मुलाचा भारतीय पारपत्र नूतनीकरण - भारतीय दूतावास - न्यूयार्क

Submitted by राजू७६ on 15 May, 2013 - 17:30

मी मुलाच्या भारतीय पारपत्र नूतनीकरणासाठी भारतीय दूतावास - न्यूयार्क मध्ये सहा आठ्वडाआधी पोष्टाने अर्ज केला होता. व्हीएफस ग्लोबल ही सेवा भारतीय दूतावासातर्फे करत होती. त्यांनी मला Tracking No पाठवला आणि मी त्यांच्या वेबसाईट आणि फोनलाईनवर त्या Tracking No चे सद्यस्थिती बघत होतो...पारपत्र अर्ज दूतावासात निरिक्षणास पाठविला आहे असा Status होता. पण तीन आठवड्यापूर्वी ही सेवा त्यांचाकडून बीलएस इंटरनॉशनलकडे गेली. व्हीएफस ग्लोबलने कळवले की आता बीलएस इंटरनॉशनल हा अर्ज बघणार.

पण बीलएस इंटरनॉशनलची वेबसाईट/ फोननंबर/ ईमेल आयडी काहीही चालत नाही. त्यांनी व्हीएफस ग्लोबलचे Tracking No बघण्यासाठी एक लिंक दिली आहे पण तिकडे हा Tracking No काही शोधत नाही. आता व्हीएफस ग्लोबलने त्यांची ह्या सेवेची फोननंबर बंद केला आहे.

मी भारतीय दूतावास - न्यूयार्कचे वेगवेगळे फोननंबर लावून बघितले पण आईशप्पथ! कोणी कधीही फोन उचलत नाही.
आता तिघांना ईमेल केला आहे. वेबसाईटवर १ ते ३ आठ्वडे आणि अतिरिक्त दहा दिवस लागतील असे लिहिलं.. मित्राचा/ दुसर्या मित्राच्या मुलाच्या ३ आठ्वड्यात परिपात्र आले होते पण तेव्हा व्हीएफस ग्लोबल फक्त सेवा देत होती.. एक/ दोन वर्षापूर्वी बीलएस इंटरनॉशनल सेवा देत होती. भारतीय दूतावास दरवर्षी नवीन टेंडर काढून ही सेवा बाहेरच्या कंपनीना देतात.

आता मी काय करु शकतो? भारतीय दूतावास - न्यूयार्क/ बीलएस इंटरनॉशनल ऑफिसमध्ये समक्ष जाउन काही फायदा आहे का? कुणाला असा अनुभव आला किवा ऐकला आहे का? लवकर पारपत्र कसे मिळू शकते? Googling केलं काही मिळालं नाही म्हणून हा प्रंपच Happy धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्युयॉर्कचे भारतीय राजदुत श्री. ज्ञानेश्वर मुळे आहेत, त्यांची काही मदत होत असेल तर त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटा नक्की मदत करतील.

परिपात्र? Uhoh
अहो पारपत्र म्हणायचं आहे का तुम्हाला?

देव काका पारपत्र म्हणजे पासपोर्ट

जाऊन भेटणे सगळ्यात योग्य! सगळे कागदपत्र बरोबर घेऊन जा. पासपोर्ट सुरक्षितच असेल पण हँडॉफमुळे तुम्हाला स्टॅटस कळत नसेल. मला एकदा मोह झाला होता कूरियर सर्विस वापरायचा पण मी तो टाळून शेवटी स्वत:च पिक अप करायला गेलो पासपोर्ट.

जाऊन भेटणे सगळ्यात योग्य! +१०
व्हिएफएस ची सर्विस चांगली होती. मी मागच्या वर्षी शिकागो एम्बसीला रिन्यू केला होता. सगळे कागदपत्र बरोबर नेले होते. नोटराईज्ड कॉपी पण घेउन गेले होते. मी कुरियरसाठी जास्त पैसे भरले होते पण सांगितल्याप्रमाणे ७ दिवसात घरपोच आला.

आधी व्हीएफेस च्या ऑफिसात जाऊन पूर्ण चौकशी करा. केंव्हा अर्ज दिला होता, काय काय कागदपत्रे दिली होती, मनी ऑर्डर किंवा चेकचे डिटेल ही माहिती घेऊन जा. आणि जमल्यास त्यांच्याकडून लेखी लिहून घ्या.

त्या आधीच बी एल एस च्या ऑफिसमधे गेलात तर तिथली बाई/तिथला बाबा काँप्युटर च्या कीबोर्डवर थोडा वेळ तबला वाजवून म्हणेल, हा Tracking No काही शोधत नाही. (म्हणजे सापडत नाही). तर आता तुम्ही पुनः अर्ज करा. म्हणजे फी पण परत भरायला लागेल का? अर्थातच! तुम्ही पूर्वी अर्जच केल्याचा पुरावा नाही, तर फी दिली का हे कसे कळणार? पण ती कागदपत्रे देऊन टाकली ना! मग बघा बुवा काही तरी करून डुप्लिकेट करून घ्या.

थोडक्यात तुम्ही गंडलात! असे होते कधी कधी. तसे देव तुम्हाला भरपूर आयुष्य देवो नि असल्या वाईट अनुभवांपेक्षा चांगले अनुभव जास्त मिळोत.

मी गेली चाळीस वर्षे इथे राहून भारतीय पासपोर्ट बरेचदा रिन्यू केले, पुढे अनेकदा भारतीय व्हिसा पण केले. मला कधीहि काहीहि कसलाहि त्रास झाला नाही.कधी कधी कोरा अर्ज घेऊन, भरून, एका दिवसात व्हिसा!

काही वर्षांपूर्वी भारतीय राजदूतावासात गर्दी होऊ नये, घातपाती लोक येऊ नयेत म्हणून सगळा कारभार त्यांनी ट्रॅव्हिसा कंपनीकडे दिला. तिथले लोक तर इतके चांगले - कधीहि फोन करा, काहीहि विचारा, बरोब्बर माहिती द्यायचे. कामहि झटपट, घरबसल्या, पोस्टाने. मी अगदी खूषा!

ट्रॅव्हिसा - Travisa – New York: 290 5 th Ave., 4th floor, New York, NY, 10001
Tel: 212-613-2223, fax: 212-613-2287, Rebecca,
Hewlett Santos: 212-613-2223 hsantos@travisa.com www.travisa.com

त्यांना विचारून बघा

एक दोन दिवसात भारतीय दूतावास - न्यूयार्क/ बीलएस इंटरनॉशनलच्या कार्यालयात जायचा विचार केला होता.. पण आज मुलाचे भारतीय पारपत्र पोस्टाने आले.. एकूण ७ आठवडे हे काम होण्यासाठी लागले... धन्यवाद!