नवकवीची व्यथा !

Submitted by कवठीचाफा on 25 October, 2008 - 15:14

दोस्तलोक, दिवाळी अंकांची तयारी जोरात चालु आहे ! जर एखाद्या दिवाळी अंकात एखाद्या नवकवीचे साहीत्य नाही स्विकारले तर त्याची प्रतिक्रीया कशी असेल ? तो कसा निषेध करेल ?
एक प्रयत्न केलाय ! अर्थातच माझा याच्याशी संबंध नाहीये Happy आणि कुणाची टिंगल करण्याचाही हा प्रयत्न नाही.

सं-पादकांच्या अभिरुची
पा-वलो पावली बदलतात
द-र वेळी एखादा कलाकार
कां- चे सारखा तोडतात
चा-र चार आण्याचे अंक तुमचे
नि- पाच पैशाचे तुम्ही
षे-श काय यात रहाते
ध- ड साहीत्य ना आम्ही

चाफ्या तु नव कवी झालास की. Lol
आता तुझ्यापासुन संभाळुन राहिल पाहिजे.
एकवेळ भुत परवडत नवकवी नाही. Proud