काव्य

Submitted by sharmila_desai on 15 October, 2008 - 09:24

काव्य
मी प्रेम केलय तुझ्यावर
फक्त तुझ्यावर
फक्त तुझ्यावर
या वेड्या आशेने
की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर

संपुर्ण तन-मन-धन लावून तुला लिहिल
मनातल्या विचाराना व्यासपीठ दिधल
फक्त एका वेड्या आशेने
की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर

लिहिन ही तुला वाचीन ही तुला
आठवणीत साठवीन ही तुला
तु फक्त एकदा हसून दाखव मला

मी प्रेम केलय तुझ्यावर
फक्त तुझ्यावर
फक्त तुझ्यावर
या वेड्या आशेने
की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर

सुरुवात ही तूच
जीवन ही तूच
शेवट ही तूच

अशीच खूप-खूप सूचत रहा
मनाला माझ्या आनंद देत रहा
तेव्हाच मी समझेन की तुही प्रेम केलस माझ्यावर
फक्त माझ्यावर................

गुलमोहर: 

प्रेम पझेसिव्ह असते ते असे. छान.
असच प्रेम करत रहा, एकमेकांवर.

मन माझे भारावले तुझा काव्य प्रेमावर
काव्यरुपी मनातल्या प्रेमावर