Submitted by Anaghavn on 24 October, 2008 - 05:00
लग्न म्हणजे भांडण, लग्न म्हणजे संगत.
त्याच्या चुकांना समजुन करायची त्याची सोबत.
कधी भांडायचे सहज, कधी मुद्दामहुन
तुझी जीत की माझी? मन उभे फणा काढुन.
"गेलीस उडत" म्हणत डोळे तिच्या वाटेकडे
"नाही बोलत ज्जा" म्हणत कान सारखे फोनकडे
रडुन रडुन सुजले डोळे की टाकु हात गळ्यात
नको आता भांडण म्हणत रंगुन जायचं गोड स्वप्नात
गुलमोहर:
शेअर करा
मला
मला कवितेतलं काय कळत नाही पण तुमच्या लग्नात भांडण आधी आणि संगत नंतर आहे
नव्या
नव्या लग्नाची अशी ही नवलाई!!!!
God made Man and tailor made Gentleman!