आहे तुझ्यात मी

Submitted by अज्ञात on 17 November, 2008 - 06:23

आहे तुझ्यात मी, माझ्यात मी दिसे ना
गंधासवेस वारा, का पाहिला कुणी
मस्तीत भृंग वेडा, होता कधी कुणाचा
कळलेच ना कळीला, झाला सखा कधी

तो दंग गुंजनात, स्वप्नात ती खुळी
आकाश चांदण्यांचे, जळ जाहले उरी
शोधूनही कसे हे, गूढ सापडावे ?
बिंबास ओळखे ना, प्रतिबिंब राउळी ..!!

...................अज्ञात

गुलमोहर: 

बिंबास ओळखे ना, प्रतिबिंब राउळी

सुंदर !

अतीशय सुंदर.

-हरीश

अप्रतीम!!!!!!!:)

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************