कंटाळलो किनार्याला
रोजच्याच निवार्याला
पाय वाळुत रुतलेले
साद दूरच्या वार्याला
फिरलो भणंगासारखा
मोकळा अनिलासारखा
दिशा सार्या माझ्या
चिंतेला पारखा
झुंजताना प्रवाहाशी
श्वास पाण्याचा लागला
पुन्हा मोकळा हुंकार
विजयाचा सोहळा
क्षितीजावर धरा नीळी
भुलावली दिठी खुळी
जीव कसा विसावला
सावलीत सुखावला
पाश सुखाचा लागला
संघर्ष लया गेला
पाय वाळुत रुतलेले
साद दूरच्या वार्याला
छान आहे
झुंजताना प्रवाहाशी
श्वास पाण्याचा लागला
पुन्हा मोकळा हुंकार
विजयाचा सोहळा...
चला.... गावातला एक अख्खा भाग चाऊला इनाम!