Submitted by गणेश भुते on 15 October, 2008 - 12:01
आलो पंढरीला
उरात आल्हाद
विठ्ठलाची साद
ऐकोनीया
मनी लोचनी या
उधाणले सुख
विठ्ठलाचे मुख
पाहोनीया
न्हालो गजरात
चंद्रभागेकाठी
विठ्ठल ललाटी
लेवोनीया
परत निघालो
अभंग हर्षात
विठ्ठल हृदयात
घेवोनीया
--गणेश भुते
गुलमोहर:
शेअर करा
गणेश, खूप
गणेश, खूप सोप्प्या व कमी शब्दात सगळं काही आलंय
टोटल
टोटल विठ्ठल विठ्ठल!

आम्हीही निघालो
तुझ्याच शब्दांत
विठ्ठल नामात
दंगुनिया . . .
छान कविता
छान कविता
चाल द्यावी
चाल द्यावी .. इतकी सुंदर ...
ब्रम्हानं
ब्रम्हानंदी लागली टाळी
नाव घेता विठाईचे,
कुणा हवे कैलास-वैंकुंठ
दर्शन होता पंढरीचे !!
छान गणुभाऊ, मागच्या वर्षी सोलापुराहुन वारीबरोबर चालत गेलो होतो. त्यावेळची आठवण जागी झाली. आभारी आहे.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.