प्रिया

Submitted by विशाल कुलकर्णी on 15 October, 2008 - 05:48

कृष्णसावळ्या केसांवरती
कण वर्षेचा क्षण रेंगाळे ,
काजळडोही चमकता मोती
पाहुनी चन्द्रही मनी जळे !!

नागिणीसम तव बटा सळसळे
कुठे पाहावे डोळा न कळे,
उगाच लटका भाव नयनी
जाणुनीया परि मनही चळे !!

सखे तुझी ती मोहक कांती
नवतीचेही मग भान गळे ,
पामर मी तव लावण्यापुढती
प्रीत तुझी नच मला गमे !!

तुझ्यात विरघुनी गेलो सखये
विसरलो घटीका न पळे ,
कधीच गेलो हरवुनी नयनी
प्रिये, माझे मला न कळे !!

विशाल

गुलमोहर: 

नागिणीसम तव बटा सळसळे >>>
वाचुन माझ्या मस्तकांत कळ गेली, कारण मला नागिण झालीय (हार्पिस का काय म्हणतात ते! ) Sad
कविता छाने बर्का.

नागिण तोंडातुनदेखील होते म्हणतात, तसे असेल तर तिखट काही खाता येत नाही म्हणतात. तसं नाहीये ना? कारण आता मी एखादी झणझणीत कविता तुम्हाला फेकुन मारण्याचा विचार करतोय.

"बर्का" मस्त वाटलं, माझी एक मैत्रीण होती पुण्यात श्रुती नावाची. ती हा शब्द खुप छान आणि ठसक्यात उच्चारायची. तिची आठवण झाली एकदम.

आभारी आहे...बर्का!

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

ह्हा! मी भाग्यवान आहे. ती तोंडात नाही पायावर आहे. Happy
तु एखादी झणझणीत कविता मला फेकुन मार मी ती गरमागरम भाकरीला लावुन खाईन. Wink
पुण्याचे लोक नेहमीच आणि स्सगळेच्च शब्द खुप छान आणि ठसक्यात उच्चारतात. मी कशी अपवाद असणार?
तिखट कविता फेक लवकर. मी देते फोडणी . Wink