Submitted by डॅफोडिल्स on 7 November, 2008 - 04:59

तुम्हा सगळ्या मायबोलीकर मित्र मैत्रिणींना सांगताना मला आनंद होतोय की,
मी बनवलेल्या ग्लास पेंटींग्ज व इतर हस्तकलाकॄतींचे पहिले वहिले प्रदर्शन रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २००८ रोजी आयोजित करत आहे.
निमित्य आहे कर्नाटक राज्योत्सवाचं.
वेळ :
रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २००८ स. १० ते ८ पर्यंत.
ठिकाण :
नंदी गार्डन्स फेज -२, जे. पी. नगर ९ फेज, बंगळूर.
प्रवेश विनामुल्य.
वेळात वेळ काढून तुम्ही नक्की यालच.. हो ना?
स्वागतोत्सुक,
संपदा
गुलमोहर:
शेअर करा
खूSSSSSपच
खूSSSSSपच सुंदर आहे गं. बाकिची पेन्टींग्स?
खूप सुंदर
खूप सुंदर !!
बाकीची पेंटींग्स पण टाकता आली तर टाक ना
****************************
...... तो कट्टयावर बसतो , घुमतो , शीळ वाजवतो !
जबरदस्त. का
जबरदस्त.
मायबोलीवर तू टाकलेल्या बाकीही कलाकृती बघितल्या आहेत.
काय कला आहे गं तुझ्या हातांत.
तुझ्या कलाकृतींच्या पहिल्यावहिल्या प्रदर्शनासाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा.
वॉव.. काय
वॉव.. काय सुरेख दिसत आहे हे पेन्टींग!
डॅफो, तुझ्या कलेला यथायोग्य न्याय मिळो ही सदिच्छा!
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..
अरे व्वा!
अरे व्वा! मस्तच!
चित्रही मस्त अन प्रदर्शनाची बातमीही मस्त! 

आयला? पण बन्गळूरात कुठे कशी पोचलीस????????
बायदिवे, आहे का ओळख?????
...;
आपला, लिम्बुटिम्बु
अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा...
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
डॅफो,
डॅफो, यायचा नक्की प्रयत्न करणार, भेटशील का?
तुला नाही ना आमची आठवण आली?? 
बंगलोर बाफवर लिंक दिली आहे तुझ्या या प्रदर्शनाच्या बातमीची.
वा! सुंदर
वा! सुंदर आहे पेंटींग..
अरे वा..
अरे वा.. मस्त पेंटींग आहे...
बाकीचे फोटो पण टाका..
प्रदर्शन भरतय त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा..
वॉव..
वॉव.. मस्तच
शुभेच्छा
--
I’m not sure what’s wrong… But it’s probably your fault...
अभिनंदन
अभिनंदन डॅफो.. मस्तच.. फोटो टाक तुझ्या सगळ्या पेंटीग्सचे.. तुला खूप सार्या शुभेच्छा..
प्रदर्शना
प्रदर्शनाबद्दल अभिनंदन !!! कित्ती छान चित्र काढलय.
अभिनंदन
अभिनंदन डॅफो.
मला माहित नव्हत तू ग्लास पेंटींग पण करतेस ते, आत सगळे फोटो टाक इकडे आणि प्रदर्शनाचे पण फोटो आणि वृत्तांत इथे टाक.
अभिनंदन
अभिनंदन डॅफो. चित्र सुंदरच आहे! 3-D वाटतंय.
कागद आणि काच असं काँबिनेशन आहे का?
विक्री पण आहे की नुसते प्रदर्शन? इथल्या बाकी काही कलाकारांनाही हेच सांगितलं की मायबोलीवरुन विकायला ठेवा, तरी कोणी मनावर घेत नाही!
सगळ्यांना
सगळ्यांना धन्स !
खरंच.. काय आणि कसं करायचे ते सुचवा फक्त.
लालू मला सांग मी घेते मनावर...
सम्पदा..
सम्पदा.. खूपच सुन्दर... पहिल्या वहिल्या प्रदर्शनाबद्दल अभिनन्दन आणि मनापासून शुभेच्छा. आगे बढो.
अगं किती
अगं किती सुरेख आहे पेंटींग......थ्री डायमेन्शनल इफ्फेक्ट आलाय...... सही !! प्रदर्शनासाठी खूप खूप शुभेच्छा
व्वा! फारच
व्वा! फारच सुंदर...
प्रदर्शनासाठी शुभेच्छा !
सुंदर!! प्र
सुंदर!!
प्रदर्शनासाठी हार्दिक शुभेच्छा!
झकास! तुझी
झकास! तुझी म्युरलं पाहिली होतीच. या नमुन्यावरून ग्लास पेंटिंगंदेखील दर्जेदार असणार याची खात्रीये.
प्रदर्शनाकरता शुभेच्छा! प्रदर्शनातून प्रतिसाद कसा मिळाला तेही नंतर जरूर कळव.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
अश्विनी,
अश्विनी, श्रद्धा, दीपुर्झा, पूनम, हिम्सकूल, जयावी, लालू, फ, अम्मी, संतिनो, रुनी, सिंड्रेला, उपास, अड्म, चिन्नु, स्वाती मनी, आणी सगळ्यांना धन्यवाद. कुणाचं नाव रहिलय का?
सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या पोस्ट पाहून माझा हुरूप वाढ्तो.
लिंबूभाऊ मी तुम्हाला चांगलिच ओळखून हे !

अहो मी आता बंगळूरलाच आहे.
कागद आणि काच असं काँबिनेशन
कागद आणि काच असं काँबिनेशन आहे का? >> लालू नाही गं नुसत्या काचेवरच केलं आहे पेंटींग. मागच्या भींती मुळे तसं वाटत असेल. अजुनही काही फोटो टाकते ते मात्र फ्रेम च्या मागे पांढरा कागद ठेउन काढले आहेत. ग्लास चे फोटो कसे काढायचे ? ते मला जरा शिकायला हवं बरेचदा मला माझे आणी माझ्या मोबाईलेचे रिफ्लेक्शन दिसते फोटोत.
असो.
तुला काही माहित असेल तर नक्की सुचव ते माबोवरच्या विक्रिचं. हो कालच्या प्रदर्शनात विक्री पण होती. चांगला होता रिस्पॉन्स.
फारच शॉर्ट नोटिस वर केल्यामुळे.. बरीच धावपळ झाली... चलता है...
काल दोन मायबोलीकरांनी मज्जा केली.
मी आधी सांगितल्या प्रमाणे.. कर्नाटका राज्योत्सवाचा कार्यक्रम होता. त्याचा एक भाग म्हणजे माझं ग्लास पेंटींग्ज्स च प्र.
सकाळी काही कारणाने प्रो. उशीरा सुरू झाला.
एक वाजण्याच्या सुमारास दोन माबोकर आले.. थोडावेळ थांबले. माझ्या समोरच्या खुर्च्यांवर बसले.. आणी निघून गेले. ओळख न दाखवता..
दोन कारणं असावी कदाचित...
त्याना मी कदाचित साउथ इंडीयन अम्मा वाटले
आणी कन्नडा बरल्ला.... गोतिल्ला ... म्हणून ते गेले.:हाहा:
किंवा
आर्ट गॅलरी.. अब्स्ट्रॅक्ट पेंटींग्ज.. चित्र विचित्र फरकाटे रेषा ठिपके रंगांचे ओघळ... चित्रांना दिलेली नावं ... असं काही कुठे दिसलं नसावं म्हणून अपेक्षा भंग झाला असावा.....:खोखो:
असंच काही बाही विचार करत दोन मिनिट उभी होते...
मग नवरोबा आल्यावर मी म्ह्टलं... अहो दोन जण इथे येउन गेले.. चेहर्यावरून तर माबो चे वाटले.. पण मी कसं विचारणार...
मग फोनाफोनी करून नवर्याने तपास केला....
आणी पुन्हा ते दोघे आले...:)
लंपन महाशय आणि त्यांचे मित्र होते ते.
आयटे तुझी वाट पाहिली...तुला लंपन ने काही सांगितले का ?
अगं संपदा,
अगं संपदा, मी आणि सोनाली निघालेलो गं, पण आमची जरा पंचाईतच झाली, प्रत्यक्ष भेटीत सांगते... सत्यजितला मी समस केला ना जमत नाहीये म्हणून...
कसं झालं तुझ्या चित्रांचं प्रदर्शन? फोटू काढलेस का?
अरे तिकडे
अरे तिकडे कानडी माणुस काही बाही प्रश्न विचारत होता आणि बोलत होता .. मध्येच आम्ही उभं राहिलो आणि त्यानी काही विचारलं तर ... मग गपगुमान पाय काढला ... चित्रं छानच होती आणि कोकम सरबतही
हे काही फोटोज... धनुर्धारी
हे काही फोटोज...
धनुर्धारी
तुतनखामेन
थाई

सगळी
सगळी चित्रे अप्रतिम आहेत.
खुप सुंदर
खुप सुंदर पेंटिंग्ज आहेत... फिगर्स ही आणि रंगसंगतीही..
खुपच छान!!
खुपच छान!! मला शब्द सुचत नाहीएत प्रतिक्रियेसाठी
अप्रतिम!!!! ड
अप्रतिम!!!!
डॅफो, मनापासुन अभिनंदन गं.
सुंदर गं.
सुंदर गं. खूप खूप अभिनंदन!
Pages