Submitted by अलका_काटदरे on 15 October, 2008 - 11:16
(कोजागिरी निमित्त)
दूर ऊभा तू एकटा
शांत शांत, अन स्तब्ध
रुजविशी आम्हांमध्ये एकता
पसरूनी स्मित तुझे मंद
करिशी जगाला रोजच
उल्हसित अन धूंद
चमकत राहशी पूर्ण तू
चांदण्यात लाजून जाशी तू
मदत करिशी सूर्याला
रात्रभर झोपायला तू
असतोस कोठे दिवसा तू
तापतो जेव्हा आम्ही आतून
कोठे जाते शितलता तुझी
होरपळतो आम्ही जेव्हा दिसामाजी
प्रेम, क्षमा,शांत आचार
शिकलो आम्ही तुझ्याकडून
स्निग्ध प्रकाश तुझा राजा
दिपवूनी जावो या पामर जगा ....
गुलमोहर:
शेअर करा