खिळा

Submitted by बागेश्री on 20 July, 2013 - 11:25

एखाद्या नाजूक भावनेला,
आपण जप जपतो..
अगदी,
आपल्या आस्तित्वाचं पांघरूण घालत..
पण;
वास्तवाची हातोडी हुकलीये कुणाला?

त्यापेक्षा,
त्या भावनेलाच द्यावं सोडून,
ह्या जगात....!

पडेल- उठेल,
धडपडेल- सावरेल,
निगरगट्ट होईल..
टक्के टोणपे खात खात
घट्ट घट्ट होईल..!
धातूच्या खिळ्यासारखी..

मग,
नशीबाच्या भिंतीवर
आपल्याच यशाचं एखादं चित्र टांगायला
वापरता येईल...
तीच, कोणेकाळची तलम भावना...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. Happy

वा !!!

मग,
नशीबाच्या भिंतीवर
आपल्याच यशाचं एखादं चित्र टांगायला
वापरता येईल...
तीच, कोणेकाळची तलम भावना...

अफलातून कल्पना.......... बस्स्स्स बाकी काहीच नाही. Happy

व्वा! आवडलीच.

मग,
नशीबाच्या भिंतीवर
आपल्याच यशाचं एखादं चित्र टांगायला
वापरता येईल...
तीच, कोणेकाळची तलम भावना..<<<<<<<<<< ग्रेट

अतिशय सुंदर कविता.
>> मग,
नशीबाच्या भिंतीवर
आपल्याच यशाचं एखादं चित्र टांगायला
वापरता येईल...
तीच, कोणेकाळची तलम भावना... >> मस्त.