प्रुथ्वी

Submitted by अनघा कुलकर्णी on 27 August, 2013 - 04:17

पृथ्वी
आकाशाशी जुळले नाते ,ग्रह गोलांचे ,
लुकलुकन्याऱ्या चांदण्याचे ,
पृथ्वीवरून दिसे आभाळ ढगांचे ,
चांदण्या, चंद्र -सूर्य ,इंद्रधनू ,पक्षी ,
ऊन -पाऊस अन विमानाचे I १ I
पृथ्वीवरी तेज भास्कराचे ,गाजवतो तो राज्य दिमाखाने ,
तप्त वायूचा गोळा तो ,
देतो शक्ती ,प्रकाश अवनीवर ,I
सुर्याभवती फिरते पृथ्वी ,जणू प्रियाच भासे ती त्याची I
टाकते ती जीव ओवाळून ,
मदत त्याची घेते,सजीव ,शृष्टी निर्माण होते. I
कृष्ण मेघ घेउनी येती जलधारा ,ओली होते काळी माता ,
अंकुरते नवे जिवन तिच्या पोटी ,
तृप्त ती धरणी माता ,दिनकरास मारीत असते प्रदक्षिणा.
I

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुर्याभवती फिरते पृथ्वी ,जणू प्रियाच भासे ती त्याची I
टाकते ती जीव ओवाळून ,<<<

ओके! मग चंद्र पृथ्वीभोवती फिरणे हा पृथ्वीचा विबासं असावा. तसेच इतर सात आठ ग्रह सूर्याभोवती फिरतात ते सूर्याचे! बराच मागे आहे म्हणजे अजून सूर्य माझ्या!

!!