Submitted by विशाल कुलकर्णी on 15 October, 2008 - 06:06
बागेतला बाक
हिरवळीला म्हणाला,
सखे तुझे भाग्य थोर.
तुला कायम
तारुण्याचा सहवास!
आमच्या नशिबी मात्र
नेहेमीच..
वार्धक्याचे क्षीण नि:श्वास !
स्पर्ष तुला शैषवाचे
अन उमलत्या
नव्हाळीचेही !
आक्रंदती कानी माझ्या
श्वास जर्जर
वार्धक्याचे !
ही खंत नसे
केवळ
माझ्या मनीची !
तो बघ शेजारी
शुष्क
बाभुळही कळवळे !
गुलमोहर:
शेअर करा
काहीतरी
काहीतरी चुकलंय किंवा राहुन गेलंय. पण काय?
काहीतरी सुचवा ना !
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
हिरवळ
हिरवळ म्हणाली बाकास,
का खंत मना रे . . .
टाकशी जरा नि:श्वास.
तुडवली जाते पायदळी मी,
काटा रुतता पायी
तुझाच घेती आधार . . .
तु अन् मी
भिन्न जरी
एकच माती जपते,
दोघास . . .
....तु छान लिहितोस रे! मग मलाही काही सुचायला लागतं.
वा! एकच
वा!
एकच माती जपते.
दोघास..
छानच ! धन्यवाद.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
वा! एकच
वा!
एकच माती जपते.
दोघास..
छानच ! धन्यवाद.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.