माझा बाप मरतो तेंव्हा ...

Submitted by कुल on 18 October, 2008 - 07:02

सारखं वाढणारं व्याज बघून, बाप बसला चेहरा पाडून
सावकाराचा पडण्या अगोदर घाला, फाशी घेतो बोलून गेला ॥
माझ्या काळजावर झाला आघात , आईचे अश्रू मावेना डोळ्यात
म्हटलं बघावं तरी जाउन, कोणी मदत करेल का हे ऐकून ॥
पहिले भेटले एक पुढारी, चालले होते सांभाळत ढेरी,
म्हटलं साहेब बाप मरतोय, 'कसं होणार'? म्हणून आत्महत्या करतोय ॥
साहेब म्हणाले जात सांग, किती मतदान घरात सांग,
विचारून घेइन एकदा मॅडमला, नाहितर येउच शेवटी सांत्वनाला ॥
मरू नकोस सांग त्याला, एक नोट देइन मी एका मताला,
त्याला म्हणाव भागव त्यात, स्वप्न सुद्धा पाहवित की रे आपल्या आवाक्यात.. ॥
मग भेटले उद्योगपती, बसायला गाडी आणि मोबाईल हाती
म्हणालो साहेब! वाचवा बापाला, खुप खुप धन्यवाद मिळतिल बघा तुम्हाला ॥
साहेबः "सेझ ला जमीन देणार का विचार, करंजा तरी लाव म्हणावं मिळतील हजार"
हजार लाख कोटी फक्त, दिसतच नाही फाशी आणि रक्त ॥
सावकाराला देण्यापेक्षा मला जमीन दिली असती,
बापाला घर आणि तुला नोकरी मिळून गेली असती ॥
पुढे भेटला मित्र पत्रकार, वाटलं बघावा देतो का आधार,
म्हणाला माझा बाप वाचव, अन्यायाविरुद्ध रान माजव ॥
मित्र म्हणाला, तुझा बाप खाईल काय रे तीन चार साप?
तरच मी ते छापू शकतो, जाहिरातदारांना कापू शकतो ॥
मल हवे तीन पायाचे अस्वल किंवा एखादी नटी नखरेल,
किंवा चालेल एखादा मुलगा आणि तो बुडेल अशी बोअरवेल ॥
गेला मरून बाप तर करूया बातमी सनसनखेज,
तीन चार शो लाइव्ह करू आणि नंतर स्पेशल कव्हरेज ॥
शेवटी भेटले श्री हनुमान, कष्टी दुःखी हरपून भान
म्हणाला देवा तुमचाच सहारा, तुम्हीच वाचवा माझा म्हातारा ॥
मारुती हसला म्हटला बेटा, मलाच माझी पडली चिंता
रामाचेच अस्तित्व नाकारताहेत, तिथे हनुमानाची काय बात ॥
तुझ्या बापाची क्षमा मागतो, यमराजांशी चर्चा करतो,
मरणार तर तो आहेच, स्वर्ग तेवढा मिळतो का ते पाहतो ॥
निघालो घराकडे होउन पुर्ण हताश, डोक्यात होते प्रश्नचिन्ह मन होते निराश
घरी बाप फाशी घेउन गेला होता, बाळांना वाली कुणी सुद्धा उरला नव्हता ॥
लग्नात नटायचं स्वप्न, ताईच्या मनात विरून गेलं
"मेरा भारत महान", हे मात्र चांगलच मनात ठसलं ..
-- सुभाष डिके (पुर्वप्रसिद्धी)

गुलमोहर: 

व्वा.... मस्त कविता !

चांगली आहे कविता. शेवट तर अजुनच मनाला भिडणारा.

वा सुरेख .. अगदी वास्तव चित्रण केले आहेस.

कूल,
कविता छानच जमली आहे एकदम.

कूल, छान आहे कविता. बर्‍याच दिवसांनी फिरकलास ?

लग्नात नटायचं स्वप्न, ताईच्या मनात विरून गेलं
"मेरा भारत महान", हे मात्र चांगलच मनात ठसलं ..
...काय॑ लिह॑ल॑य यार..ज$ब्बर..

सुभाष आधीपण वाचली होतीच. छानच आहे. Happy

आयला, हा आहे होय सुभाष, तरीच नाव ओळखीच वाटत होत पण हूडाच्या तिथे कस म्हणून गोन्धळ झाला थोडा!
कुल, चान्गली लिहीली हेस रे भो Happy

खरंच हे सगळं असंच असतं
मांडायला कुणी धजावत नसतं.

- अभिनंदन व धन्यवाद