रुखरुख थोडी--( संकेत तरही )

Submitted by निशिकांत on 25 February, 2013 - 23:50

रुखरुख थॉडी वसंत नाही आला फुलून याची
तिव्र वेदना मीच अंतरी गेलो सुकून याची

वेस हरवली, मंदिर गेले शहरीकरणी कोठे?
प्रभो नोंद घे हात जोडतो मंदिर स्मरून याची

उदास का मी ऊंच पाहुनी श्रिमंतांची वस्ती?
खुशी वाटते लक्तरात मी जगलो हसून याची

अन्यायाची चीड क्षणाची, पुन्हा लोक हे सारे,
लाज वाटते, कोषामध्ये जगती दडून याची

उन्मेषाने चढत राहिलो धवल यशांची शिखरे
खंत वाटते माझे अपुले बघती दुरून याची

घाव नवे अन् नव्या वेदना खुशीखुशीने सहतो
काळजी जुन्या जखमा नाही आल्या भरून याची

शिकवलेस तू तर पिल्लांना उडावया आकाशी !
बोच कशाला "निशिकांता" ते गेले उडून याची?

निशिकाt देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिकवलेस तू तर पिल्लांना उडावया आकाशी !
बोच कशाला "निशिकांता" ते गेले उडून याची?

<<<

मक्ता आवडला.

एकुण संकेत तरहीच्या निकषांनुसार फारशी वाटली नाही, स्वतंत्र गझल म्हणून अर्थातच छान!

पु ले शु

"रुखरुख थॉडी वसंत नाही आला फुलून याची
तिव्र वेदना मीच अंतरी गेलो सुकून याची" >>> हा सर्वात आवडला.

"एकुण संकेत तरहीच्या निकषांनुसार फारशी वाटली नाही, स्वतंत्र गझल म्हणून अर्थातच छान! " >>> बेफींशी सहमत.