गेली आई ह्रदय रडले
डोळ्या मधले अश्रु रडले
शब्द भाबडे अबोल बनले
अर्थ तयांचे नाही कळले
अर्था विन का हुंदके आले
आई आई ह्रदय बोलले
शब्दाविन ते ओठी विरले
भाव मनीचे दाटूनी आले
पदरा मधले सर्वस्व आतले
ते मज देवूनी उपकृतकेले
कुठे फेडू मी कर्ज दुधाचे
मातृत्वाचे घट हे आटले
पाठीवरले हात थबकले
आपुल्यापाशी डोळे रडले

सुरेख...छानच...अगदी अंतरातुन....!
एक छोटीशी सुचना...
उपक्रुत : upakRut : उपकृत
मात्रुत्वाचे : maatRutvaache : मातृत्वाचे
सोपं आहे ना..?
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
हेमंत... तुमच्या कवितेने अगदी आत कोठेतरी हलवुन टाकलं... त्यात आजच माझ्या एका सहकार्याची आई गेली... त्यामुळे तर नकळत डोळे ओलावले.
पल्लवी
हेमंत, भावनांना शब्दांच्या भडीमाराची गरज नसते. साधं, सरळ. भिडलं मित्रा.
कौतुकला अनुमोदन!! अतिशय छान उतरल्यात भावना...
*****************
सुमेधा पुनकर
*****************