आठवांची पखाल आहे मी

Submitted by बेफ़िकीर on 3 August, 2013 - 13:03

आठवांची पखाल आहे मी
आसवांचा दलाल आहे मी

देत भोज्या गहाळतो मृत्यू
जीवनाची कमाल आहे मी

एकदा वेळ काढुनी भेटू
काय सांगू... धमाल आहे मी

जर कुठे पाहिलेत तर कळवा
की कुठे आजकाल आहे मी

चोरुनी भेटते मला अजुनी
आणि म्हणते खुशाल आहे मी

बघ जरा पांघरून हृदयावर
एक उबदार शाल आहे मी

नाक मुरडून ही सुखे गेली
काय इतका बकाल आहे मी

होत नाही अश्या परिक्षेचा
लागलेला निकाल आहे मी

उंबर्‍यावर तुला रडू आले
वेदनांचा महाल आहे मी

जन्म कोड्यात टाकुनी म्हणतो
एक साधा सवाल आहे मी

या कुणीही... हवी तिथे मिरवा
एक विझली मशाल आहे मी

गर्भश्रीमंत 'बेफिकीर' असो
पण गरीबास ढाल आहे मी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाक मुरडून ही सुखे गेली
काय इतका बकाल आहे मी

होत नाही अश्या परिक्षेचा
लागलेला निकाल आहे मी

उंबर्‍यावर तुला रडू आले
वेदनांचा महाल आहे मी

जन्म कोड्यात टाकुनी म्हणतो
एक साधा सवाल आहे मी

हे सगळेच्या सगळे शेर अप्रतिम !

खुप आवडले.

धन्यवाद !

एकदा वेळ काढुनी भेटू
काय सांगू... धमाल आहे मी

होत नाही अश्या परिक्षेचा
लागलेला निकाल आहे मी >>> व्वा व्वा !!
आवडलीच गझल !:)

गझल आवडली.

एकदा वेळ काढुनी भेटू
काय सांगू... धमाल आहे मी

उंबर्‍यावर तुला रडू आले
वेदनांचा महाल आहे मी

हे शेर फारच आवडले, वेदनांचा महाल - सिग्नेचर शेर!

बेफिकीर,

आवडली! पण काय बोलावं ते सुचत नाही. शेवटी एव्हढंच म्हणेन :

वरी दिसे आरस्पानी परंतु
अंतरीची उलघाल आहे मी

आ.न.,
-गा.पै.

khuup Chaan!

मला सगळेच्या सगळे शेर आवदले

सॉरी पण पखाल म्हणजे काय? तो कळाला नाही (तरी जो अर्थ लागला त्यावरून आवडला)

उंबर्‍यावर तुला रडू आले
वेदनांचा महाल आहे मी

भले शाब्बास!

'कच्ची दिवार हूँ ठोकर ना लगाना मुझको'

रिया., पखाल म्हणचे पाणी वाहून न्यायची चामड्याची मोठी पिशवी. गाढव, खेचर इत्यादिंच्या पाठीवर डाव्याउजव्या बाजूने एकेक अशा दोन पखाली वाहून नेण्याची पद्धत पूर्वीच्या काळी असे.
आ.न.,
-गा.पै.

देत भोज्या गहाळतो मृत्यू
जीवनाची कमाल आहे मी

हासिल-ए-गझल...

गझल आवडलीच.

भोज्या बद्दल फेस्बुक्वर बोललोच आहे की कम्प्लीटली समजला नही म्हणून ......पण आता जरा अधिक क्लीअर होत आहे बहुधा मला समजला आहे
हा शेर खरेच हासिले गजल
तुम्ही स्वतः अक्षरशः जगून पाहिलेला.... साक्षात्काराचा शेर आहे हा ...काय जिगर्बाज शेर आहे वाह !!!!!!!
हटके

सा. न. स्वीकारा !!

_______/\________

सगळेच शेर छानेत

पण

उंबर्‍यावर तुला रडू आले
वेदनांचा महाल आहे मी

हा विषेश आवडला.

वा!

जर कुठे पाहिलेत तर कळवा
की कुठे आजकाल आहे मी

बघ जरा पांघरून हृदयावर
एक उबदार शाल आहे मी

या कुणीही... हवी तिथे मिरवा
एक विझली मशाल आहे मी

>> हे तिन्ही खूप आवडले.

खासकरून 'आजकाल'. व्वाह्ह !!

एकदा वेळ काढुनी भेटू
काय सांगू... धमाल आहे मी

जर कुठे पाहिलेत तर कळवा
की कुठे आजकाल आहे मी

................ खल्लास..

एकदा वेळ काढुनी भेटू
काय सांगू... धमाल आहे मी

व्वा व्वा.

जर कुठे पाहिलेत तर कळवा
की कुठे आजकाल आहे मी

हम वहां है जहां से चे स्मरण झाले.
धन्यवाद.

Pages