सिगरेटच थोटुक...

Submitted by सत्यजित on 6 November, 2008 - 06:04

एका अशाच काविळलेल्या संध्याकाळी
धुरकटलेल्या श्वासासंगे
हातातल अर्धवट थोटूक सुद्धा प्रकाशत होत,
मला वेड्याच हसु आलं,
थोड्याच वेळात, तो शेवटच्या घटाका मोजत असताना
मी कुठलीही दया न दाखवता
चिरडणार होतो त्याला, ह्या कट्ट्यावर
आणि भिरकावणार होतो अंथांग समुद्रात
तो विझणार होता , तो सुटणार होता,
तो मोकळा होणार होता, मला न विझवता....
भुरभुरणारा वारा होता
हेलकावणारा अंथांग समुद्र
एखादी लाट येउन आदळत होती
माझ्या अर्धोन्मिलीत मनातलं
मिणमिण चैतन्य जागत ठेवायला ...
ही संध्याकाळ कधी तरी सोनेरी असायची
अगदी लख्ख सोनेरी...
तिच्या सहवासात, तिच्या गंधात अखंड बुडालेली
अंथांग समुद्राच्या आणि केशरी वर्तुळाच्या साक्षीने
रंगवली जायची कीतीतरी उद्याची स्वप्ने
मग चांदण भरून यायचं,
त्या अंधारात लखलखतं चांदण पांघरुन सजायचा तो समुद्र..
मी तिला म्हणायचो,
'तू देखिल अशीच सजशिल ना त्या रात्री नुसत लखलखतं चांदण लेउन'
ती माझ्या दंडाला चिमटा काढत.. घट्ट बिलगायची
मला कधीच कळायचं नाही की तिच अंग का शहारतं..?
पश्चिमेच्या गार वार्‍या मुळे.. की माझ्या उधाणलेल्या रुधिरामुळे?
आता कधीच कळणारही नाही...
आता ती उब नाही, ते केशरी वर्तुळ नाही...
आता उरलिय ती फक्त मिणमिणत्या विस्तवाची साथ..
मला दया आली त्याची
एक शेवटचा झुरका घेउन,
मी त्याला बसवलं माझ्या शेजारी
माझ्या सारखच कणा कणानं
मरण त्याच्याही नशिबी आलं होतं ना...
म्हटलं "बस! दोघे एकदम राख होउ"
तुला पेटवुन ती काडी कधीचीच विझुन गेली नाही
माझ्या देखिल अयुष्यात ती अशीच आली
एका उजळलेल्या फुरफुरत्या काडी प्रमाणे
नशिबाची ओंझळ तिच्या प्रकाशाने उजळुन गेली, भरुन गेली
मी देखिल तेवू लागलो होतो तिच्या संगे
वाटलं होतं आता असेच तेवत राहू एकमेकांसाठी अयुष्याभर..
पण छे! नशिबाची ओंझळ ती...
झटक्यात विरुन गेली,
तिला विझवुन गेली...
आणि मी जगतोय अजुन कणाकणाने जळत.. कणाकणाने जळत...
आता आयुष्य एक सिगरेटचं थोटुक होउन राहीलंय...
कुणी चिरडतंय का याची वाट बघत...

-सत्यजित

आईशप्पथ.....
जबरदस्त रे....
मनाला पटलं.

सत्या,
बरा आहेस ना?

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

सत्या, आत काहीतरी जळतयं रे प्रत्येकाच्या.

>> काविळलेल्या संध्याकाळी >> ! श्शी सत्या. सत्याकडुन असले शब्द! Proud
नितीन, >> आईशप्पथ.....
जबरदस्त रे....
मनाला पटलं. >> कि मनाला पेटलं? Happy

पल्ले कुठल्य कुठल्या जुन्या कविता काडून वाचते आहेस...
श्शी सत्या. सत्याकडुन असले शब्द >> खरय ह्या शद्बाच्या पुढे गेलेच नाहीत बहुतेक जण... पण मला आवडते ही कविता.

<<<आता आयुष्य एक सिगरेटचं थोटुक होउन राहीलंय...
कुणी चिरडतंय का याची वाट बघत...>>>

जबरदस्त.................. सत्या.............

तुझी मला "गीतोपदेश" ही कविता खुप आवडते.

गीतोपदेश

पुन्हा भीक मागून भडवे
जिंकून येतील निवडणूका
उद्या साले हेच भडवे
करतील आपल्या अडवणूका
खरंच कुणास ठाउक
ह्या देशात कधी होतील का सोडवणूका ?

कुणाला दोष द्यायचा ?
साला... नागडेपणाची फॅशन आलीये
घोटाळे, फ्रॉड, रेप हीच आजची पॅशन झालीये
अगदी असेच नाही, पापभीरूही आहेत
लांब रांगा तासनतास
गंडे, महाराज, रुद्राक्ष, मंत्र तंत्र यंत्र
करा देवाचा धावा
देवही सैतानाच्या आधीन
फक्त पुजारीपणाचा कावा

पूर आला, मदत करा !
कारगील झालं, मदत करा !
रस्ता केला, टोल भरा !
मग आम्ही भरल्या टॅक्सची
सुरळी केलीत की काय ?
देश विकण्या आधी
तुमच्या आया-बहिणींची मुरळी केलीत की काय ?

पण मी तरी काय करणार ?
प्रतिज्ञा केलीये लहानपणी
सारे भारतीय माझे बांधव आहेत
हाताबाहेर गेलेले कौरव
थोट्याचा बोटांएवढे पांडव आहेत !

आयला ! कृष्णा ?
तू पण बाप आहेस
एवढ्या दिवस झेपलीच नव्हती बघ तुझी गीता !