विषय क्रमांक ३ - स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती : समुपदेशक पुस्तक : "कधी न संपणारी कायमची शिदोरी"

Submitted by अनघा कुलकर्णी on 25 August, 2013 - 07:40

विषय क्रमांक ३ - स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती : समुपदेशक पुस्तक : "कधी न संपणारी कायमची शिदोरी"

`कायमची शिदोरी या नावातच `कायम हा शब्दआला आहे. म्हणजे नेहमी नेहमी. लेखिकेने लिहिलेले समुपदेशक लेख हे कायमस्वरूपी मार्गदर्शन करणारे आहेत. लेखनाची भाषा अगदी सहज, सोपी व सर्वांना समजणारी आहे. निसर्गाची मुळातच आवड व `निसर्ग माणसाला भरभरून देतो याची जाणीव लेखिकेची संवेदनशीलता, तिचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, स्त्री-पुरूष समानता, गृहिणीच्या घरातील उच्च स्थानाविषयी कळकळ , `आधार या कवितेत आपल्या प्रिय व्यक्तीला दुरावल्याचे दुःख जाणवते. जीवनाचे अंतिम सत्यच या कवितेत व लेखात जाणवते. `सोबती मध्ये आपल्या प्रिय `भू चे वर्णन करून लेखिकेची भूतदया जाणवते. प्रत्येक लेखात लेखिका भावभावनांची `जाणीव व कर्तव्याची आस प्रत्येकाने धरावी हे समुपदेशन करते. `संस्काराची शिदोरी या एका छोटया गोष्टीतून मुले कशी वाईट प्रवृत्तीकडे जातात हे दिसून येते. लेखिका मुलांना योग्य वळण लावा असे सांगते. `आठवणींच्या हिंदळयावर मनाला सतत आनंद देणारे `बालपण प्रत्येकातील `लहान मूल जागे ठेवण्यास प्रवृत्त करते. प्रत्येक सफरीतून निसर्गवर्णने जाणवतात. कविता किंवा गाण्याची ओळ प्रत्येक लेखनाच्या सुरूवातीला आल्याने वाचणाण्याचे मन आनंदी होते व तो लेख पुनःपुन्हा वाचावासा वाटतो. सखा, सखी, आनंद, गप्पांच्या ओघात, आळशी इत्यादी लेखांतून उनाड आनंद अवतीभोवती पिंगा घालून सुखद क्षणांना आपल्या ओंजळीत टाकत असतो. बालसाहित्यातील खटयाळ ससा, मांजरीची पिल्ले व भू-भू हे वाचकाला लहान होण्यास भाग पाडतात व एक निर्मळ आनंद देतात. खंत, वृद्धाश्रम काळाची गरज, यातून लेखिकेचे सामाजिक भान व चिंता दिसून येते. अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या फेऱ्यात न अडकता आपण फक्त चांगले कर्तव्य करावे असे वाटते. कथा, कविता व लेख अशी ही `कायमची शिदोरी, तिची पुन्हापुन्हा गोडी चाखावीशी वाटते. `कधीही न संपणारी `कायमची शिदोरी हे पुस्तक प्रसिद्ध होण्याआधी मी लेखिकेचे विविध विषयांवरील लेख वाचले आहेत. पुढील पिढी व महिलांनी ते जरूर वाचावेत. त्यांनी पुस्तकरूपी समुपदेशन केले आहे. त्यात ज्ञान, मनोरंजन, बालसाहित्य, कविता हे सर्व अतिशय सहजसुंदर, सोप्या भाषेत सांगितले आहेत. पुस्तक वाचत असतांना लेखिकेच्या मनाचे बोल आपलेच आहेत की भावना प्रकर्षाने जाणवते. देवांच्या व थोरामोठयांच्या आशीर्वादाने हातून एक चांगली ज्ञानाची शिदोरी व चांगले संस्कार चांगले मन होत जाते. सकारात्मक दृष्टिकोन व अंधश्रद्धा व कर्मकांडात न अडकता माणसाने फक्त चांगले विचार, आचार व कृती करावी ही तळमळ दिसून येते. लेखिकेची इच्छा आहे, की पुढील पिढी चांगली निपजावी, त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावेत व एक निरोगी, निकोप व सुशिक्षित पिढी निर्माण व्हावी, याची खटपट दिसून येते. नेहमी-नेहमी वाचता यावे अशी ही संग्राह्य पुस्तकरूपी ठेव प्रत्येकाला आनंदच देईल यात शंका नाही. शिक्षिकेतून आलेली लेखिका व कवयित्री हिने `कायमची शिदोरीतून आपल्या सर्वांसाठी नेहमी नेहमी वाचावेसे वाटणारे समुपदेशकरूपी मार्गदर्शन केले आहे. सहज, सोप्या व सरळ भाषेत त्यांनी त्यांचे मनोगत अतिशय संवेदनशील भावनेतून साकारलेले `भावना, `आधार, `सोबती इत्यादी लेख, तसेच उनाडपणा करून सतत आनंदी ठेवणारा `आनंद हा सर्वांनाच खूप हसवितो व आनंद देतो. `आजोळ , `रायगड, `सहल, `महाबळेश्वर या सफरीतून प्रत्यक्षच आपल्यापुढे ठिकाणे उभी केली आहेत. सहज, सुंदर, तरल भावनांना विचारांची जोड देऊन लेखिकेने सर्वांनाच विचार करण्यास प्रवृत्त केले आहे असे म्हणावे लागेल. लहान मुलांसाठी `ससा, `मांजरीची पिल्लेऽ व `भू-भू हे मोठयांनाही लहानपण आठवून देतात व निर्मळ आनंद, जसा मोगऱ्याच्या फुलांचा, तशी काहीशी सुगंधित वातावरणनिर्मिती आपल्याभोवती होते, इतके आपण त्यात गुंगून जातो.

लेखिकेने आपल्या लेखाची सुरुवात "आई" ह्या लेखेने केली आहे. तिने आईच्या थोर उपकाराचे वर्णन केले अहे. लेखिकेला असे वाटते की आई, कुठे कमी पडू नये म्हणून स्व-सुखाचा सतत त्याग, त्याग आणि त्यागच करत राहते. याची `जाणीव सुज्ञ, सुसंस्कृत, शिक्षित - अशिक्षित मुलांना असली तर ठीक, नाहीतर पुढे तिचे काही खरे नाही. मुलांना वाढवायला, खस्ता खात खात पायावर उभे करायला वीस-पंचवीस वर्षे निघून जातात. आपल्या उपकारकर्त्या आई-बाबांचे मुलांनी पुढे हाल करू नयेत. त्यांना वृद्धाश्रमापेक्षा मैत्री व प्रेम द्यावे; त्यांचा राग करू नये, फक्त सेवाच करावी. कारण, खरे देव हे आपले माता-पिताच असतात. त्यांची आई आता तुम्ही मुलांनी व्हायचे, असे लेखिकेला वाटते.

"श्रद्धांजली" ह्या लेखात लेखीकेने आपल्या न्याय देवतेलच डोळ्यावरची झापड दूर करण्यास सांगितले आहे . लेखिकेचा असा आग्रह आहे की चांगल्या सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन समाजासाठी समाजजागृतीचे, त्याच्या विकासासाठी, चांगले परिवर्तन घडवून आणण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करून प्रत्येकाला ज्ञानी बनवून, समुपदेशक बनवून प्रत्येकाचे मत परिवर्तन करून विकासाच्या, धर्माच्या, संस्काराच्या वाटेने जाण्यास सांगितले पाहिजे. भरकटलेला समाज, कोसळलेली अर्थव्यवस्था, पोखरलेला समाज, चित्रपट टीव्हीवरील हिंसक दृश्ये, नको ते दाखवणे, विध्वंसक वृत्ती, भयानक दृश्ये, भावना शून्य दृश्ये यांची सतत रेलचेल दिसत असते. कायद्याची कातरी तेथे कधी लागतच नाही. कारण मग टीआरपी वाढणार कसा? प्रत्येकाने मनाने, मनाला प्रश्न विचारायचा मी करतो ते चांगले की वाईट. मग बरोबर कल देईल. डोळसपणे, सकारात्मक विचारांची प्रत्येकाला गरज आहे. या नुतनवर्षा आपल्यापासूनच चांगलेपणाची सुरूवात करू या व सर्व सुखी व नीट राहोत अशी देवाजवळ प्रार्थना करू या. सर्व महिलांनी मन घट्ट करून धीट, सतर्क, विरोध दर्शविण्याची तयारी व नीट राहणी ठेवून वागावे. असे तिला वाटते .

शिवरायांचे स्मारक ह्या लेखात लेखिकेला असे वाटते की , शिवरायाचा मालवणचा सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांमागे फार मोठा इतिहास दडला आहे. याच समुद्री किल्ल्याचा विकास करून शिवरायांचा पराक्रम, त्यांचा गनिमीकावा, प्रतापगड, शिवनेरी, रायगड, राजगड इत्यादी महत्त्वाच्या गडांच्या प्रतिकृती उभारून, तसेच मावळयांचा पराक्रम, पावनखिंडीतला बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम, शिवरायांची आग्रा येथून पेटाऱ्यातून झालेली सुटका, शिवरायांचा रायगडावरील, भव्यदिव्य राज्याभिषेकाचा सोहळा , त्यांचे घोडदळ, हत्तीदळ , तोफखाने, रणगाडे इ. प्रतापगडावरील मोठया अंगापिडांच्या दाणगट खानाचा वध, भवानी मातेचा साक्षात्कार, शिवनेरी किल्ला जिथे शिवबा जन्मला, त्यांनी लिहिलेली, दुर्मिळ पत्रे, त्यांची मुद्रा, इत्यादी, तसेच महाराजांसाठी लिहिलेले पोवाडे, जे सर्वांना आंतरिक शक्ती, स्फूर्ता, धैर्य देतात. तसेच, `शिवरायांसी आठवावे। जीवित्व तृणवत मानावे। इह-परलोकी तरावे। कीर्तिरूपे॥ इ. श्रीसमर्थरामदांनी वर्णिलेली ओवीबद्ध महती, त्यांची शिवरायांशी झालेली भेट, संत तुकारामांशी झालेली भेट, इत्यादी. रवींद्रनाथ टागोरांनी बंगालीत लिहिलेली काव्ये, त्यांचा मराठी अनुवाद कवितारूपी लिहिता येईल. त्यांचे चरित्र हे सर्वांना स्फूर्ता, अन्यायाविरूद्ध लढण्याची हिम्मत, ताकद देईल. औरंगजेबाशी शर्थपणे झुंज दिली तो प्रसंग, जिजाऊंनी व त्यांचे गुरू दादोजी कोंडदेव इत्यादींनी दिलेली शिकवण, असे कितीतरी महत्त्वाचे प्रसंग जर या स्मारकानिमित्त पर्यटकांना बघायला मिळाले तर ज्यांना उंचावर चढता येत नाही अशा वयस्कर लोकांना, लहान, शाळकरी मुले, मोठी माणसे, युवा व शिवप्रेमी परदेशी पाहुणे या सर्वांसाठी सहज शक्य असेल. सर्व सोईसुविधांनीयुक्त असे हे भव्यदिव्य, डोळयांचे पारणे फेडणारे, समुद्र व निसर्गाचा वरदहस्त असलेल्या कोकणाच्या कुशीत जर हे ऐतिहासिक स्मृतीला उजाळा देणारे समुद्रातील स्मारक झाले, तर ते सर्वांनाच भूषणावह होईल यात शंका नाही.

पुढील लेख "आठवणीच्या हिदोळ्यवर" ह्यात आजोळच्या आठवणी , मनाच्या हिंदोळ्यावर ह्यात लेखीलेला असे वाटते की , मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनाला जिंकून घेतले पाहिजे. क्षणभंगुर आनंदावरची आसक्ती, आकर्षण कमी झाले पाहिजे. शुभ विचारांचे, शुभ कर्मांचे फळ हे चांगलेच असते. सकारात्मक विचारच आपला उत्कर्ष करतात. मनाला जिंकण्यासाठी माणसाने भगवंताचे नामस्मरण, चिंतन, ध्यानधारणा, योगासन, मेडिटेशन करावे. म्हणजे मन शांत, परिपक्व होते. त्याचा चंचलपणा कमी होतो. डोळसपणे व योग्य निर्णय घेण्यास ते तयार होते. नित्य श्रीसमर्थांचे मनाचे श्लोक म्हणावेत. मद, मत्सर, मोह, माया, पाश, आळस इत्यादी सहा शत्रूंच्या तडाख्यात सापडलेले आपले मन आपल्यावरच अधिकार गाजवू पाहते. त्याला चांगलेच वेसण घालून बंधनात ठेवता आले पाहिजे. `विनाशकाले विपरीत बुद्धी असे व्हायला नको. इंद्रियांना, षड्रिपूंना काबूत ठेवणारा मारूतिराया आठवतो. त्याला वंदन करून म्हणू या......

मनोजवं मारूततुल्यवेगं। जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयुथमुख्यं। श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये।
मनाप्रमाणे सर्वत्र संचार करणारा, इंद्रियांना काबूत ठेवणारा, वाऱ्याप्रमाणे
वेगवान, वायुपुत्र, वानर समुदायाचा मुख्य असा रामदूत, त्याला आम्ही शरण जातो.
आपण सर्व त्याच्याप्रमाणे मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू या .

नंतरचा लेखात लेखिका आपल्याला रायगडची सफर, महाबळेश्वरची सफर घडवते. आनंद ह्या लेखात लेखिकेने मुंबईकरांसाठी आनंदचे क्षण उचलण्यास सांगितले आहे . उनाड पाऊस , उनाड आनंद ह्यात पाऊसाळ्याची मजा, आनंद भटकंतीचा तसेच विनोदी आळशी आनंद , शाश्वत आनंद इत्यादीचे वर्णन केलेले आहे.
गृहिणी ह्या लेखात गृहिणीचे महत्व पटून देण्यात आले आहे . आळशी हा विनोदी लेख असून त्यात वेळेला महत्व दिले पाहिचे असे लेखीकेला वाटते. ह्यात त्यांनी आळशी विनूची गोष्ट सांगितली आहे .

"आधार" ह्या लेखात लेखिकेने सांगितले आहे की , विश्वातील प्रत्येक सजीवाला आधाराची गारच असते , मग ती झाड असो व वेली. सर्व सृष्टी ला आधार देणारा , प्रचंड उर्जा व अफाट तेज , स्वयंप्रकाशित तारा, खूप उष्णतेचा गोळा , असा हा सुर्य कोणतीही तक्रार , अहंभाव , स्वार्थीपणा न करता सृष्टीचे रोजचे रहाटगाडगे चालवत असतो .पुढे लेखिकेने आधाराची अनेक उदा. सुंदर रितीने प्रस्तुत केली आहे .

गप्पाटप्पाच्या ओघात ह्या लेखात तिने आपले छंद जोपासावे व कलेचा छंद ह्या लेखातून लेखिकेने निरनिराळे छंदाचे महत्व व त्यातून झालेला व्यक्ती विकास, मानसिक आनंद, नवनिर्मितीचा आनंद जो शब्दात व्यक्त करता येत नाही , असे तिला वाटते .

पुढील लेखात लेखिकेने भाव भावनांना महत्व दिले आहे. सोबती ह्या लेखात आपल्या प्रिय भू-भू चे वर्णन करताना लेखिकेने त्याचे पराक्रम, प्रामाणिकपणा व जीवाला जीव देणे ह्या भावनांचे प्रसंग लेहले आहेत . हे बंध रेशमाचे , सप्तपदीचे ह्या लेखात मुलगी सासरी जाताना तिच्या आई वडिलांच्या भावनांचे मार्मिक वर्णन केले आहे .

संस्काराची शिदोरी ह्या लेखात लेखिकेने कुंभार जसा मातीच्या गोळाला सुंदर आकार देतो व छानसे शिल्प तयार करतो तसेच मुलांना वेळीच योग्य संस्कार देऊन आदर्श व्यक्ती घडवण्याची जवाबदारी आई, वडील व गुरु वर असते असे सविस्तर सांगितले आहे . त्यात तीने एक गरीब मुलगा व त्याची आई ह्यांची गोष्ट सांगितली आहे. पक्ष्यांचा जगात व जाणीव ह्या लेखात लेखिकेने पर्यावरण व निसर्गाच्या उपकारांची जाणीव ठेवायले सांगितली आहे. आपला समाज , देश शिक्षित, सुसंस्कारित व्हावा , आपले व आपल्या देशाचे नाव बदनाम होणार नाही ह्याची जाणीव सर्वांनी ठेवावी .

सखा सखी ह्या विनोदी लेखात तिने सजीव व निर्जीव चे विविध ताळमेळ चे प्रसंग माडले आहे व निर्जीव वस्तूंना पण सजीव मानून विनोदाची झालर दिली आहे. दिवाळी पहाट ह्यात श्री श्रीधर फडके ह्यांनी बाबूजींच्या आठवणीना उजळा देऊन गीत रामायण सदर केले असे वर्णन केलेले आहे . खंत ह्या लेखात परदेशात गेलेल्या मुलांनी परत मायदेशी यावे व आपल्या देशाचा विकास करावा असे लेखिकेने सुचवले आहे . वृद्धाश्रम काळाची गरज व तिथल्या सोई ह्या विषया बद्दल लेखिकेने लेखात वृद्ध लोकान बद्दल कळवळ व्यक्त केली आहे . आज वृद्धाश्रम व डे केअर सेंटर च्या द्वारे वृद्धाना आधार व प्रेम मिळावे व त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे सविस्तर वर्णन केले आहे. अंधश्रद्धा व कर्मकांड ह्या लेखात लेखिकेने त्याच्या आहारी न जाता आपले आद्य कर्तव्य करावे असे ठाम पणे सुचवले आहे .

पुढे लेखिकेने काही सत्य कथा "सावल्यांचा भास ,शल्य व हत्ती व सापाची रूपक कथा" लिहिली आहे. तसेच मुलांसाठी बाल विभागात "ससा , मनी माऊची पिल्ले, आमचा सोबतो शेरू व विनोदी चुटके आहेत . तसेच तीने सहजच , प्राजक्त , मोगरा , गुलाब , उन पाऊस , दिशा , जोपासना , नयन, कळी , साक्षरत , प्रीत , कुंभार , सागर , आई इत्यादी कविता संग्रहाचा पण समावेश केला आहे. ह्या कविता अत्यंत सरळ भाषेत व समुपदेशक आहे .

लेखिकेने ह्या पुस्तका द्वारे सामान्य लोकांचा जीवनात घडण्याऱ्या घडामोडी बद्दल सुंदर लेख व कविता रचल्या आहेत. अशी ही कधी न संपणारी कायमची शिदोरी पुढील पिढीला अनंत काळा पर्यंत मार्गदर्शन करत राहणारी आहे . माझ्या दृष्टीने हे पुस्तक वाचनीय व संग्राह्य करण्या योग्य आहे .

अशी हे ज्ञानवर्धक पुस्तक अ . अ . कुलकर्णी ह्यांनी लिहिलेलं आहे व मे २०१३ मध्ये प्रकाशित झाले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users