करते, म्हशींचा चारा कुठे गेला, दलितांना नक्की कोण पायदळी तुडवतोय, अन आजचा मंत्रीपदाचा रेट काय, या किमान प्रश्णांची उत्तरे मिळतील अशी आशा आहे.
३. न्यायासनावर बसलेला न्यायाधीशः न्यायदेवतेला अन्धळे कुणि केले? तिच्या हातातील तराजूचा काटा देखिल "ढापता" येतो का..?
४. यमः अजून किती "मालेगावांच" बुकींग घेतलय?
वरील उत्तरे मिळणार नसतील तर या नारकोची "लागण" होण्या आधी त्याचे समूळ उच्चाटन करायला "तज्ञांची" हरकत नसावी.
तुम्हाला काय वाटते?

भयानक पण विदारक सत्य. खरंय तुझं. दहशतवादाला जात असते, धर्म असतो पण उध्वस्त होणार्याला नाही. उध्वस्त होतात ते बिचारे तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक. नारको, इतकं नियमीत ऐकु येतेय. त्यातुन काय निष्पन्न होइल काळच सांगेल. पण आम्हाला म्हणजे सामान्य लोकांना जे हवे आहे त्याचा विचार कधीतरी कुणी करेल का? देश सोडुन परदेशात स्थायिक झालेल्या कित्येक भारतीयांना भारतात परतायचे आहे पण त्यांना नोकरी मिळत नाही. महागाई आकाशाला भिडते आहे, कसे सावरायचे हे संसाराचे फाटके शीड? थोरांच्या पुतळ्यांची विटंबना कोण करतो आणि कोण प्रथम पहातो आणि कोण गदारोळ माजवतो?
शेवटचे तीन पॅरेग्राफ मनापासुन पटले.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभुत समस्या अजुनही अनुत्तरीत आहे.
पण त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. राज ठाकरेच्या केकवर काय लिहीले आहे, हे चॅनेलवाल्यांना दिसते,
पण कित्येक कोटी हातांमध्ये भाकरीदेखिल नाही हे दिसत नाही. हे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
आणि योगायोगाने हा लेख वाचनात आला....
http://timesofindia.indiatimes.com/Columnists/Tarun_Vijay_Why_are_Hindus...
योग,
लिखाण खुप आवडल. देशापुढे एवढ्या समस्या आ वासुन उभ्या असताना असल्या निष्फळ चर्चा करण्यार्यांना त्यात काय समाधान मिळते कुणास ठावुक.
थोडेसे विषयांतर... पण तरिही:
http://specials.rediff.com/news/2008/nov/18sd1.htm
आणि वरील लेखाशी थेट संबन्धीत हा लेख...
B.Raman, या सुरक्षा "तज्ञ" लेखकाबद्दल अधिक काही सांगायची गरज नसावी. म्हणूनच ही लिंक देत आहे:
http://www.rediff.com/news/2008/nov/17braman-mumbai-ats-probe-has-taken-...
चान्गले लिहिले आहे... सामान्य माणसाची बोली...
वाईट या गोष्टिचे वाटते की सामान्य माणसाचा कोणीच विचार करत नाही. सगळ्यान्ना हिन्दूचा, मुसलमानाचा, दलिताचा, शेतकर्याचा, मराठी माणसाचा पुळका आहे, पण ते विचार फक्त स्वतहाचा करतात. धर्मनिर्पेक्ष देशात धर्म महत्वाचा!
काही बोलाले तर लोक म्हणतात,''मग तुम्ही का नाही बदलत हे सार?'', जस काही आम्ही काहीच करत नाही?! मी वाहतुकीचे नियम पाळतो, काही चोरी/लबाडी करत नाही, सगले टॅक्स भारतो... अजून काय करावे ???? <<सर्वानी जास्त काही न करता फक्त एवधे केले तरी देश सुधारेल>>
या राजकारणी लोकान्ना बरच वाटल आसेल की आता हिन्दु देखिल स्फोट करायला लागले...
--------------
Indiatimes चा लेख छान आहे. त्या लेखातून एक paragraph:
"It had never displayed this action-oriented thrill when the Delhi blasts occurred or the Jaipur blasts claimed more than 60 lives. No Maulana was arrested or caricatured in the media as the bloody green terror guru or ghastly Islamic terrorism."
अगदी योग्य शब्दात सर्वसामान्यांच्या भावना मांडल्या आहेस ...
एक शेवटचा मार्ग म्हणून नारको चाचणी आधी केल्या गेल्या आहेत.. >> यावेळी मात्र सगळ्यात पहीला मार्ग हा निवडला आहे.
itsme, अगदी बरोबर, आणि म्हणुनच ते थोडंसं संशयास्पद वाटतंय. एटीएस च्या मुळ हेतुबद्दलच संभ्रम निर्माण झाला आहे.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.